बळी तो कान पिळी हे नैसर्गिक निवडीचे तत्व! ज्या प्राण्यांत एकाहून जास्त पिल्ले जन्माला येतात त्यांच्या बाबतीत हे खूप ठळकपणे काम करते. जे पिल्लू अधिक ताकदवान, आधी जन्माला येते ते सहाजीकच जन्मदात्यांनी आणलेल्या अन्नातला अधिकाधिक भाग गट्ट करते. बाहेर अन्नाची विपुलता असेल तर ठीक नाही तर जे पिल्लू कमजोर असते त्याला पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्याच्या जगण्याची शक्यता कमीकमी होत जाते. काहीसे कटू असले तरी हेच निसर्गाचे तत्व आहे. त्यात त्या सशक्त पिल्लाला त्याचा कसलाच दोष लागत नाही ते निष्पापच असते. पण एकदा का जगणे सुरू झाले की मात्र आपल्या कर्माची फळे स्विकारण्याशिवाय गत्यंतर नसते - कधी ती जगाकडून मिळतात तर कधी आपल्याच मनाकडून!
एका गायिकेच्या घरी एक मुलगी जन्माला येते. जुळे होणार असते पण डॉक्टर सांगतात दुसरं मूल अशक्त होतं, नाही जगू शकलं आणि तो मुलगा होता. आईला त्या जन्माला न आलेल्या मुलाचाच लळा लागतो आणि मग मुलीच्या वाट्याला तिचे प्रेम कधी येत नाही. तो काळ असतो गायिकांच्या वाट्याला भरपूर नावलौकिक आणि पैसा येण्याचा पण तरीही प्रतिष्ठा नसण्याचा! प्रेम नसलं, तरी आईला मुलीची काळजी असतेच. मुलीच्या नावामागे 'बाई' न लागता ती प्रतिष्ठीत गायिका व्हावी यासाठी ती प्रयत्न करत असतेच. पण तिला कळतं की मुलीत गाणं असलं तरी ते गाणं अव्वल दर्जाचं नाहीये. आणि मुलगीही गळ्यातल्या गाण्याला रीयाझाने पैलू पाडण्याऐवजी आईचे प्रेम मिळवण्याकरताच आसूसलेली असते. तिच्याकरता गाणं दुय्यमच असतं - मुळात ती गाते तेच मुळी आइचे प्रेम मिळवण्याकरता !
आई तिचे गाणे एका संगीताच्या कार्यक्रमात पहिल्यांदा सादर करायचा घाट घालते. तीच एकटी गाईल अशी व्यवस्था करते. पण ऐन वेळेला तिच्याच वयाचा एक मुलगा पण गातो. तिच्या गाण्याच्या वेळेस मोजकेच असलेले श्रोते, त्याच्या वेळेस मात्र संख्येने चांगलेच वाढतात. आईला मुलीची काळजी वाटायला लागते. पण त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र श्रोतेच नाही तर आईही त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडते, त्याच्यात आपला न जन्मलेला मुलगा शोधू लागते. आणि तेंव्हापासून त्या मुलीच्या अधोगतीला सुरुवात होते. आधी आईचे प्रेम मिळण्यासारखी घडपडणारी ती आता त्या मुलाचाही द्वेष करायला लागते. शेवट अटळ असतो.
सिनेमा खूप तरल आहे आणि इतक्या तरलतेत अशी कथा बसवणे खूप अवघड असते. दुसरे म्हणजे ९९% सिनेमात नायक / नायिकेच्या वाईट वागण्याचे उदात्तीकरण केलेले असते. ते या सिनेमात जराही नाही. नायिकेची अधोगती बघताना वाईट नाही वाटत, खूप भकास वाटते. सिनेमात दोन प्रसंग असे आहेत की ते बाहेरच्या जगात घडतात पण त्यांचे आईच्या गर्भातल्या घटनांशी खूप साधर्म्य आहे आणि त्यांचे चित्रण लाजवाबच आहे. एक म्हणजे तो मुलगा तिच्या घरी येतो तेंव्हा अंगणात गर्भातल्या जुळ्यांच्या आकॄतीत त्या दोघांवर घेतलेला शॉट आणि दुसरा त्या मुलाने फास लाऊन घेतल्यावर खाली पडणारा दोर ना़ळेची आठवण करून देतो - ती जिवंत आणि तो मेलेला. आधी घडलेली निसर्ग निवड आणि आता त्याचे फास लाऊन घेणे - दोन्ही मृत्यूच पण त्यातला फरक हा सिनेमा दाखावून देतो. आईने तिला कोकिळा म्हणणे त्या दोन प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर अधिकच गहिरे होते. (त्यातला संदर्भ थोडा चुकला आहे बहुदा - कोकिळेचे पिल्लू कावळ्याच्या पिल्लाला घरट्याबाहेर ढकलते हा संदर्भ हवा होता.)
दोन गाणी - अर्धवटच असली तरी - खूप सुरीली आणि सुंदर आहेत - तिचे बाबुल मोरा आणि त्याचे उड जायेगा. उड जायेगा तर अप्रतिमच. कुमारजींचे गाणे ऐकल्यावर आणखी कुठली चाल त्या गाण्याला बसूच शकत नाही असेच वाटत आलेले मला - पण हे गाणे खूप वेगळे आणि तितकेच सुंदर आहे.
तृप्ती दिमरी - काय लिहावे? बुलबुल मध्ये ती आवडली होतीच आणि यात तर तिच्या सम तीच अशी अवस्था आहे. निरागस चेहरा, गोड हसू सांभाळत कारस्थाने करणारी नायिका तिने अतिशय दमदारपणे उभी केली आहे. नायिकेचा राग न येऊ देणे आणि तिच्याबद्दल वाईटही न वाटू देणे या दोन टोकांवरची कसरत तिने अगदी सहज केली आहे. कुठच्याही एका बाजूला तिचे पात्र झुकले असते तर सिनेमा अगदी सामान्य होऊन गेला असता. तो असामान्य झालाय त्याचे श्रेय प्रामुख्याने तिला आणि दिग्दर्शिकेला! स्वस्तिका मुखर्जीची आई पण मस्तच - तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय देणारी ! त्या दोघींपुढे इतर पात्रे लक्षात कमीच राहतात.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
शीर्शकात स्पॉयलर अलर्ट असे
शीर्शकात स्पॉयलर अलर्ट असे लिहिल्यास बरे होईल.
सुंदर परिचय माधव.
सुंदर परिचय माधव.
माझ्या मनात चित्रपट संपल्यावर अगदी हेच भाव आलेले. तुम्हाला धागा काढल्यासाठी धन्यवाद.
मलाही सगळ्यात जास्त काय आवडलं तर ग्रे शेड्स. नायिका आणि तिची आई दोघींच्या वागण्यात क्षणिक अनेक चुका जाणवतात पण ती हाडामासाची माणसंच दिसत रहातात. त्या चुका करायला त्यांची त्यांची काही कारणं आहेत. त्यांचं त्या परिस्थितीतील जस्टिफिकेशन आहे, आणि त्यांनाच मागे वळून बघताना झालेला आणि अत्यंत तरलतेने दाखवलेला पश्चात्ताप ही आहे. एक चांगला दुसरा वाईट असं अजिबात होत नाही आणि त्यामुळे ते जास्त आतवर पोहोचतं आणि आपण त्यातले प्रसंग रिलेट करू लागतो.
'उड जाएगा' बद्दल ही तेच. कुमारांचा इतका पगडा असुनही ती चाल ऐकुन चित्रपट बघताना ऐकत रहावी वाटलं होतं. नंतर शोधुन ऐकलं तर सुरुवातीला आवडलच, पण शेवट काहीसा नाही आवडला. तो शेवटचा पीस चित्रपटात आहे का आता आठवत नाही. पण एकुणच गाण्याची ट्रिटमेंट इट्रिगिंग आहे हे निश्चित.
आणखी एक.. बॅक ग्राऊंड स्कोर फारच उच्च आहे. मला बरोबर आठवत असेल तर पाश्चिमात्य प्रकारची मेलडी वाजत रहाते आणि भूमिकेची आणि आपल्या मनाची आंदोलनं होत रहातात. इथे हिंदुस्थानी गायकीचा वापर नाही असं त्याक्षणी जाणवलेलं आठवतंय. पण पहिल्यांदा बघताना कथा, चित्रिकरणावर मेंदूचा बराच भाग खर्च झाल्याने बॅकग्राऊंड स्कोर तितका अप्रिशिएट करता आला नाही. सो माझं चुकतही असेल. त्यासाठी परत एकदा बघितला पाहिजे.
स्नो, फ्लरीजचं चित्रिकरण फारच सुरेख आहे. हा असा भाग हिंदी चित्रपटांत फारच कमी बघितला आहे. काश्मिर मधल्या 'वादीमे' टाईप असतो अनेक चित्रपटांत, पण भकास अनादी अनंत स्नो, शब्दशः ग्रे शेडस आणि ग्रे वेदर ची पार्श्वभूमी मला फार आवडली. विस्तीर्ण पठारावर स्नो, निष्पर्ण झाडे, पिवळ्या प्रकाशाची ऊब, पण ती मनाच्या आत पोहोचते आहे का तिकडच्या ग्लूमी शेडस तशाच आहेत. (फायरप्लेस लावुन बघितल्याने मला बघताना त्याच खोलीत बसल्या सारखं वाटलं बहुतेक
)
छान लिहिलंयत, माधव आणि अमित.
छान लिहिलंयत, माधव आणि अमित. कालच पाहिला आणि आवडला.
वाह! बघेन नक्कीच.
वाह! बघेन नक्कीच.
छान लिहिलंयत, माधव आणि अमित <
छान लिहिलंयत, माधव आणि अमित <<+१
मुव्ही मस्तच होता, पण मला आईच अस मुलीला ईग्नॉर करणं, तिच्याशी अस वागणं जरा खटकलं...
छान परीक्ष ण. अजुन बघायचा
छान परीक्ष ण. अजुन बघायचा आहे.
वा माधव, अमितव खूप छान लिहिलत
वा माधव, अमितव खूप छान लिहिलत
माधव चित्रपटाची तरलता लिखाणातही उतरलीय.
कुठे बघता येईल हा चित्रपट?
आत्ता ती गाणी परत ऐकताना एकदम
आत्ता ती गाणी परत ऐकताना एकदम 'डिसायपल' आठवला. सामान्य कुवतीच्या गायकाची व्यथा या बाबतीत 'कला' शी समांतर आहे. आणि कदाचित वकुबाप्रमाणे आणि बधंनांप्रमाणे व्यक्त होण्यातही. दोघांच्या व्यक्त होण्यात फरक असला तरी मोरल कंपास इ. बाबतील अनेक समान धागे ही आहेतच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, नेफ्लिवर आहे.
सरदारी बेगम हा ही आई मुलगी
सरदारी बेगम हा ही आई मुलगी संघर्ष, ठुमरी गायन, त्यातील चॅलेंजेस, रेकॉर्ड कंपनीचे मॅनेजर सुरेख पिक्चर आहे इतका डार्क नाही व गाणी फार छान आहेत.
वॉव मस्त परीचय. बघणार.
वॉव मस्त परीचय. बघणार.
बुलबुल पासून तॄप्ती दिमरी खूप आवडते, अभिनय, चेहरा मस्त एकदम.
बुलबुल वर इथे धागा नाही का? नितांत सुंदर चित्रपट आहे, रुपकात्मक.
इथला रिव्यु वाचुन पाहिला.
इथला रिव्यु वाचुन पाहिला. चित्रिकरण आणि चित्रपट दोन्ही सुन्दर आहेत. शेवट मात्र पठडीतील केला असे वाटले. जे झाले ते होणारच होते पण त्याच्याकडे होणारा प्रवास जसा खिळवुन ठेवतो तसा शेवट ट्खिळवुन ठेवत नाही, अचानक आल्यासारखा वाटला.
छान परीक्षण. फक्त स्पोयलर
छान परीक्षण. फक्त स्पोयलर अलर्ट द्या.
दुसरे म्हणजे ९९% सिनेमात नायक / नायिकेच्या वाईट वागण्याचे उदात्तीकरण केलेले असते. ते या सिनेमात जराही नाही?////
परफेक्ट. मला तीच भीती होती की नायिका गुन्हेगार आहे पण तिला तरीही आवडून घ्या टाईप वळणावर कथा जाणार की काय. पण तसं केलं नाही हा सुखद धक्का होता.
बाकी मला सर्वच गाणी आवडली. आता युट्युबवर परत ऐकत आहे. चंदनलाल सन्याल चं character कुंदनलाल सैगलवरून घेतलं असावं का?
सर्व कलाकारांची कामं पण जबरदस्त. स्वानंद किरकीरेने एखादाच सीन असला तरी काय मस्त केलाय. वरूण ग्रोहर आणि ती नसीबन चा रोल करणारी अभिनेत्री पण घुसले आहेत भूमिकेत. विशेषतः नसीबन त्या काळातलीच वाटते. कला आणि उर्मिला तर प्रश्नच नाही. दोघी आवडत नाहीत, अगदीच नावडतही नाहीत- तो ग्रे स्केल त्यांनी अभिनयाच्या ताकदीवर सांभाळला आहे.
जगनच्या भूमिकेतील मुलगा ओळखीचा वाटत होता. नंतर कळलं की मी त्याचं काम आधी बघितलं नाहीये पण तो late ग्रेट इरफान खानचा मुलगा आहे. इरफान डोकावतो त्याच्यात.
एकच तांत्रिक डिटेल खटकला- सुरुवातीलाच कला आपलं कौतुक वृत्तपत्रात वाचत असते तेव्हा त्यात बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची बातमी आहे. पण ते १९६९ मध्ये झालं होतं आणि चित्रपटातील काळ फार तर १९४४- ५५ रेंजमध्ये असेल.हे एक वगळता बाकी तो जुना काळ मस्त उभा केला आहे. कला नावाचं स्पेलिंग असं का केलं हाही एक प्रश्न!
हा एक interesting लेख वाचनात
हा एक interesting लेख वाचनात आला या चित्रपटातील गाण्यांच्या निवड आणि placement बद्दल.
‘गुरू की करनी गुरू जायेगा, चेले की करनी चेला!’
तसंच Qala हे स्पेलिंग आणि
तसंच Qala हे स्पेलिंग आणि Qसाठी वापरलेला सिम्बॉल इन्टरेस्टिंग वाटला म्हणून सहज शोधला, तर हे सापडलं:
The three standard sex symbols in biology are male ♂, female ♀ and hermaphroditic ⚥; originally the symbol for Mercury, ☿, was used for the last.
अर्थात, त्यातला मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह, पण इथे वर्ड प्लेमुळे पाऱ्याचंही सूचन होतं.
‘कला’ (पात्र आणि art या अर्थीही gender biased वा gender dominated असता कामा नये. तिचा या चित्रपटातला संघर्ष, तसंच आवर्जून स्त्री सेक्रेटरी ठेवणं, इ. बरेच कंगोरे त्या पोस्टरमधल्या चिन्हात दडलेत एकूण.
फारच रोचक स्वाती!
फारच रोचक स्वाती!
hermaphrodite या अर्थी Q इन कला हे नाव तिच्या आईने नाव ठेवलं आहे. ते तिचा जुळा भाऊ प्रसववेदना सहन न होता न जगल्याने. आता 'क'लात तिची आई त्या दोघांना बघते आहे अर्थाने Q असेल का?
तिचा जेंडर संघर्ष काही प्रमाणात असेलच पण तो तितकाच. तिने जेंडरचा वापर शिडीसारखाच जास्त केला आहे.
हो शक्य आहे. व्यक्ती तितके
हो शक्य आहे. व्यक्ती तितके पर्स्पेक्टिव्ज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला जेन्डरचा भाग चांगलाच ठळक दिसला. तिच्याऐवजी/सह मुलगा जगला असता तर आई इतकी टॉक्सिक झाली/वागली असती? गायिकेच्या नावाआधी पंडिता पदवी लागायला हवी, नावापुढे ‘बाई’ नव्हे, हा कन्सर्न मुलाच्या बाबतीत असता? जगन सिनेमात गेलेला चालणार होता, नव्हे तीच धडपड होती, पण कलाला ती संधी घेतल्याबद्दल घर सोडावं लागलं. उमेदवारी त्यालाही करावी लागली असतीच, हिला अब्यूज सहन करावा लागला. हे सगळं जेन्डर रिलेटेडच नाही का? असो.
त्या पोस्टरमागे(ही) इतका विचार आहे हेच मुळात फार कौतुकाचं वाटलं मला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी अजून बघितला नाही. छान
मी अजून बघितला नाही. छान लिहिले आहे माधव .
अमितचा प्रतिसादही सुरेख आहे.
स्वाती , रोचक पोस्टी. खरचं एवढा विचार होता का त्यामागे. पाऱ्याचा संदर्भ कळाला नाही. पण सांगू नका, सिनेमाच बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ashu29 +1
हो, नक्की बघ - तुझाही take
हो, नक्की बघ - तुझाही take वाचायला आवडेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती
स्वाती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिची आई तिच्या जेंडर मुळे
तिची आई तिच्या जेंडर मुळे टॉक्सिक होती का गाण्यातील सामान्य वकुबामुळे अपेक्षाभंग झाल्याने अशी झालेली? बाई वि. पंडित हे अर्थात फक्त मुलीच्याच बाबतीत हे खरंच आहे. मुलाला हा प्रश्न पडलाच नसता. कारण गाणारी 'बाई' हा स्टिरिओटाईप. त्याबाबतीत पुरुषाला प्रश्न केले जात नाहीत आणि स्त्री हीच कायम स्खलनशील असते हीच धारणा त्या समाजाची होती (आणि कदाचित आजही, गाण्याच्या बाबतीत नसेल पण एकुणात नक्कीच आहे).
) चरित्रांत शालीनतेचा वारंवार उल्लेख करतात.... तर मुद्दा काय होता की तिची आई तिला 'बाई न होता पंडित हो' हे चित्रपटक्षेत्रात जाण्याबद्दल किंवा न जाण्याबद्दल सांगत नसून आब/ शालीनता/ मर्यादा याबद्दल सांगत होती असं मला वाटलं. त्याकाळच्या बाई पदवी लागलेल्या बायका चित्रपटात मुख्यत्त्वे गात नसुन शास्त्रीय बरोबर उप-शास्त्रीय संगीत प्रकार (ठुमरी, कजरी, होरी, टप्पा, दादरा इ. ) जास्त गात असाव्या असं वाटतं. आजही मैफिलीत बडाख्याल पटकन उरकुन उपशास्त्रीय जास्त गाणार्याकडे खालच्या नजरेनेच बघितलं जातं. आज यात जेंडरचा मुद्दा येत नाही, पूर्वी नक्कीच येत असेल.
त्याबाबतीत ना कला काही करू शकत होती ना की तिची आई. हिराबाईंच्या (बडोदेकर.. अनेग बाईच
जगनच्या बाबतीत मी थोडा कन्फ्युज आहे. तो आधी संगीत शिकुन त्याची शैली असलेला गायक होता. त्याचं चित्रपटांत एकही शास्त्रीय गाणं नाही. पहिलं पंजाबी बाजाचं गाणं नंतर उड-जाएगा.. इ. तो तिचा शिष्य ही नाही. त्याला पंडित होण्यास ती कधी सांगतही नाही. ती त्याला शिकवते आहे असा एकही शॉट चित्रपटांत नाही. त्याच्या गळ्याची फिरत- उपजत गाण्याची समज यावर ती फिदा झाली आहे. ती त्याची गुरू नसुन खाणीत सापडलेल्या हिर्याला प्रकाशात आणण्यापुरतीच आहे असं मला वाटलं. परत जगनच्या उपजत गुणांमुळे त्याला उमेदवारी करायला लागली असती का मला शंकाच आहे, कारण रेकॉर्डिंग कंपनीचा चालक त्याच्याकडे चालत आलेला होता. आणि तो ही इतका फिदा होता की जगन रेकॉर्ड करू शकत नसेल तर कोणीच नको अशी त्याची इच्छा होती. त्या रेकॉर्डिंग कंपनीच्या माणसाला इथे बोलावण्यात कुठेही जेंडर आलेलं न्हवतं. (का आलेलं होतं? रेकॉर्डिंग मालका बरोबर आई बेड शेअर करते का? नक्की आठवत नाही. आता परत विचार केला तर जगनच्या तोंडी आई ते (बेड शेअर करणे) माझ्यासाठी करते आहे असा एक संवाद आहे का? मला तसा संवाद ऐकू येऊन तेव्हा फारच विचित्र वाटलेलं.) त्यात ते जेंडर म्हणून आलं का फेवर म्हणून... सेक्ष्यल फेवर? आणि ते ही अगदीच टेकन फॉर ग्रांटेड प्रकारे दाखवलंय. त्या टेकन फॉर ग्रांटेड मधूनही फार काही सांगून गेलाय दिग्दर्शक/ लेखक.
कलात ते गुण अजिबातच न्हवते. तिचा अब्युज नक्कीच झाला. तिने तो अब्युज होण्यात सुरुवातीला पुढाकार घेतला कारण तिला कोणत्याही परिस्थितीत तिच्या आईसमोर स्वतःला सिद्ध करायचं होतं. वकुब नाही हे समजल्यावर आईने हाताला न लागतील ती स्वप्ने बघणे आणि मग ती आपलीच स्वप्ने आहेत समजुन कलाने ती साध्य करायचा ध्यास घेणे. ही मला ट्रॅजेडी वाटली.
जेंडरपेक्षा आडात नाही ते अपत्याच्या पोहोर्यात बघणे आणि त्यावरुन त्याला दोष देणे. आपल्या अपत्याला आहे तसा अॅक्सेप्ट न करणे, इतरांच्यात सतत ते गुण बघत रहाणे हा मला फोकस वाटला. आणि मग कलाच्या जागी मुलगा असता तरी बाई-पंडित या गोष्टी न घडत्या पण एकुणात ट्रॅजेडीत फार फरक पडला नसता असं वाटलं.
स्वातीची लिंक आत्ता वाचली.
स्वातीची लिंक आत्ता वाचली. त्यात जेंडर वर जास्त भर आहे.
>>> तिची आई तिच्या जेंडर मुळे
>>> तिची आई तिच्या जेंडर मुळे टॉक्सिक होती का गाण्यातील सामान्य वकुबामुळे अपेक्षाभंग झाल्याने अशी झालेली?
अमित, आईला गेलेल्या बाळाबद्दल सांगतात तेव्हा ती ‘बेटा था?!’ म्हणून दुःखी होते, नंतर मुलगी रडत असताना रिकामा पाळणा हलवत राहाते, आणि त्यातली छोटी उशी घेऊन… पुढे काय करू पाहते हे स्पष्ट दाखवलेलं नाही, पण सूचन केलं आहे.
आईचं स्वतःचं घराणं ठुमरी गायकीतलं होतं, आणि मुलीत ती गायकी आली आहे (असा उस्ताद कोणसंसं झालेल्या स्वानंद किरकिरेच्या तोंडी उल्लेख आला आहे, आणि तो तिचं कौतुकच करतो), पण आईला तिने वडिलांचा शास्त्रीय गायकीचा वारसा घ्यायला हवा आहे.
हा वकुबापेक्षा तिची नैसर्गिक गायकी कळूनसवरून दाबून टाकायचा प्रकार आहे. लहानशा चुकीबद्दल रात्रभर स्नोमध्ये उभं करणं टॉक्सिक नाही तर काय?
ती जगनच्या तोंडात थर्मॉमीटर देते त्यावर आई ‘संगीत से सगा संबंध होता तो समझती!’ म्हणते. का?! हा व्हर्बल अब्यूज नाही का?!
>>> जगनच्या तोंडी आई ते (बेड शेअर करणे) माझ्यासाठी करते आहे असा एक संवाद आहे का?
हो, दाखवलंही आहे आणि तसा संवादही आहे. आणि अशी आई तिला शीलाचे धडे देत असते!
>>> कलात ते गुण अजिबातच न्हवते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाऊ दॅट्स अनफेअर!
जगन पहिल्या परफॉर्मन्समध्ये जे निर्गुणी भजन गातो, त्यात ‘हर धुन गाओ निर्भव (निर्भय), हर धुन सुन निर्वैर’ म्हटलंय. तिच्या वाट्याला निर्भय होऊन गाण्याचं आणि निर्वैर कानांना ऐकवायचं सुख आलेलं नाही. आई जिवंत असून, किंवा असल्यामुळेच! उलट जगन अनाथ असून त्याला ते लाभलं आहे!
बाकीही कितीतरी निर्देश आहेत
बाकीही कितीतरी निर्देश आहेत जेन्डरकडे. ती फोटोग्राफर्सच्या गर्दीतून फीमेल फोटोग्राफरला पुढे बोलावते, संगीत दिग्दर्शिकेबरोबर काम करते, हट्टाने फीमेल सेक्रेटरी ठेवते आणि त्याबद्दल डायरेक्टर विचारतो तेव्हा ‘मुद्दाम फीमेल असा उल्लेख का करता’ म्हणून फटकारते. कवी मजरूहचं पेन्टेड नख नोटिस केलं का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईची व्यक्तिरेखा ग्रेच आहे.
आईची व्यक्तिरेखा ग्रेच आहे. सुरुवातीला तिला postpartum depression आलं असावं. ट्विन डिलिव्हरी आणि त्यात मुलगा जगत नाही. नवराही ती प्रेग्नन्ट असताना मरतो. That's a lot.
पण ती जमेल तसं मुलीला वाढवते. तिला पंडिता करण्याचा प्रयत्न करते. बर्फात उभं करणं दुष्टपणा खराच पण त्याकाळी गुरू अशा harsh शिक्षा द्यायचे. त्या काळच्या context मध्ये ते बसत असेल. मुलीत तो बापाचा सांगीतिक वकुब नाही हे कळल्यावर आई तो हट्ट सोडते. Next best option- प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातला अनुरूप तरुण बघून लग्न ठरवायला बघते. यामध्ये मुलीची सुरक्षा व लॉंग टर्म हिताचाच विचार वाटतो. त्या काळच्या context मध्ये बड्या घरी लग्न करून देणं हेच पालकांचं कर्तव्य. मुलगी नंतर जी compromises करते ती वेळ तिच्यावर येऊ नये असं आईला वाटणं साहजिक आहे.
मला एकूणच उर्मिलादेवी ही व्यक्तिरेखा intentionally कोणाचं वाईट करणारी नसल्यामुळे कलापेक्षा उजवी वाटली. मुलीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न. जगन कोण, कोणाचा हा विचार न करता त्याच्या टॅलेंटला platform देण्याचा प्रयत्न.
जेंडर आहेच. त्याबद्दल ना
जेंडर आहेच. त्याबद्दल ना नाहीच. पण मला पहिल्या बघण्यात तिच्या आईचं तिला घालुन पाडून बोलणे जेंडर मुळे नाही वाटलं. तिला मुलगा हवा होता सगळं ठीक आहे, पण तरीही. कलाला शेवटच्या घटकांत हेल्प मागुनही आई मदत करत नाही. शेवटी येते तेव्हा सुद्धा हेल्प तर सोडाच मेंटल हॉस्पिटल मध्येही घेऊन जाणार नाही करते. आता परत बघताना तू म्हणत्येस त्या दृष्टीने दिसेल कदाचित.
कला नक्कीच जेंडर हायरार्कीला डावलण्याचा कला प्रयत्न करतेच. शेवटी ती गेल्यावर ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत त्यात पण ती इतर दोन जणींबरोबर असते. ते शेवटचं गाणं पण भारी होतं. त्या जंगलातील मोराने स्वप्न पळवली तर त्याची बंदुकीने शिकार करायची का? तर नाही त्याला सायलेंट करायचं, पिंंजर्यात बंद करुन सायलेंट करायचं! सुन्न व्हायला होतं तेव्हा.
सबटायटल मुळे समजलं ते गाणं. नाही तर चालच लक्षात राहिली असती.
रंगवलेली बोटं वरुण ग्रोवरची असल्याने ती त्याचीच वाटली. वरुण ग्रोवर स्टँडअप मध्येही नखं रंगवतो आणि त्याला फॉलो करतो त्यामुळे तो मजरुह असुनही डोक्यात वरुणच होता.
एवढी चर्चा होते आहे हेच
एवढी चर्चा होते आहे हेच सिनेमाचं यश म्हणायचं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![2A69ED66-D12C-461A-A482-28504DBC55FB.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u186/2A69ED66-D12C-461A-A482-28504DBC55FB.jpeg)
हा एक मला फार आवडलेला शॉट, जगन त्यांच्या घरी येतो तेव्हाचा :
हा शॉट आहे तो त्या maze
हा शॉट आहे तो त्या maze puzzle सारखा दिसतो जे जगन कलाला देतो. तसं साधर्म्य दाखवणंही फार कल्पक होतं. Easter eggs for the audience.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळी स्टोरी नव्हती लिहीली आणि सस्पेन्स काहीच नाहीये म्हणून स्पॉयलर अलर्ट नव्हता दिला.
अमीत, हो ते भारतीय न वाटणार संगीत, आई लेकीचे किमोनोसारखे कपडे, ती गोल खिडकीवाली अॅटीकसारखी खोली आणि त्या फ्लरीज यामुळे चित्रपट भारताबाहेर घडतोय असे आधी वाटले होते मला. पण मग स्थळाचा उल्लेख आला.
व्हाईटहॅट, इरफान खानचा मुलगा आहे हे नव्हते माहीत. पण त्याची भूमिका लहान आहे त्यामुळे नीट लक्ष नाही गेलं त्याच्याकडे.
स्वाती, गुरू की करनी गुरू जायेगा, चेले की करनी चेला ही ओळ बहुदा चित्रपटातील गाण्यात नाहीये, असती तर खूप अर्थवाही असती. त्या गाण्यातला हंस यमानेच घट्ट पकडून ठेवलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो. चित्रपटात मलाही शेवटचं
हो. चित्रपटात मलाही शेवटचं कडवं आठवत नाही. 'गुरू की करनी' ची चाल मी नंतर ऐकली ती सुद्धा अजिबात आवडली नाही. समहाऊ मिसफिट आहे ती चाल पहिल्या अंतरा आणि एकुण वातावरणाशी असं वाटलं.
Pages