
"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.
सिनेमातील पर्यटन स्थळे ...
.... हा धागा सुरु करण्या चं कारण हेच आहे की ... आपण अनेक पर्यटन स्थळांना भेट देतो ती पर्यटन स्थळे सिनेमात 'कळत-नकळत' येत असतात उदा. 'हाय वे" सारख्या सिनेमात मनाली - सिमला ही कथेची गरज म्ह्णुन आलेली आहेत म्ह्णजे कळत ...... तर 'थ्री इडियट ' मध्ये सिमला येतो नकळतच ! ... या अशा गोष्टीची माहीती ची देवाण- घेवाण येथे व्हावी . अगदी श्रवणबेळगोळ एका सेकंदा साठी 'पीके' त दिसते.. ते गोमेटेश्वरा च्या दुधाच्या मस्तकाभिषेका साठी ! .. अशी माहिति/ उल्लेख केला तरी चालेल.
नागपूर सहल भाग २
'दोरांतो एक्सप्रेस' ने बरोब र ७.२० सकाळी नागभूमीत आगमन झालं .... १ल्या दिव शी दिक्षाभूमी व टेकडी गणपती ही ठिकाणी झाली. दोन्ही ठिकाणे नागपूरातील मर्मस्थाने म्ह्णून च ओळ्खली जातात .

नागपूरा त दोरांतो एक्सप्रेस' समोर एक चित्रपट्ट (फोटो)

ऑगस्ट च्या शेवटच्या हप्त्या त ' नागपूर ' ला जावे लागतंय .... १ दिवस नागपूर पहाण्यासाठी देता येईल ..
- येण्या-- जाण्याचे रेल्वे -- विमान असे रिजव्ह्रेशन झाले आहे ..
१) १ दिवसात नागपूर मधील काय पहावे
२) विमानतळ शहरापासुन कि ती लांब आहे
३) चूकवू नये असे काही ... नागपूर शहराविषयी सांगावे
नोव्हेंवर मधे थायलंडला ३ दिवसांची भेट देण्याचे ठरवलेय. बरोबर बायका-मुले आहेत, बँकॉकच्या आसपासची कोणती ठिकाणे फिरू शकतो? हॉटेल बुकींग बद्दल, तेथील साईटसिईंग च्या पॅकेज बद्दल..जी काही माहिती असेल ती द्या. भारता बाहेरचं 'सिटी लाईफ' बरेच बघितलेय, तेव्हा निसर्गाशी जवळीक असणारी ठिकाणं बघायला आवडेल. थायलंड मधे कुणी जास्त मायबोलीकर असतील असे वाटत नाही, त्यामूळे माहिती असणार्या कुणीही सल्ला दिला तरी स्वागतच!
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून निघाले. थोडा वेळ होता म्हणून नरिमन पॉईंट ते व्हीटी चालत आले. कुर्ला स्टेशनवर उतरून भाजी घेण्यासाठी बॅगमध्ये वॉलेट शोधू लागले तर वॉलेट गायब. मी ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभी राहते आणि बॅगवर कायम लक्ष ठेवून असते त्यामुळे बॅग मधून काढणेही कठीण होते. ऑफिसमध्येच राहून गेले असावे म्हणुन ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी डेस्क वर काहीच नाहीये असे सांगितले. म्हणजे ते ड्रॉवर मध्ये राहिले असावे असा विचार मनात आला. पण कदाचित तिथे नसेल तर , मी बँकेत गेले होते तिथे तर राहिले नसेल ना, त्यानंतर ऑफिस समोरच्या फूड जॉइंटवर इडली खाल्ली होती तिथे विसरले असेन तर...
भारताचा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. सिक्किम असं एकमेव राज्य आहे ज्याची सरहद्द भारताच्या दुसर्या एकाच राज्याशी आहे. ओके, ओके! ही क्विझ प्रोग्रॅमसाठी तयारी नव्हे. वीस वर्षांपूर्वी सिक्किममध्ये पेलिंग आणि वर्सेला गेलो होतो. म्हटलं अनुभव शेअर करावेत.
इथून ट्रेननी कलकत्ता, मग रात्रभरच्या ट्रेन प्रवासानंतर सिलिगुडी. तिथून आठ तास बस प्रवास – पेलिंग. वाचूनच दमल्यासारखं होतं खरं पण प्रत्यक्षात तसं नाही. ग्रुपबरोबर गेलं की आपल्यासारखेच बोलघेवडे आणि बोलघेवड्या बरोबर असतात. प्रवास मजेत होतो. नवीन ओळखी. नवीन गप्पा. नवीन अनुभव.
मुंबईहून कोईम्बतूरला सप्टेंबर २०१५ च्या मध्यात जाण्याचा विचार आहे. (४ दिवस)
हा प्रवास प्लॅन झाला आहे. पण तेथे काय पाहायचं (फिरायचं) काय नाही ते अजून ठरवायचं बाकी आहे,
आपण काही माहिती देऊ शकता का?
धोपटमार्ग नि न तुडवलेल्या पायवाटा... या दोन्हीबद्दल काही मार्गदर्शन, माहिती, सल्ले मिळाल्यास बरं होईल.
हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!