'मोकळा गुंता'

Submitted by वैवकु रीटर्न्स on 29 April, 2016 - 04:03

सहज प्रत्येक धागा वेगळा काढून झाला
असा हा 'मोकळा गुंता' कुणाहातून झाला

तशी तर स्क्रीनवर होती कुणी दुसरीच मुलगी
कितीवेळा तुझा मुखडा पुढे आणून झाला

किती दाटून येतो पण कुठे बरसून जातो
तुझा आवेग बहुधा कोरडा मान्सून झाला

कशाला अर्थ सांगू नेमका माझ्या मनाचा
तुला जो पाहिजे होता तुझा लावून झाला

तुला मिळणार नाही विठ्ठला माफी कधीही
मला हा रोग जो झाला..तुझ्यापासून झाला!

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार सर्वांचे

फाटक साहेब बर्‍याच महिन्यात तुमची एखादी नवी गझल वाचनात आली नाही ...लवकर येवूद्या

_/\_

वाह् वाह् व्वा!

मतला,मान्सून,मनाचा अर्थ...एकसर एक!

मतला तर लैच भारी ना!

_/\_