सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?
नाम महाधन
नाम महाधन । देवोनिया भक्ता । केले जी कृतार्था । मायबापा ।।
नाम मुखी येता । लाभे महासुख । जीवासी क्षणिक । प्रभू भेटी ।।
ह्रदी ठसावता । नाम तुज कृपे । संसार नाशिजे । पूर्णपणे ।।
नामरुप जीव । होताचि समाधी । विराली उपाधी । जीवत्वाची ।।
तुजकृपे नाम । राहो मज चित्ती । उरेचिना खंती । ऐहिकाची ।।
देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
दवाखान्याचं कॅनटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतोत.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.अाईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो ,वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून अाईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळून गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्यची अटळता माणसाला कळू लागते.
देव आजारलाय
माणसात सतत राहून
देव आता आजारलाय
गाभाऱ्याला छोटसे दार
एकच छोटा झरोका
अव्याहत लोक येरझार
श्वासही कोंडलाय
देव आता आजारलाय
धूप , उदबत्त्यांचा धूर
वर हार फुलांचा पूर
जीव गुदमरलाय
देव आता आजारलाय
पुजाऱ्यांची रोजची कटकट
घंटेची कर्णकर्कश सूरावट
हे हवे ते हवेची वटवट
ऐकून जीव विटलाय
देव आता आजारलाय
अंधार पांघरून झोपलाय
समईच्या उजेडात निश्चल
नैवद्यही घशाखाली उतरत नाय
देव आता आजारलाय
या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.
अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?
देव भक्त
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत
देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण
भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...
खेळिया
खेळ मांडूनि पुढ्यात
गेला कळेना कोणास
खेळामधे दंग सारे
माथी एक कासाविस
कधी हासूनी मजेत
कधी रडती जोरात
त्याच सार्या विवंचना
एकरूप त्यात मस्त
धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन
विचारती अांत अांत
कोण खेळिया महान
खेळियासी ओळखता
मनी कौतुक दाटले
रूप मनींचे अाघवे
उभे पुढ्यात ठाकले
खेळियाने विचारले
कोण व्हावे सांगा फक्त
हासोनिया संत बोले
देव तूचि, मी तो भक्त....
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "