तडका - राजकीय विरोध

Submitted by vishal maske on 18 January, 2016 - 20:14

राजकीय विरोध

जिथे संधी मिळेल तिथे
एकमेकांस भिडले जातात
सत्ताधार्‍यांना विरोधक
पावलो-पावली नडले जातात

मात्र सुत्र जुळून आले तर
ऊलटवारे फिरू लागतात
सत्ताधार्यांची पाठराखण
विरोधकही करू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users