Submitted by चितस्थधि on 25 July, 2016 - 14:50
लिहितो कितीही, वाचतो कितीही ,
शेवटी खितपत पडतो ....
शून्याच्या अंधारात
पडतो कितीदा ,उठतो कितीदा
शेवटी खिन्न उरतो ...
भकास जागलेपणा
जगतो अंशतः , मरतो बहुदा
अंती तसाच स्तब्ध उरतो...
निराकार चैतन्याचा
स्फुरतं थोडंसं , स्मरतं थोडंसं
प्रयत्नांती राहून जातं...
अव्यक्त गुज मनातलं
व्यक्त-निर्वात कितीही,निरव-गुंजन कितीही
तरीही संवाद खुंटतो ...
भेदरलेल्या अस्तित्वाचा
चितस्थधि
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा