माझे एक नातेवाईक थायलंड टुर वर केसरी द्वारे चालले आहेत. केसरीने अर्थातच टुर व्हिसा देऊ म्हणुन सांगीतले आहे. पण त्याची फारच विचीत्र मागणी आहे.
आपण रजेवर आहात याचे एक कंपनीच्या लेटर हेडवर सही शिक्या निशी पत्र हवे आहे. आजकाल रजेचे अर्ज हे पोर्टलवर असतात. लेखी नसतात. ह्या नातेवाईकांच्या कंपनीचे हेड ऑफिस दिल्लीला आहे सबब असे पत्र पुण्याला तात्काळ मिळणे दुरापास्त आहे.
यावर दुसरा पर्याय केसरीनेच सुचवला आहे की वीसा ऑन अरायव्हल ज्याला रुपये २०००/- खर्च आहे.
केसरीने सुचवलेला पर्याय असल्यामुळे तो योग्य असेलच पण
१. असा वीसा ऑन अरायव्हल थायलंडला मिळतो का ?
२. तो मिळायला किती वेळ लागतो ?
नोव्हेंवर मधे थायलंडला ३ दिवसांची भेट देण्याचे ठरवलेय. बरोबर बायका-मुले आहेत, बँकॉकच्या आसपासची कोणती ठिकाणे फिरू शकतो? हॉटेल बुकींग बद्दल, तेथील साईटसिईंग च्या पॅकेज बद्दल..जी काही माहिती असेल ती द्या. भारता बाहेरचं 'सिटी लाईफ' बरेच बघितलेय, तेव्हा निसर्गाशी जवळीक असणारी ठिकाणं बघायला आवडेल. थायलंड मधे कुणी जास्त मायबोलीकर असतील असे वाटत नाही, त्यामूळे माहिती असणार्या कुणीही सल्ला दिला तरी स्वागतच!
थायलंड च्या पश्चिमेस एक छोटेसे गाव आहे - कांचनाबुरी. छोटेसे असले तरी तेथील व्याघ्रमंदीरासाठी (Tiger Temple) जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या युद्धाकैद्यांनी क्वाय नदीवर बांधलेल्या रेल्वे पुलामुळे सुद्धा ते प्रसिद्ध आहे. कांचनाबुरी ची आमची भेट अविस्मरणीय झाली ती व्याघ्रमंदिरामुळे. एका बौद्ध मठात (monastery) अनेक अनाथ आणि सुटका केलेले वाघ तेथील धर्मगुरूंनी पाळले आहेत. तो मठ म्हणजेच हे व्याघ्रमंदिर. बौद्ध धर्मामध्ये धर्मगुरूंना दान करणे खूप मोठ्या पुण्याचे काम समजले जाते. थाई लोक आधुनिक असूनही फार धार्मिक आहेत. धर्मगुरूंना थाई समाजात फार मनाचे स्थान आहे.
आपल्यापैकी बरेच जण थायलंड ला जाऊन आले असतील. तसा हा देश एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. स्वछ बीचेस, वॉटर स्पोर्टस, हत्ती, आणि पट्टायातील नाईटलाईफ या गोष्टी सर्वश्रुत आहेत. इथे येणार्या पर्यटकांमधे भार्तीयांचा भरणा लक्श्णीय आहे. भारतीयांच्या भटकंतीवरच इथला अर्धा पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे असं म्हट्लं तर वावगं ठरणार नाही.
मी नुकताच माझ्या लग्नानंतर हनीमून ला थायलंड ला गेलो होतो. ६ दिवसांची आमची ही वारी होती. तिथे तसे बरेच चांगलेवाईट अनुभव आले पण हा एक मात्र अगदी शेअर करायलाच पाहिजे असा वाट्ला.