अरबस्तानातील जातिवन्त उंटांनी देखील 'क्या बात है' असे म्हणावी अशी बोकलवाडीची ती रखरखीत दुपार. सेंट परशु महाविद्यालयातला तो आमचा सातवी ड चा कळकट्ट वर्ग आणि डोक्यावर डग मारत फिरणारा जुना पुराणा सिलिंग फॅन. मध्येच फॅनने कर कट्टक कर कट्टक असा आर्त आवाज केला आता मरतय हे मरतुकडं म्हणून वर पाहिलं तर मेलेल्या पेशन्टने, गचमन आंग झटकावं अन पुन्हा फ़क्कक-कन श्वास घ्यावा तसा पुन्हा पंखा सुरु झाला आणि डग मारू लागला.
अडुम्बा देशाला निसर्गाचे जबरदस्त वरदान होते. रात्री एका सर्व साधारण हॉटेलात मुक्काम होता. रात्री जेवणात आपण जे चविष्ट सूप मिटक्या मारीत पिले ते रातकिड्याचे होते हे न कळाल्याने मास्तराचा आपण आजही अस्सल व्हेजिटेरियन आहोत हाच समज होता. रात्री झोपेत नाही म्हणायला बोकडेंच्या कानात एकदा वळवळत गोम गेली आणि मग कुणास ठाऊक मतपरिवर्तन होऊन ती स्वतःच रिव्हर्स घेऊन बाहेर आली वरील प्रसंग बाह्यजगात घडत असताना मास्तरांना आपण नयन बाई सोबत रंगपंचमी खेळत आहोत असे रोमँटिक स्वप्न पडत होते त्या मुळे गोम कानात जाताना साक्षात नयनबाई पिचकारीने कानात गुदगुल्या करत आहे असे त्यांना वाटले.
वर्गात येताच आधी झापड मारणे हा माझा शिरस्ता आहे. त्या प्रमाणे मी वर्गात येताच पहिल्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला खणsकन काना खाली ठेवून दिली. या कृती मुळे दोन फायदे प्रामुख्याने होतात एक तर आपला शाळेतील दरारा वाढत जातो आणि मुख्य म्हणजे कुठलीही मुले वात्रट शंका विचारत नाहीत.
वर्गात चिडीचूप झाल्यावर मग मी शांतपणे मराठीचे पुस्तक काढले वाकून खिडकीतून तंबाखूची पिंक मारली आणि ओठाच्या कडा टिपीत कविता शिकविण्या साठी पुस्तक उघडले. नुकतेच पाठयपुस्तक महामंडळाने माझी चुकून एका रद्दी मासिकात छापून आलेली कविता "फेसबुक चे बालगीत" ही दहावीच्या अभ्यासक्रमात घेतली होती.
आपला कथा नायक पुण्यनगरी निवासी वीरभद्र या बत्तीस वर्षाच्या घोड युवकाला, लग्नासाठी अजिबात मुलगी न मिळणे, ही काही जागतिक दर्जाची समस्या नाही हे जरी मान्य असले तरी, त्याच्या आई-बापासाठी त्याला सांभाळणे ही नक्कीच समस्या होती.
एकदाचे लग्न झाले की या रागीट, हट्टी, तर्कट आणि स्वार्थी पोराला त्याची बायको फुल्ल टू सरळ करेल या भारतीय रूढीवर त्यांची अपूर्व श्रध्दा होती.
बाहुबली धीवराने मृगनयनीचे अधीर अधर आपल्या तर्जनीने स्पर्शताच लाख लाख गुलाब उमलले…….
चांद ओला ओला रे
पानं ओली ओली रे
नभ भुई ओलावलं
ओली रेख काया रे
ओली फुलं वाटा रे
ओली ओली धार रे
ओला गंध आला रे
अत्तराचा फाया रे
ओथंबले बघ मन रे
भिजलेले बघ तन रे
उन्हावर पावसाची
ओली ओली साय रे
ओल्या श्रावणात रे
येडं सपान भिजं रे
थंडी गींडी न लागू
धरी झाडी छाया रे
जराशीच उघडीप रे
गपगार रीप रीप रे
लगाबगा रे पहा निघ
ओल्या मोळ्या दोन रे
-सत्यजित खारकर