देव

देवाला ठाऊक आहे....

Submitted by मिडासटच on 6 April, 2012 - 08:37

देवाला ठाऊक आहे, गरज प्रत्येकाची...
जयजयकार करणार्‍याची आणि खर्‍या मनांची..
त्याला ठाऊक आहे, गरज एकेकांची..
ज्यांचे विचार, जवळ सदैव असणार्‍यांची,

तो जाणतो, कुणालातरी, आहे गरज दयाळुपणाची,
एक हात मदतीचा, हात उधार देणार्‍याची,
कुणी स्वखुशीने, वेळ देणार्‍याची,
पर्वा करणार्‍याची, काळजी घेणार्‍याची,

देवाला ठाऊक आहे, गरज प्रत्येकाची...
प्रत्येक दिवस, आनंदात साजरा करण्यासाठी,,
गरज आहे, खंबीर मनाची, साहसाची,,
छातीवर पहाडासारखे दुखः झेलण्यासाठी,

देवाला जाण आहे, खरे अन् खोट्याची,,
जवळ असणार्‍याची, अन् दुर जाणार्‍याची,
देवाला जाण आहे, प्रत्येकांच्या दुखःची,,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गर्भपात करणारी आई, ती वेडी बाई (़गर्भातल्या लहानग्या मुलीची खंत)...

Submitted by आठवणीतला मी.... on 28 February, 2012 - 06:55

{ आई आणि तिला गर्भपात करायला लावना-या त्या लोकांसाठी गर्भातील त्या लहान मुलीने हे तर म्हणले नसेल ना????}

प्रिय,
*
प्रिय मा़झ्या आईस हे माझं अखेरच पत्र,
ते डॉक्टरांचे कसले ग होते पोट तपासण्याचे यंत्र.
*
आई माझ्या येण्याची तुला लागली होती चाहुल,
मग का उचललेस सांग तु गर्भपाताचे हे पाऊल.
*
वाटलं नव्हंत मला तु अशी भेदशील,
़जन्माला येण्याआधिच माझ्या काळजात छेद करशील.
*
वाटलं नव्हंत मला तु एवढ्या लवकर सोड्शील,
दोघांमधली जुळलेली नाळ एवढ्या लवकर तोडशील.
*
त्या नराधम लोकांनी आणली तुझ्यावर गर्भपाताची वेळ,
तु नव्हता कारायला पाहिजे माझ्या जिवनाशी खेळ.
*

गुलमोहर: 

कलियुग

Submitted by रीया on 22 February, 2012 - 10:54

कलियुग

एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय Uhoh
विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me"

गुलमोहर: 

देवळातला देव भिकारी

Submitted by पाषाणभेद on 11 November, 2011 - 16:23

देवळातला देव भिकारी

नकाच मजला अर्पू कोणी
गंध, अक्षदा, फुले, माळा
नका मजला शेंदूर फासू
नकाच द्या कळसा झळाळा

कोण कोठला देव मज समजले
उगाच येवूनी रांगा लावूनी
पाया पडण्या, हार वाहण्या
व्यापार्‍याची वस्तू करूनी
देवळात मज कोंबले

व्यर्थ फुकाचा नमस्कार करता
अन्नछत्रात जेवूनी
भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता
न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी
का मजला देता ?
पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता?

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी मुशाफिरी
धनाचे नच लालूच मजला
वृत्ती माझी आहे फकीरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रचीती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

प्रचीती

पहिली भेट आणि पहिला स्पर्श..
आठवणींच्या गाभार्‍यात अजूनही तेवत आहे, स्पष्ट.
देवत्वाची अनामिक प्रचितीच जणू.
अनेक आयुष्यांची ओळख असल्यागत
तुझे मला पहाणे, माझ्या कुशीत बिलगणे.
मुलायम शहाराच पण निशःब्द करणारा, समाधिस्त करणारा.

आपण त्या आधी कधी पूर्वीही भेटलो होतो- स्वप्नात, कल्पनेत, कुठेतरी नक्कीच.
तुझे ते हसणे आणि खळी, कायमची हृदयपटलावर कोरलेली.

आणि मग सुरू झाला ऊत्कट प्रवास-
पावलागणीक माझ्या आधारावर,
वेळी अवेळी जागण्यावर,
छोट्या छोट्या गोष्टींत जगण्यावर,
एकही शब्द न बोलता खूप काही गप्पांवर,
व्यावहारीक चौकट्या मोडून, स्त्री पुरूष भेद सोडून निव्वळ सोबतीवर,

प्रकार: 
शब्दखुणा: 

मी परत येइन ......

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 October, 2010 - 03:35

तांदळ्याला जाणारी एस.टी. तडवळे फाट्यावर थांबली. ड्रायव्हरने सीटखाली ठेवलेली डाकेची पिशवी उचलुन फाट्यावर उभ्या असलेल्या दिरगुळे मास्तरांच्या हवाली केली. मास्तरांनी हातावर मळलेली तंबाखु थोडी दाढेखाली दाबली, उरलेली ड्रायव्हरच्या हातावर टेकवली.

"कसं काय मास्तर, बरं हाय ना?"

"होय की, सगळं ठिक आहे सखारामदादा."

गुलमोहर: 

देव: आहे की नाही?

Submitted by डॉ अशोक on 25 September, 2010 - 05:12

देव: आहे की नाही?

मरणाच्या दाराशी जावून
परतलेला पेशंट
ऐकून, पाहून
देव आहे असंच वाटतं

सासरच्यानी जाळलेली विवाहिता
पुराव्या अभावी सुटलेले सासरचे
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मुलाच निरागस हसू
आजारात हरपतं
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मरणान्तीक प्रसव वेदना सोसून
तान्हूल्याला पाजणारी माय
ऐकून, बघून
देव आहे असच वाटतं

ग्राहक मंचात
डॉक्टर- पेशंट आमने सामने
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एका डॉक्टरच्या कविता-४: देव; आहे की नाही?

Submitted by डॉ अशोक on 22 September, 2010 - 03:19

एका डॉक्टरच्या कविता-4

देव: आहे की नाही?

मरणाच्या दाराशी जावून
परतलेला पेशंट
ऐकून, पाहून
देव आहे असंच वाटतं

सासरच्यानी जाळलेली विवाहिता
पुराव्या अभावी सुटलेले सासरचे
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मुलाच निरागस हसू
आजारात हरपतं
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मरणान्तीक प्रसव वेदना सोसून
तान्हूल्याला पाजणारी माय
ऐकून, बघून
देव आहे असच वाटतं

ग्राहक मंचात
डॉक्टर- पेशंट आमने सामने
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

देवा तु चुकलास...........

Submitted by प्रीतमोहर on 1 September, 2010 - 21:25

देवा तू चुकलास....

माणसाला बनवताना मन का दिलेस?

सगळं साठवण्याची कुवत का दिलीस?

टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही

मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास

आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...

न कळते तर बरं झालं असतं....

आता केलीस ती चूक केलीस

पुन्हा मात्र चुकू नकोस.....

माणसासारखा बनू नकोस....

माणूस काय...... मुखवटाधारी

काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी

मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,

की ज्याला निर्मिला मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?

पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - देव