रक्षाबंधन निमित्ताने
अहो कित्तेक रक्षाबंधन
आले आणि गेले आहेत
तरीही बहिणींचे जीणे
सुरक्षित ना झाले आहेत
सेल्फ डिफेन्स बाबतीत
त्यांना ट्रेनिंग द्यायला हवी
स्वत:चं रक्षण करण्यासाठी
बहिण सक्षम व्हायला हवी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
भेटीचे गुपित
कधी कोण कुठे-कुठे
कुणाची भेट घेतो आहे
हल्ली भेटी गाठी म्हणजे
चर्चेचा विषय होतो आहे
कित्तेकांच्या भेटीचे गुपित
सुरक्षितपणे दडले जातात
मात्र कुणाच्या भेटीचे गुपित
तर्क लावत काढले जातात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३
जन रक्षकांनो
विश्वासाच्या फांदीवरती
अविश्वासी झोका नसावा
जनतेच्या रक्षकांकडून
जनतेलाच धोका नसावा
अन्यायकारक वारे
समाजात पसरू नयेत
जनतेच्या रक्षकांनी
स्वकर्तव्य विसरू नयेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मैत्री
मना-मनात रूचणारी
मैत्री असावी टिकणारी
लाचारीला बळी पडून
मैत्री नसावी विकणारी
ऊमेदीचे बळ देखील
मैत्रीमधुन प्राप्त व्हावे
मैत्रीला जपावे असे की
जीवन देखील तृप्त व्हावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. जगातील सर्वांत मोठा सोहळा. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा. वेगवान, उच्च आणि बळकट असे ब्रीड मिरवणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजक होऊन आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे.
लेखक: यशवंत वालावलकर.
आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे. अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही. काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील. हे सगळे मान्य आहे. मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
* शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
* थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले. आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
* थोरले माधवराव क्षय रोगाने गेले. तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.
लिहितो कितीही, वाचतो कितीही ,
शेवटी खितपत पडतो ....
शून्याच्या अंधारात
पडतो कितीदा ,उठतो कितीदा
शेवटी खिन्न उरतो ...
भकास जागलेपणा
जगतो अंशतः , मरतो बहुदा
अंती तसाच स्तब्ध उरतो...
निराकार चैतन्याचा
स्फुरतं थोडंसं , स्मरतं थोडंसं
प्रयत्नांती राहून जातं...
अव्यक्त गुज मनातलं
व्यक्त-निर्वात कितीही,निरव-गुंजन कितीही
तरीही संवाद खुंटतो ...
भेदरलेल्या अस्तित्वाचा
चितस्थधि
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥अभंगगाथा ३०२||
श्री तुकोबारायांचे देवदर्शन
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥५८१
हा अभंग म्हणजे श्री तुकोबारायांचे पूर्णोद्गार आहेत. साधकावस्था पार करुन बुवा आता सिद्ध झाले आहेत. या सिद्धावस्थेचे काहीबाही वर्णन या अभंगातून बुवा करीत आहेत. काही बाही अशा करता कि आपण सर्वसामान्य जिथे समुद्रपातळीवर उभे आहोत तिथून हे गौरीशंकराचे शिखर सगळेच्या सगळे कसे काय दिसणार आपल्याला !!