कला - एक बूंद पारे की किंमत
बळी तो कान पिळी हे नैसर्गिक निवडीचे तत्व! ज्या प्राण्यांत एकाहून जास्त पिल्ले जन्माला येतात त्यांच्या बाबतीत हे खूप ठळकपणे काम करते. जे पिल्लू अधिक ताकदवान, आधी जन्माला येते ते सहाजीकच जन्मदात्यांनी आणलेल्या अन्नातला अधिकाधिक भाग गट्ट करते. बाहेर अन्नाची विपुलता असेल तर ठीक नाही तर जे पिल्लू कमजोर असते त्याला पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्याच्या जगण्याची शक्यता कमीकमी होत जाते. काहीसे कटू असले तरी हेच निसर्गाचे तत्व आहे. त्यात त्या सशक्त पिल्लाला त्याचा कसलाच दोष लागत नाही ते निष्पापच असते.