कांचनाबुरी व्याघ्रमंदिर, थायलंड
Submitted by सुमुक्ता on 23 September, 2014 - 04:35
थायलंड च्या पश्चिमेस एक छोटेसे गाव आहे - कांचनाबुरी. छोटेसे असले तरी तेथील व्याघ्रमंदीरासाठी (Tiger Temple) जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या युद्धाकैद्यांनी क्वाय नदीवर बांधलेल्या रेल्वे पुलामुळे सुद्धा ते प्रसिद्ध आहे. कांचनाबुरी ची आमची भेट अविस्मरणीय झाली ती व्याघ्रमंदिरामुळे. एका बौद्ध मठात (monastery) अनेक अनाथ आणि सुटका केलेले वाघ तेथील धर्मगुरूंनी पाळले आहेत. तो मठ म्हणजेच हे व्याघ्रमंदिर. बौद्ध धर्मामध्ये धर्मगुरूंना दान करणे खूप मोठ्या पुण्याचे काम समजले जाते. थाई लोक आधुनिक असूनही फार धार्मिक आहेत. धर्मगुरूंना थाई समाजात फार मनाचे स्थान आहे.
शब्दखुणा: