त्यादिवशी हापिसला सुट्टी घेतली म्हणुन आमच्या आऊसाहेब माझ्यावर स्वयंपाकाची जबाबदारी टाकुन शाळेत निघुन गेल्या. मी आपलं सगळं साग्रसुंदर जेवण तयार केलं खर पण माझ्याकडुन ना स्वयंपाकात थोडीशी चुक झाली आणि काही काही (काहीकाहीच हं!) पदार्थ बिघडले
आता कधीतरी स्वयंपाक करणार म्हणल्यावर बिघडणारच ना?
पण......!
"सृष्टी "
एक कथा ही गमतीची
पृथ्वीच्या निर्मितीची
विधात्याची सुंदर कृती
नाव होते तिचे सृष्टी
घेऊन गेला ग्रहांकडे तिज
कोण असावा योग्य आधार?
प्रश्न पडला त्या कर्त्याला
जो तो म्हणे मीच थोर
ग्रह पहिला बुध बोले,
"नाते जवळचे भास्काराशी
प्रकाशमान ती राहील नेहमी
ठेऊन द्यावी माझ्यापाशी".
ग्रह दुसरा गुरु बोले,
"सगळ्या ग्रहात मीच मोठा
सृष्टी द्यावी माझ्यापाशी
कधी न तिजला कुठला तोटा".
ग्रह तिसरा बोले शन,,
"माझ्या भोवती आहे कडे
संरक्षणाची नसेल चिंता
सृष्टी द्यावी माझ्याकडे".
ग्रह चौथा बोले मंगळ,
"लाल लाल मी आहे सुंदर
माझ्यापाशी ठेऊन द्यावे
"ओळखीचा पाऊस"
अशाच एका संध्याकाळी
पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी
शोधत होती एक आधार
तोच म्हणे पाऊस अचानक
अनोळखी मज म्हणशी का गं
माझीच सखे अनेक रूपे
तुझाच जणू अविभाज्य भाग
मी ही राणी पोटामध्ये
लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने
ढगामधुनी गडगडतो
तू ही अशीच ठेवतेस ना ग
हृदयामध्ये दाबून कळ
हास्य घेउनी ओठांवरती
मनामधले झाकतेस वळ
मीही बघ न जमिनीला
भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता
तिला प्रफुल्लीत करून जातो
तुझीही ओंजळ संपून जाते
तुझ्याच सार्या लोकांसाठी
तुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा
तुझ्या मनाची होते माती
वेदनेचे रूप माझे
संध्याकाळ
अशाच एका संध्याकाळी तुझी आठवण दाटून आली
डोळ्यामध्ये साठवलेले अश्रू सहज सांडून गेली
एकेक दिवस एकेक क्षण तुझ्या माझ्या भेटी मधले
एकेक भाव एकेक स्पर्श तुझ्या निश्चयी मिठी मधले
तोच चंद्र तीच रात तीच झुळूक वार्याची
आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्याची
बकुळीची फुले पाहता तुझा स्पर्श आठवतो
त्या माळेचा सुगंध सजणा आजही मन भरून वाहतो
आज ही कंठ दाटून येतो होतो आठवांचा पसारा
आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा
सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....
कलियुग
एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय
विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me"