तत्त्वज्ञान

तडका - विद्यार्थी मित्रांनो

Submitted by vishal maske on 25 May, 2016 - 11:03

विद्यार्थी मित्रांनो

लक्षवेधी त्या निकालाने
आता प्रदर्शन केलं आहे
विद्यार्थ्यांचं भवितव्यही
म्हणे जाहिर झालं आहे

मात्र हा रिजल्ट म्हणजे
कलाटणी नव्हे अंतिम
म्हणूनच जिथे जाल तिथे
सक्सेस मिळवावे अप्रतिम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्य

Submitted by vishal maske on 24 May, 2016 - 10:42

सत्य

सत्य असेल तर
टिकलं जातं
समोर आलं तर
जिकलं जातं

सत्य नसेल तर
रापलं जातं
दडवलं तरीही
कापलं जातपं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय समीक्षण

Submitted by vishal maske on 23 May, 2016 - 21:08

राजकीय समीक्षण

टिका करणे,आरोप करणे
हा राजकारणाचा भाग आहे
कुणाच्या निशाणी सिंह तर
कुणाच्या निशाणी वाघ आहे

पण विकास सोडून भरकटने
हा समाजव्यवस्थेला डाग आहे
राजकीय समीक्षण करण्या
जनतेला अजुनही जाग आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

राजीव साने यांची प्रकट मुलाखत

Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 May, 2016 - 11:27
तारीख/वेळ: 
4 June, 2016 - 08:00 to 10:30
ठिकाण/पत्ता: 
निवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे

अनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त
अजय ब्रहमनाळकार
प्रा. संतोष शेलार
पत्रकार निरंजन आगाशे
हे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
राजीव साने मित्रमंडळ
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

वाणी वृध्दाश्रमातली

Submitted by vishal maske on 23 May, 2016 - 06:57

वाणी वृध्दाश्रमातली

आम्हीही सांभाळला समाज,तरूणपणात
पण आता बसलो आहाेत,वृध्दाश्रमात,...||धृ||
होत्या खुप इच्छा अपेक्षा
स्वप्न सुध्दा खुप होते
आमच्या ध्येयामध्ये सदा
भविष्याचे रूप होते
तुमचीच वाटायची काळजी,आमच्या मनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||१||
तुम्हा अंगावरती खेळवलं
सदा सुखामध्ये लोळवलं
तुम्हाला सावली देण्या
स्वत:ला ऊन्हात तळवलं
कधीच काटकसर नव्हती,आमच्या प्रेमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||२||
म्हातारपणाला आधार
तुमचाच तर वाटायचा
तुम्हा पाहुन जीवनाला
नवा अंकुरही फूटायचा
जाईल वाटायचं ऊतारवय,सदा जोमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||३||
आमचं कुटूंबही आता

तडका - क्लिन चीट

Submitted by vishal maske on 22 May, 2016 - 22:12

क्लिन चीट

आरोप अंगावर येताच
पाठराखण हजर असते
जहरी जहरी आरोपांना
क्लिनचीटचे गाजर असते

क्लिनचीटचे महत्वही
हमखास कळू लागेल
हवी त्याला क्लिन चीट
सहजतेने मिळू लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - तिमिरातील तेजासाठी

Submitted by vishal maske on 22 May, 2016 - 11:52

तिमिरातील तेजासाठी

दुसर्यांना दोष देण्यापेक्षा
स्वत:चंही करावं समीक्षण
करावं कार्य झकास इतकं
की जगही करील निरिक्षण

स्वत:मधल्या अंधकाराला
स्वत:हूनच धमकावं लागतं
तिमिराचा सामना करण्या
काजव्यालाही चमकावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

निषेध!

Submitted by जव्हेरगंज on 22 May, 2016 - 02:34

काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..

कवितेला नसतं विषयाचं बंधन

पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?

असल्या कवितांचा मी निषेध करतो.

- जव्हेरगंज

तडका - शिक्षण घेता-घेता

Submitted by vishal maske on 21 May, 2016 - 22:34

शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेण्यासाठीची
धडपड कसोशीने आहे
शिक्षण घेणे म्हणजे
वाघिणीचं दुध पिणे आहे

म्हणूनच की काय शिक्षणात
बहू अडथळे घातले आहेत
अन् शिक्षण घेता-घेता इथे
सामान्यांचे जीणे फाटले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - महामानवा

Submitted by vishal maske on 21 May, 2016 - 10:58

महामानवा

हिंसावलेल्या जगास
शिकवलीस अहिंसा
तुझ्या शांती संदेशाची
होत राहिल प्रशंसा

जग झाले शांतीप्रिय
तुझे तत्वज्ञान हे घेता
दिधली तुच मानवता
महामानवा तथागता

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान