तत्त्वज्ञान

तडका - भुमी प्रगती पथाची

Submitted by vishal maske on 10 June, 2016 - 08:26

भुमी प्रगती पथाची

पोपटपंची बोलणारे
समाजात खुप आहेत
ज्याने-त्याने काढलेले
वेग-वेगळे ग्रुप आहेत

तरी देखील जनमनात
विकासाची खुमखुमी आहे
इथे भ्रष्टाचारात माखलेली
प्रगती पथाची भुमी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - समर्थन

Submitted by vishal maske on 6 June, 2016 - 10:59

समर्थन

आपले नेते जपण्या
कार्यकर्ते गंभीर हवे
गरज भासेल तिथे
सदैवच खंबीर हवे

अन् त्यांचे वागणे हे
सदा प्रशंसक असावे
मात्र भावनेच्या भरात
समर्थन हिंसक नसावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आपले पर्यावरण

Submitted by vishal maske on 5 June, 2016 - 00:02

आपले पर्यावरण

झाडे लावा आणि झाडे जगवा
सांगणारे,ऐकणारे खुप आहेत
पण झाडांची कत्तल करणारेही
माणसांचेच ग्रुपच्या ग्रुप आहेत

पर्यावरणाच्या बाबती मध्ये
हो, मानवी प्रवृत्ती हिन आहे
आज पर्यावरण दिनी सांगतो
आपले पर्यावरण दीन आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - माणसांच्या दुनियेत

Submitted by vishal maske on 2 June, 2016 - 10:44

माणसांच्या दुनियेत

माणसांवरचा विश्वासही
माणसांनी तोडला आहे
कुविचारी जोखंडातच
हो,माणूस पीडला आहे

माणसांचे पाहून वागणे
काळजामध्ये आग झाली
माणसांच्या या दुनियेत
माणूसकीही महाग झाली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दमानी या

Submitted by vishal maske on 1 June, 2016 - 10:26

दमानी या

रस्त्यांवरचा महा निष्कर्ष
आता फ्रंट टू फ्रंट आलाय
रस्त्यांवरचे खड्डे म्हणजे
पब्लिसिटी स्टंट झालाय

रस्त्या-रस्त्यावरती आहेत
अपघातांच्या त्सुनामी या
धोका कधीही होऊ शकतो
म्हणूनच ऐका 'दमानी या'

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 31 May, 2016 - 11:34

प्रॉपर्टी

असा कुणी क्वचितच भेटेल
जो स्वार्थात गटलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा मोह
नाथांनाही सुटलेला नाही

मोठ्या मोठ्या समस्यांतुन
प्रॉपर्टी सहज तारू शकते
मात्र कधी हिच प्रॉपर्टी
बरबाद सुध्दा करू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जात संबंध

Submitted by vishal maske on 29 May, 2016 - 22:00

जात संबंध

अचानक कोणाच्यातरी
अब्रुवरती डाका आहे
पुन्हा नवख्या गदारोळात
टिकेला ऊत्तर टिका आहे

वैयक्तीक बाबींचा संबंधही
जाती धर्माशी लावला जातो
ठराविक वर्गाच्या मदतीला
ठराविक वर्ग धावला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अधिकारी बांधवांनो

Submitted by vishal maske on 28 May, 2016 - 22:17

अधिकारी बांधवांनो

समाज आणि प्रशासनामध्ये
नक्कीच काही दुरावा आहे
याचा वेळोवेळी जाहिर होणारा
समाजात जिवंत पुरावा आहे

समाजातील अधिकार्यावर
जनतेचे सदैव लक्ष असतात
समाजही त्यांनाच ग्रेट मानतो
जे सदैव कर्तव्य दक्ष असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सामाजिक कलंक

Submitted by vishal maske on 26 May, 2016 - 21:09

सामाजिक कलंक

पद प्रतिष्ठा मिळाल्यावर
दुरूपयोग करू लागतात
अन् जबाबदार्या झुगारून
स्वत:च घर भरू लागतात

समाजाला ढसणारे हे
जहरी जहरी डंख आहेत
हे समाजातच पोसणारे
जमाजाचे कलंक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नियम पाळा,जीवन संभाळा

Submitted by vishal maske on 26 May, 2016 - 11:35

नियम पाळा,जीवन संभाळा

माणसांनीच बनवलेले आहेत
पण माणसांच्या हिताचे आहेत
तरीही नियम पाळण्याचे ट्रेंड
समाजात अल्प मताचे आहेत

समाजातील कित्तेक अनर्थही
नियमां मुळेच तर घडले आहेत
ज्यांनीही नियम तोडले आहेत
त्यांनी जगणेही सोडले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान