अडुम्बा देशाला निसर्गाचे जबरदस्त वरदान होते. रात्री एका सर्व साधारण हॉटेलात मुक्काम होता. रात्री जेवणात आपण जे चविष्ट सूप मिटक्या मारीत पिले ते रातकिड्याचे होते हे न कळाल्याने मास्तराचा आपण आजही अस्सल व्हेजिटेरियन आहोत हाच समज होता. रात्री झोपेत नाही म्हणायला बोकडेंच्या कानात एकदा वळवळत गोम गेली आणि मग कुणास ठाऊक मतपरिवर्तन होऊन ती स्वतःच रिव्हर्स घेऊन बाहेर आली वरील प्रसंग बाह्यजगात घडत असताना मास्तरांना आपण नयन बाई सोबत रंगपंचमी खेळत आहोत असे रोमँटिक स्वप्न पडत होते त्या मुळे गोम कानात जाताना साक्षात नयनबाई पिचकारीने कानात गुदगुल्या करत आहे असे त्यांना वाटले.
थोडक्यात काय तर एकूणच बाकी झोप छानच झाली.
अडुम्बा देशात शहामृगाची सफर फार प्रसिद्ध. भारतात प्रवाशांना जसे उंट हत्तीवर बसायला आवडते तसे अडुम्बाचे लोक शहामृगावर बसणे पसंत करतात. पाळलेले बिचारे शहामृग फार प्रेमळ असतात म्हणे. योगायोग म्हणजे डॉक्टर आणि बोकडे मास्तर ज्या दोन शहामृगावर स्वार झाले ती दोघे साक्षात सख्खे नवरा बायको होते आणि लव्ह मॅरेज असले तरी गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी वाढल्या होत्या म्हणे. तिचे म्हणणे असे होते की त्याचे बाहेर काही तरी अफेअर आहे. तो बिचारा पापभिरू शहामृग असूनही मामुली मुर्गा असल्या प्रमाणे आपली कोठेही दुसरी मुर्गी नाही हे शपथा घेत सांगून सांगून कंटाळून गेला होता आणि त्याने आज फायनली ठरवून टाकले होते की संधी मिळताच या जालीम बये पासून दूरदूर जंगलात कायमचे पळून जाऊन संन्याशी व्हायचे. सुरवातीला संथ गतीने चालणारा हा शहामृग अचानकच असा जंगलाच्या दिशेने वेगात का पळू लागला हे काही मास्तरांना उमजेना. आपला नवरा नक्कीच त्या दुसऱ्या भवानी कडे जात आहे असे वाटून त्याची बायकोपण वेगाने त्याच्या मागे शिव्याशाप देत धावू लागली आणि रागाने मास्तरच्या पाठीला चोची मारू लागली. या गोंधळात तिच्या पाठीवरून डॉकटर मल्लम बदकन खाली पडले आणि उतारा वरून गडगडत नालीत जाऊन पडले. नाल्यातल्या काळ्या चिखलातून माखून डॉकटर मल्लम जेव्हा बाहेर आला तेव्हा तो जातिवन्त वेताळा सारखे दिसत होता. त्याला बघून दोनचार भूता सारखे दिसणारे अडुम्बावासी स्वतःच भूत भूत म्हणत घाबरून पळून गेले. इकडे पाठीवरचे मणभर वजन कमी झाल्याने शहामृगी अधिकच वेगाने आपल्या बेवफा नवऱ्याचा पाठलाग करू लागली. शहामृग देखील हा आपला शेवटचा चान्स असे मनात म्हणून जो काय बुंगाट पळाला की ज्याचे नाव ते. त्या झपाट्याने घाबरलेल्या मास्तरांनी शहामृगाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून डोळे गच्चं मिटून घेतले. आता आपला अडुम्बात नक्कीच गडुम्बा होतो असे समजून ते रामाचे नाव घेऊ लागले. मागे लागलेली क्रोधीत आणि जीवावर उठलेली बायको आणि गळ्याला फास मारून बसलेले हे लोचट परदेशी झेंगट या दुहेरी संकटाचा पिच्छा जवळपास तासाभराने सुटला. दाट जंगलात वाटफुटेल तिथे पळाल्यावर हा काही आता हाती लागत नाही हे उमजून एकदाची त्याची बायको मर मेल्या असे म्हणत अर्ध्या रस्त्यातून जुन्या प्रियकराकडे निघून गेली. दाट जंगलात एका ठिकाणी शहामृगाने थांबून मग आपले अंग असे काही जोरात झटकले की मास्तर उलटेपालटे होत एकदाचे धरणीवर तोंडघाशी पडले. आपल्या पाठी मागची आणि वरची ब्याद गेली म्हणून मुक्त शहामृग आनंदात लगेचच जंगलात गडप झाला.
मास्तर कसं बसे उठले आणि मनातल्या मनात म्हणाले:
-च्या मारी काय अवदसा आठवली आणि या अडुम्बाच्या प्रवासाला आलो? सगळी हाडं ठणकायलीत. ते शहामृग पण चांगलच नमुना भेटलं. येडचॅप सारखं पळतच सुटलं. हे काय साईट सीइंग झालं? काय लोकांचे एक एक प्रवास वर्णने आणि आम्ही काय लिहावं? सांडावर लँडिंग अन शहामृगाशी बॉन्डिंग?
(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग
२. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग दुसरा )
Submitted by सखा on 27 June, 2017 - 12:13
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप धम्माल लिहिलंयं. :हाहगलो:
खुप धम्माल लिहिलंयं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
भारीच आहे हे अॅडव्हेंचर.
भारीच आहे हे अॅडव्हेंचर.
सांडावर लँडिंग अन शहामृगाशी बॉन्डिंग
(No subject)
: हहगलो:
सांडावर लँडिंग अन शहामृगाशी बॉन्डिंग
मजा आली वाचून! पुभाप्र.
मजा आली वाचून!
पुभाप्र.
धन्यवाद!
धन्यवाद!
धमाल!
धमाल!
बापरे !! अफलातून लिहिलंय
बापरे !! अफलातून लिहिलंय इकडे हास्याचे शहामृग सुद्धा आमुचे चौफेर उधळले कि राव .....
तुडुम्ब हसतोय.
तुडुम्ब हसतोय.
आपल्या सारखे रसिक वाचक
आपल्या सारखे रसिक वाचक लेखकाला लाभले की लिहायला मजा येते. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद!
कसलं भारी लिहिलयं ...
कसलं भारी लिहिलयं ...
प्रचंड हसतीये
प्रचंड हसतीये
धन्यवाद!
धन्यवाद!
छान लिहलय. जाम हसले. पुढचा
छान लिहलय. जाम हसले. पुढचा भाग येउद्या लवकर.
काय लिहिता हो
काय तूफान लिहिता हो
धन्यवाद!
धन्यवाद!
ज्याचे नाव ते ! हाहा
ज्याचे नाव ते ! हाहा
जबरदस्त
जबरदस्त