तत्त्वज्ञान

तडका - सत्याचं जहाज

Submitted by vishal maske on 13 May, 2016 - 23:21

सत्याचं जहाज

असत्य पुढे
ओढलं जातं
सत्याचं शीड
फाडलं जातं

असं समाजास
लुबाडलं आहे,.!
सत्याचं जहाज
दबाडलं आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सिस्टम

Submitted by vishal maske on 13 May, 2016 - 11:03

सिस्टम

कोण कसा गुततो आणि
कोण कसा सुटतो आहे
सामान्यांचं पाहून जीणं
कंठ आता दाटतो आहे

ज्याच्या हाती सिस्टम
तोच इथला दादा आहे
पण राबवताना सिस्टम
सिस्टमवरतीच गदा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तरी ही ? -ओलसर जखम तरी

Submitted by साती on 12 May, 2016 - 07:10

ही 'तरी ही?' आहे तरही नाही हे अगोदरच स्पष्ट करते.
'तरी ही ?' म्हणजे लोक म्हणतात ना, लिहितानाच इतकी भिकार लिहिली 'तरी ही' का छापली?
तर या प्रकारची कविता म्हणजे 'तरी ही'

डॉक्टरांवरी उडून फीज भरभकम तरी
लोटला अनंत काळ ओलसर जखम तरी

थंडगार पार्सलास या कसे गिळायचे
मायक्रो करून त्यास कर जरा गरम तरी

वर्ष संपताच पाळणा पुन्हा हलायचा
लेकुरे उदंड मात्र थांबला न क्रम तरी

ही तुझी समीक्षणे कुणा कशी रूचायची
एक चित्र पाहण्यात तीन तास रम तरी

'मी तुझा, तुझाच मी' किती जणींस सांगतो
सोंग हे निभावण्यात लागलाय दम तरी

फोटुशॉपची कृपा विकास हा खरा नसे
काय तू विसंबलास संपलाय भ्रम तरी

तडका - नाव न घेताही

Submitted by vishal maske on 10 May, 2016 - 10:53

नाव न घेताही

अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं
मनामध्ये हेरता येतं
कटू बिज पेरता येतं

जबर निशाणा साधून
टोमणंही मारता येतं
शब्दांना शस्र करून
काळीजही चिरता येतं

टिकांमध्ये घेरता येतं
आरोपांत पुरता येतं
अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डीग्रीच्या डगरी

Submitted by vishal maske on 9 May, 2016 - 20:28

डीग्रीच्या डगरी

कुणी म्हणतात भक्कम
कुणी म्हणतात ढासळतील
मोदींच्या डिग्रीच्या डगरी
खोटे पणात कोसळतील

ओरिजनल डिग्री असेल तर
मोदी विश्वासात मिसळू शकतात
मात्र बनावट डिग्रीच्या डगरी
या कधीही कोसळू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रतिष्ठा

Submitted by vishal maske on 8 May, 2016 - 20:45

प्रतिष्ठा

कुणाला आयतीच मिळते
कुणाला कमवावी लागते
तर कमवलेली प्रतिष्ठाही
कुणाला गमवावी लागते

मात्र वास्तव जगताना
प्रतिष्ठा घातक ठरू नये
आपली प्रतिष्ठा जपताना
मानवतेला इजा करू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रसंग

Submitted by vishal maske on 8 May, 2016 - 10:47

प्रसंग

इथे इतरांचा मोठेपणा
कधी मनालाच टोचवतो
अन् आपला कमीपणा
आपल्यालाच खचवतो

मात्र जिद्दीनं लढल्यास
हा कमीपणा दुर होतो
पण वेळ बदले पर्यंत
हवा प्रसंग चुर होतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आपले सत्य

Submitted by vishal maske on 6 May, 2016 - 23:32

आपले सत्य

एक फसका धंदा
सारे धंदे फसवतो
एक नासका कांदा
सारे कांदे नासवतो

धंदा फसवण्यासाठी
धंदाच वापरला जातो
कांदा नासवण्यासाठी
कांदाच वापरला जातो

धंदा आणि कांद्यात असे
सिमिलर गुण भासवतात
यातुन कळते आपल्याला
आपलेच तर फसवतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कंत्राटी चंगळ

Submitted by vishal maske on 4 May, 2016 - 22:32

कंत्राटी चंगळ

शासकीय काम म्हणजे
भ्रष्टाचारी खाऊ असतो
अन् भ्रष्टाचार करताना
विरोधकही भाऊ असतो

काळ्या यादीतील लोकांना
सफेद पॉलिश दिली जाते
अन् घरच्या कंत्राटदारांकडेच
कामांची चंगळ आली जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ऊद्योगी लालच

Submitted by vishal maske on 4 May, 2016 - 11:30

ऊद्योगी लालच

कित्तेकांना वाटतं
ऊद्योजक व्हावं
बहू ऊद्योगांतुन
कमवत रहावं

असे तुरळक मिळतील
जे ऊद्योगांना खेटले नाही
कारण या लालची मोहातुन
सहज कुणी सुटले नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान