विनोदी कथा

सर्दी झालेली बाई (विनोदी कथा)

Submitted by माबो वाचक on 29 January, 2025 - 05:14

“दादेश, तूबी ऑफिददा गेदात तदी चादेद,” सीमा तिच्या गच्च झालेल्या नाकाला झंडू बाम चोळत म्हणाली.
“अजिबात नाही. काल मला सर्दी झाली होती तेव्हा तू माझी सेवा केलीस. आज तुला सर्दी झाली आहे, म्हणून मी घरीच राहून तुझी सेवा करणार.”
डोंबलाची सेवा करणार. माझे काम वाढवून ठेवले नाही म्हणजे नशीब. सीमा मनात म्हणाली.
“तू शांतपणे सोफ्यावर बैस पाहू. मी तुला चहा करून आणतो.” राजेश सीमाला म्हणाला आणि चहा करायला आत निघून गेला.

सर्दी झालेला माणूस (विनोदी कथा)

Submitted by माबो वाचक on 24 January, 2025 - 04:16

“सीबा, दिबोद दे.” आपले चोंदलेले नाक हलवीत राजेश म्हणाला.

राजेश सोफ्यावर मांडी घालून बसला होता. त्याने अंगावरून ब्लॅंकेट घट्ट ओढून घेतले होते. त्याच्या आजूबाजूला वापरलेल्या टिशूचा खच पडला होता. सर्दी झाल्यामुळे त्याने ऑफिसला आज दांडी मारली होती. सतत वाहणारे नाक व एकामागोमाग एक येणाऱ्या शिंका यांनी तो बेजार झाला होता. आणि त्याच्या एकामागोमाग एक येणाऱ्या मागण्यांनी त्याची बायको, सीमा बेजार झाली होती.

वर्क फ्रॉम ऑफिस

Submitted by निरंजन कुलकर्णी on 12 June, 2020 - 14:12

ब्रेकिंग बॅडच्या पाचव्या सिझनचा सहावा एपिसोड पाहता पाहता माझं ‘वर्क फ्रॉम होम’ चालू असताना फोन वाजला तसा माझा मुड ऑफ झाला. फोन माझ्या बॉसचा होता. “काय कटकट आहे” असं म्हणतच मी फोन कानाला लावला. “एप्रिलचा रिपोर्ट तू सकाळी पाठवणार होतास. अजून तुझा मेल नाही आला. आपल्याला पगार काम करायसाठी मिळतो रे. झोपा काढायसाठी नाही मिळत.” बॉस खोचकपणे म्हणाला. मला काय बोलावं तेच सुचेना. शेवटी मी कसाबसा बोललो, “सर रिपोर्ट तयार आहे. जरा भांडी घासत होतो. घासून झाली की लगेच मेल करतो.” समोरून शिव्या ऐकायची मनाची तयारी मी केव्हाच केली होती. पण झालं उलटंच. माझा बॉस अगदी शांतपणे म्हणाला, “अरे वा!

कथा माझ्या दहा कोटींची!

Submitted by पराग र. लोणकर on 31 March, 2020 - 04:40

दहा वाजताच्या ऑफिसला जाण्यासाठी बरोबर साडेनऊ वाजता आवरून मी वाड्याच्या बाहेर पडणार इतक्यात माझ्या दारासमोर एक आलिशान गाडी थांबल्याचा आवाज आला. आमच्या जवळजवळ पडायला आलेल्या वाड्याला अर्थातच त्या गाडीचे नाविन्य नव्हते. दर आठवड्याला एकदा तरी ती गाडी वाड्याच्या समोर उभी राहून वाड्याला एक प्रकारे शोभाच आणीत असे. नेहमीचेच झाले असले तरी वाड्यातील माझ्यासारखीच लोअर middle-class माणसे प्रत्येक वेळी त्या गाडीकडे कौतुकाने पहात, एखाद्या दिवशी आपणही अशा गाडीतून फिरू अशी स्वप्ने पहात आपापल्या कामास बाहेर पडत असत.

विषय: 
शब्दखुणा: 

स्वतःसाठी 10 मिनिटं

Submitted by कुलमुखत्यार on 21 February, 2019 - 02:44

काही दिवसांपूर्वी एक जवळच्या मैत्रिणीचा फोन आला,'अगं अगदी सहज केला ,बोलू पाचेक मिनिटं ' असं म्हणाली. ख्यालीखुशाली विचारून झाली,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि गाडी मुख्य मुद्द्यावर आली.

विषय: 
शब्दखुणा: 

२. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग दुसरा )

Submitted by सखा on 27 June, 2017 - 12:13

अडुम्बा देशाला निसर्गाचे जबरदस्त वरदान होते. रात्री एका सर्व साधारण हॉटेलात मुक्काम होता. रात्री जेवणात आपण जे चविष्ट सूप मिटक्या मारीत पिले ते रातकिड्याचे होते हे न कळाल्याने मास्तराचा आपण आजही अस्सल व्हेजिटेरियन आहोत हाच समज होता. रात्री झोपेत नाही म्हणायला बोकडेंच्या कानात एकदा वळवळत गोम गेली आणि मग कुणास ठाऊक मतपरिवर्तन होऊन ती स्वतःच रिव्हर्स घेऊन बाहेर आली वरील प्रसंग बाह्यजगात घडत असताना मास्तरांना आपण नयन बाई सोबत रंगपंचमी खेळत आहोत असे रोमँटिक स्वप्न पडत होते त्या मुळे गोम कानात जाताना साक्षात नयनबाई पिचकारीने कानात गुदगुल्या करत आहे असे त्यांना वाटले.

रावणाचे लग्न

Submitted by सखा on 1 June, 2017 - 08:42

समजा एखाद्या निबर रंगाच्या, मुच्छड आणि दांडगट माणसाला बघितल्यावर तुम्हाला दचकायला होत असेल आणि त्यातच जर त्याचे नाव रावण असेल तर, तुम्हाला काय वाटेल? अशा माणसा बद्दल तुमच्या मनात काय भाव निर्माण होईल? हे २०१७ साल असले तरी अशा वर्णनाचा रावण नावाचा माणूस हा सदवर्तनी, पापभीरु किंवा कवी हृदयाचा असेल असे तुम्हाला स्वप्नात तरी वाटेल काय? नाही ना?
मित्रहो हेच तर मला म्हणायचे आहे की सामान्य लोकच काय पण मोठे मोठे विद्वान आणि आताशा मला स्थळ म्हणून सांगून आलेल्या पुण्यातील सुंदर ग्रॅजुएट मुली देखील केवळ माझ्या नावा मुळे आणि बाह्यरूपा मुळे माझ्या बद्दल पूर्वग्रह दूषित मत बनवितात.

शब्दखुणा: 

फेसबुक चे बालगीत

Submitted by सखा on 14 May, 2017 - 02:43

वर्गात येताच आधी झापड मारणे हा माझा शिरस्ता आहे. त्या प्रमाणे मी वर्गात येताच पहिल्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला खणsकन काना खाली ठेवून दिली. या कृती मुळे दोन फायदे प्रामुख्याने होतात एक तर आपला शाळेतील दरारा वाढत जातो आणि मुख्य म्हणजे कुठलीही मुले वात्रट शंका विचारत नाहीत.
वर्गात चिडीचूप झाल्यावर मग मी शांतपणे मराठीचे पुस्तक काढले वाकून खिडकीतून तंबाखूची पिंक मारली आणि ओठाच्या कडा टिपीत कविता शिकविण्या साठी पुस्तक उघडले. नुकतेच पाठयपुस्तक महामंडळाने माझी चुकून एका रद्दी मासिकात छापून आलेली कविता "फेसबुक चे बालगीत" ही दहावीच्या अभ्यासक्रमात घेतली होती.

ना मारो पिचकारी

Submitted by सखा on 7 May, 2017 - 15:26

आपला कथा नायक पुण्यनगरी निवासी वीरभद्र या बत्तीस वर्षाच्या घोड युवकाला, लग्नासाठी अजिबात मुलगी न मिळणे, ही काही जागतिक दर्जाची समस्या नाही हे जरी मान्य असले तरी, त्याच्या आई-बापासाठी त्याला सांभाळणे ही नक्कीच समस्या होती.
एकदाचे लग्न झाले की या रागीट, हट्टी, तर्कट आणि स्वार्थी पोराला त्याची बायको फुल्ल टू सरळ करेल या भारतीय रूढीवर त्यांची अपूर्व श्रध्दा होती.

पायथागोरसचे अदभूत प्रकरण

Submitted by सखा on 24 December, 2015 - 03:20

बाहुबली धीवराने मृगनयनीचे अधीर अधर आपल्या तर्जनीने स्पर्शताच लाख लाख गुलाब उमलले…….

Pages

Subscribe to RSS - विनोदी कथा