आपल्यापैकी बरेच जण थायलंड ला जाऊन आले असतील. तसा हा देश एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. स्वछ बीचेस, वॉटर स्पोर्टस, हत्ती, आणि पट्टायातील नाईटलाईफ या गोष्टी सर्वश्रुत आहेत. इथे येणार्या पर्यटकांमधे भार्तीयांचा भरणा लक्श्णीय आहे. भारतीयांच्या भटकंतीवरच इथला अर्धा पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे असं म्हट्लं तर वावगं ठरणार नाही.
मी नुकताच माझ्या लग्नानंतर हनीमून ला थायलंड ला गेलो होतो. ६ दिवसांची आमची ही वारी होती. तिथे तसे बरेच चांगलेवाईट अनुभव आले पण हा एक मात्र अगदी शेअर करायलाच पाहिजे असा वाट्ला.
वेल, इथ्ल्या दुकानदारांना गिर्हाईकाची कदर नाही हे आम्ही पहिल्या २ दिवसात्च ओळखलेलं. मग ४थ्या दिवशी आम्ही एका दुकानात गेलो. अमक्यातमक्यासाठी घ्यायला काही सोव्हिनिअर्स मिळतात का ते सहज बघायला. दुकानात शिरून आम्ही एक एक गोश्टी न्याहाळत होतो. एक थाई मुलगी (थायलंड मधे मुलंही मुलींसारखी, किंबहुना, जास्त सुंदर दिसू शकतात तेव्हा....) आमच्या मागेमागे फिरत होती. तिच्या परीने ती सेल्सवुमन चा रोल निभावत होती. एक दोन गोष्टींची जेव्हा आम्ही किंमत विचारली, तेव्हा मात्र तिला काय झालं कुणास ठाऊक पण तिने करवादून प्रश्न केला,"दू यू वांत तू बाय ओर नात?" माझी सटकली. मी म्हटलं चल चायला आत इथून घ्यायचंच नाही काही. मी निघालो. उगाच वाद घालण्याच्या किंवा प्रत्युत्त्र करण्याच्या फंदातही पडलो नाही. तर, त्यावर न थांबता, ती मुलगी आम्ही दारापर्यंत पोचताच मोट्याने आमच्या मागे येऊन ओरडली, " गो तू इंदिया ..."
असे अनेक अनुभव गाठीशी घेऊन येणारा मी कुणी त्या ट्रिप बद्द्ल विचारताच सांगतो की जागा चांगली आहे, समुद्र सुरेख आहेत, भाषेचा प्रॉब्लेम खूप, व्हेजवाल्यांसाठी वाळवंट, आणि तिथली माणसं...... भ भा भि भी भु भू भे भै भो भौ भं भ:
---------------------------------
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.
थायलंडमधल
थायलंडमधल्या सदाशिव पेठेत पोचला होतास की काय ?
अरे बाप रे !
अरे बाप रे !
हा अनुभव
हा अनुभव प्रातिनिधिक नाहि म्हणता येणार. साधारणपणे पर्यटकांशी कोणी असे वागत नाही. अलिकडे तिथे झालेल्या राजकिय घडामोडींमूळे हे असेल.
उघड जाहिरात होत नाही अशि एक काळीकुट्ट बाजू थायलंड्ला आहे. पण एक बाजू तितकिच सुंदरही आहे.
असू शकेल.
असू शकेल. व्यक्तिसापेक्ष अनुभव मात्र बहुतांशी वाईटच आले. काय करणार.
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.
तिला पगार
तिला पगार मिळाला नसेल, म्हणून असे करत असेल
ती
ती काळीकुट्ट बाजू जी आहे त्यावर बहुतांशी लोकांचे संसार आहेत. त्यामुळे पर्यटक त्यांना हवेच असतात. तेव्हा हा अनुभव एखादा वेगळा अनुभव म्हणूनच केवळ घ्यावा.
असे म्हणजे अगदी भारतीय असण्यावरून नाही पण जवळपासचे अनुभव आपल्याला मुंबईच्या अनेक महागड्या मॉल्स आणि शोरूम्स मधेही येतात.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
हं. *********************
हं.
*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.
अशा ठिकाणी
अशा ठिकाणी एक पैशाचीही खरेदी करू नये असे मला वाटते.
.
.
नी म्हणते
नी म्हणते तसे अनुभव मला पण देशात मॉल मधे आलेत. इथुन देशात गेले की तिथे लोकाना लगेच २ वर्षे जुने ड्रेस कळतात (फॅशन्/कापड). मग यांना काय परवडणार आहे असे बघितले जाते. आम्ही दोघे स्पष्ट मराठीमधे बोलतो त्यामुळे असेल आम्ही अजुनच गावंढळ वाटतो त्या मॉल मधे
आणि लक्ष्मीरोडवर तर २-३ दुकानात त साडी ७०० ची आहे परवडणार नाही असे ऐकवलेय मला! तेव्हापसुन पुढे मी लक्ष्मीरोडवर कधी गेले नाही.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
तेच तर
तेच तर चुकत मराठी माणसाच अन महाराष्ट्रात धंदा करणार्याचं.. ग्राहकांना underestimate करण्याचं.

वरसारखे मलाही अनुभव आले होते, जास्त बघायला मागू लागलं की ते वरच्या रेंजमधलं आहे अस सांगतात, मुळात आधी जवळपास दरडावून कितीपर्यंत हवय ते विचारतात. ते योग्यच नाही का पण? म्हणजे आपला अन त्यांचाही वेळ वाचतो.. मानापमान काय ठेवायचा त्यात?
अर्थात महाराष्ट्रात पुण्याला खरेदीचा योग आला नाही अजून.. ऐकून आहे पण खुप
इथ बघा गुजरातेत मॉल्स मध्ये सुध्दा तुम्ही भले २००-३०० ची खरेदी करो अथवा अजिबात काही न घेवो असा वरल्यासारखा अनुभव येत नाही..
एक्झॅक्टल
एक्झॅक्टली !
मी अमेरिकेतही जाऊन मोठ्या मोठ्या मॉल मधून नुसतच फिरून आलेलो. किंमत विचारणं हा धर्म आहे गिर्हाईकाचा.
एकदा मलाही म्हणालेला एक माणूस. मी एका शर्टाकडे बोट दाखवून म्हटलं की ये दिखाओ. म्हणे की वो मेहेंगा है. ' ******* म्हटलं तुला काय करायचंय???'
असो.
इंडिया ! हेच उत्तर आहे याला. ना महाराष्ट्र ना गुजरात. इंडिया !!!!!
*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.
देशात काय,
देशात काय, इथल्या ईंडियन रेस्टॉ. मध्ये पण बरेचदा गोर्यांना चांगली आणि आपल्याला आप्ल्याच लोकांकडून ढिली सर्विस मिळते! एक फटका द्यावासा वाटतो अशा वेळी त्या हॉटेलमालकांना.
हाहाहाहाह
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा !
*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.
लायकी नाही
लायकी नाही या माणसांची दुसरं काय !
*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.
हा
हा प्रातिनिधिक अनुभव नसावा...
>> देशात काय, इथल्या ईंडियन रेस्टॉ...आपल्याला आप्ल्याच लोकांकडून ढिली सर्विस मिळते!
एका भारतीय हॉटेल मालकानेचं मला सांगितलं की त्यांना भारतीय ग्राहक पसंत नाहीत कारण ते जेवणाला नावं ठेवतात. गोर्यांना आपल्या जेवणाची खरी चव माहीती नसते त्यामुळे त्यांना टोपी घालणे सोप्पे पडते.
मिनोती,
मिनोती, अॅना,
मला आलेला अनुभव हा मुंबईतला आहे. अट्रीया मॉल(नेहरू सेंटरशेजारी वरळी) आणि हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल (तुळशीपाइप रोड परळ) इथला. हे चकचकीत मॉल्समधलंच आहे. पुण्यामधे आणि मुंबईतल्या जुन्या प्रकारच्या दुकानांमधे मला तरी कधी कोणी हे महाग आहे परवडणार नाही असं सांगितलं नाही हो. माझ्या व्यवसायामुळे मी भरपूर वेळेला आणि विविध ठिकाणी कपडे खरेदी करत असते पुण्या मुंबईत. असो.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
माझ्या
माझ्या चुलत नणंदेच्या लग्नासाठी माझ्या नणंदेला रेडिमेड सलवार सुट घ्यायचा होता. दादरला रानडे रोड वरील सर्व दुकानांध्ये अतिशय वाईट अनुभव आला. गिर्हाईकाला बांधून ठेवण्या ऐवजी लवकरात लवकर पळवून कसे लावता येईल याचा प्रयत्न ते करत होते की काय असे आम्हाला वाटू लागले. माझ्या नणंदेने ठरवूनच टाकले की दादरला काही खरेदीच करायचे नाही. मग मालाडला आणि चेम्बुरला जावून कपडे घेतले.
पुण्यातल्
पुण्यातल्या प्रसिद्ध सोनाराच्या दुकानात असा अनुभव मला कित्येकदा आलेला आहे. एखादं डिझाइन दाखवा म्हंटलं की तत्परतेने "त्याचे वजन जास्त आहे" म्हणतात. एकदा तर मी मोठ्याने "मला नकोच आहेत कमी वजनाचे नग तेव्हा दाखवा बिनधास्त" असे म्हंटले होते. तसेच अनुभव साड्यांच्या दुकानात पण आलेत.
तसेच अनुभव
तसेच अनुभव साड्यांच्या दुकानात पण आलेत.
>>>>
साड्यादेखील कमी वजनाच्या दाखवतात? ऐ. ते. न.
कुवैतहून
कुवैतहून मायबोलीकर अश्विनी आली होती, ती आणि मी दादरच्या धि गिरगाव पंचे डेपो मधे गेलो होतो. तिला नाटकासाठी काहि सोवळी, शेले हवे होते. आम्ही रंग निवडले. पण शिवायला वगैरे परत त्याना दिले. तिला परत जायचे होते म्हणून मी ते कलेक्ट करुन तिला पाठवायचे असे ठरले.
मी ते घ्यायला गेलो तर मला त्यानी तासभर तंगवलं. चार फेर्या मारायला लावल्या.
मग मी पण त्याना अर्धा तास सुनावलं.
मायबोलीवर लिहीन म्हणुन धमकी दिली.
-
-
-
ती आज पूर्ण करतोय.
पण सुदैवाने, परदेशी मला असा अनुभव आला नाही.
नाहि म्हणायला ऑकलंडच्या एका हॉटेलात गोर्यांचा ग्रुप आल्यावर आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,
तर आम्ही पण त्याना सुनावून बाहेर पडलो
आणि घरी येऊन, मस्त झुणका भाकर करुन खाल्ली.
ami79, दादरला रानडे रोडला मला
ami79, दादरला रानडे रोडला मला तरी अजून असा अनुभव आलेला नाही पण येणार नाहीच असंही नाही. मी माझी खरेदी शक्यतो "सिमरन" मधून करते. मागच्या महिन्यात नाईटवेअर घेतलं तर त्या काऊंटरवरच्या माणसाने इतका ढीग समोर उभा केला की मला आणि आईलाच वाटलं बिचार्याला आता एव्हढे घडी करून ठेवायला लागतील. आणि खूप छान व्हरायटी. सिलेक्ट करायलाच वेळ लागला.
वर खरेदी झाल्यावर "ताई, टॉप्स नकोत का" हे सुध्दा विचारलंन.
dineshvs, धि गिरगाव पंचे डेपो मध्ये नेहेमीच उपकार केल्यासारखे वागवतात. मागे पंचे घ्यायला गेलो होतो तर काऊंटरखाली इतके जुने पंचे ठेवले होते की ते स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत की काय अशी शंका यावी.
स्वप्ना, ते जुने नसतात. ते
स्वप्ना, ते जुने नसतात. ते हातमागाचे असतात. आणि अनब्लिच्ड धाग्यांचे. किंवा मग मांजरपाटाचे त्यामुळे त्यावर मळकट शेड असते.
पर्यटण स्थळी येणारे गिर्हाइक
पर्यटण स्थळी येणारे गिर्हाइक / पर्यटक बहुतेक करुन एकदाच येणारे असतात, पुन्हा त्याच पर्यटण स्थळी तेसुद्धा त्याच दुकानात जाण्याची खुपच कमी शक्यता, ह्या एवढ्या assumption वर हे सगळे व्यवसाय चालतात आणि ही असली हिणकस वागणुक दिली जाते, तुमच्याशी कसेही वागले तरी तुम्हि काही रोज रोज तिथे जाणार नसता, त्यांना feedback ची गरजही नसते आणि त्याने काहीही फरक पडत नाही.
मग मी पण त्याना अर्धा तास सुनावलं.>>
अभिनंदन दिनेश, बरेच लोक 'जाउ दे कुठे मुड खराब करुन घ्यायचा' म्ह्णुन सोडुन देतात आणि ह्या लोकांना अजुन माज येतो.
कदचित एक पातळी खाली उतरुन पण सुनावलं पाहिजे, फरक पडु शकेल.
स्वप्ना राज, चांगला अनुभव
स्वप्ना राज, चांगला अनुभव लिहीलात, बरे केले.
अहो वाईट अनुभव काय लिहीता, जग काही एव्हढे वाईट नाही. वाईट अनुभव विसरून जा, त्या दुकानात पुनः जाऊ नका. त्यांना जशी गिर्हाईकांची पर्वा नाही तशी आपल्याला तरी त्याच दुकानात जायचे काय अडले आहे?
अमेरिकेतून भारतात गेल्यावर मी दुकानदार काय करतो, बोलतो यापेक्षा मला काय हवे आहे ते मिळते का बघतो, नसेल तर गेले ते दुकान नि दुकानदार खड्ड्यात.
जगाला शहाणपणा शिकवायला, जग सुधारायला मला पुरेसे पैसे मिळत नाहीत.
तसेच अमेरिकेत सुद्धा भारतीय रेस्टॉरंट, दुकाने टाळतो. फक्त ग्रोसरीच्या दुकानात जातो. हवे ते मिळाले तर घेतो नाहीतर अडत नाही.
मात्र जर सारखा वाईटच अनुभव येत असेल तर जरा "आरशात पहा". म्हणजे जरा स्वतःचेच काही चुकत नाही ना?
काय शब्द वापरले, बोलण्याची पद्धत काय वगैरे.
मी असे केल्यावर मला सांगण्यात आले की मी भारतीयांशी बोलू नये. खरे तर मी इथे पण कधीच येऊ नये असेहि बरेचजण म्हणतात. पण मला राहवत नाही, मी येतो. तुमचे तुम्ही बघून घ्या, अगदीच रागावला तर तुम्ही जा मायबोली सोडून.
१९९९ सालातील गोष्ट. तेंव्हा
१९९९ सालातील गोष्ट. तेंव्हा आम्ही सिंगापूर येथील मार्केट पाहत भटकत होतो. तेंव्हा एका कार्पेट/उंची गालिचे असलेल्या शोरूम मध्ये गेलो.खरे तर विंडो शॉपिंग होते. पण आत जाताच तेथील सेल्समन ने असा काही लूक दिला कि बस्स ! जणू काही ,यांना गालिचे/कार्पेट यातले काही कळते तरी का ? त्या लूकचा असा राग आला कि आता त्याला खरोखर पिडायाचे ठरवून चागला अर्धा पाऊण तास विविध गालिचे पाहिले,किमती विचारल्या. त्या नंतर व्हरायटी कमी आहेत असा लुक देत तेथून बाहेर निघालो. तेंव्हा दुकानाचा मालक धावत आला , त्याचा अविर्भाव पण इतका वेळ घेतलात आणि तसेच का निघालात ? असा होता .
तेंव्हा त्याने काय हवे ? बजेट किती ? असे प्रश्न केले . त्यावर आपल्या दुकानात फक्त दोन ते अडीच लाख रुपये याच रेंज मधील माल आहे, त्यामुळे काहीच ठरवता येत नाही असे सांगितले. त्यावर तो म्हणाला तुम्ही काय पाहताय आणि आम्ही जोरात सांगितले आम्ही पर्शियन गालिचे/ कार्पेट यात इंटरेस्टेड आहोत. त्यावर तो नम्रतेने म्हणाला त्याची रेंज चार ते पाच लाख अशी आहे त्यामुळे तो माल नाही ठेवत फारसा. आणि मग त्या सेल्समनला माल नाही मग जावू का दुसरीकडे ? असा प्रश्न केला आणि बाहेर पडलो
एका गोष्टीबद्दल माझे एकमत आहे
एका गोष्टीबद्दल माझे एकमत आहे की पुण्यातील तसेच बर्याच इतर शहरातील दुकानदारही " दुकान उघडून बसलोय" म्हणजे "गिर्हाईकावर" उपकार करतोय असे वागतात. त्यान्चे समोर "माज" केल्याशिवाय उपाय नसतो. आता असा "माज" कसा करायचा या वर स्वतन्त्र लेख लिहीता येईल.
पण ही बाबही खरी आहे की तुमची रास/नक्षत्र अन त्या दुकानदार/सेल्समन-वुमनचे रास्/नक्षत्र जर जुळत नसेल, षडाष्टक असेल, वा तुमचा प्रथमेश/सप्तमेश त्याचे षष्ठ/अष्टम/व्यय भावात बिघडलेला असेल, तर काहीऽऽही कारण नसताना अशांबरोबर सूर कधीच जुळत नाहीत असा अनुभव आहे, एका चष्म्याच्या दुकानदाराबरोबर शेवटी मी त्याच्या कुंडलीचीच चर्चा करुन या मुद्द्याची खात्री करुन घेतली.
याव्यतिरिक्त, तुम्ही कुठेही जाऊन कुणाही अपरिचिताला प्रथम भेटता, तेव्हा किती "निगेटीव्ह" तसेच "अहंमन्य" विचारान्ची पुन्जी तुम्ही प्रसारित करीत असता यावरही समोरच्याचे वागणे बदलु शकते असा सार्वत्रिक अनुभव आहे.
तुम्ही केवळ कसे कपडे घातलेत्/किती "रुबाबात" वगैरे गेलात याला काडीचीही किम्मत नसते. समोरची कोणतीही व्यक्ति सर्वाधिक प्रभावित होते ती केवळ अन केवळ तुमच्या नजरेतील दरार्याने, अन नजरेतील दरारा हा कोणत्या रन्गाच्या कॉन्टीक्टलेन्स/मेक अप वगैरेने येत नसुन तो तुमच्या विचार/बुद्धिमत्ता या द्वारे निर्माण होणार्या ठाम निर्णयक्षमता असलेल्या वैचारिक भुमिकेमुळेच येत असते. अर्थात हा "दरारा" कुठे वापरायचा, कुठे नाही याचेही तारतम्य असायलाच हवे. असो.
तसा हा गहन विषय आहे. अन या अशा अनुभवास कारण आपण स्वतःच असतो असे माझे मत बनत चालले आहे.
अन दुसरे कारणीभूत असलेच, तर अशा दुसर्यान्ना माबोवरील प्रसिद्ध अशी "अनुल्लेखाची लागण" झालेली असल्याने समोर जितीजागती व्यक्ति असुनही तिचा दुर्लक्षाद्वारे अनुल्लेख करण्याची तापसदृष विकृती निर्माण झाल्यानेही असे होऊ शकते असे माझे मत.
खरेदिला सिंध्यांच्या अथवा
खरेदिला सिंध्यांच्या अथवा मारवाड्यांच्याच दुकानात जावे असे माझे सपष्ट मत हाये. दोन पैसे जास्त उकळतात पन मीठी छुरी मानेवर फिरवूनच !
वो बेदर्दीसे सर काटे 'अमीर'
और मैं कहूं हुजूर आहिस्ता , जनाब आहिस्ता ....