"सृष्टी "
एक कथा ही गमतीची
पृथ्वीच्या निर्मितीची
विधात्याची सुंदर कृती
नाव होते तिचे सृष्टी
घेऊन गेला ग्रहांकडे तिज
कोण असावा योग्य आधार?
प्रश्न पडला त्या कर्त्याला
जो तो म्हणे मीच थोर
ग्रह पहिला बुध बोले,
"नाते जवळचे भास्काराशी
प्रकाशमान ती राहील नेहमी
ठेऊन द्यावी माझ्यापाशी".
ग्रह दुसरा गुरु बोले,
"सगळ्या ग्रहात मीच मोठा
सृष्टी द्यावी माझ्यापाशी
कधी न तिजला कुठला तोटा".
ग्रह तिसरा बोले शन,,
"माझ्या भोवती आहे कडे
संरक्षणाची नसेल चिंता
सृष्टी द्यावी माझ्याकडे".
ग्रह चौथा बोले मंगळ,
"लाल लाल मी आहे सुंदर
माझ्यापाशी ठेऊन द्यावे
देणार नाही तिज कधी मी अंतर".
प्लुटो,युरेसेन.नेप्चूनही
गर्जून सांगती आपली महती
"नव्या पिढीचे आम्ही शिलेदार
आमच्यापाशी द्यावी सुष्टी !"
देव पडला विचारात
काय करावे कळे ना आता
इतक्यात मधुर आवाज आला
"मी ही सांगते माझी गाथा".
"सगळ्या ग्रहात हे जगदिशा
मी एकटी आहे स्त्री
वात्सल्याचे वरदान मजला
नाव आहे माझे पृथ्वी".
"धैर्य ही वसे माझ्या ठायी
वृत्ती माझी क्षमाशील
ममता,प्रीती रुपे माझी
मायाळु मी सहनशील".
"फक्त आम्हा स्त्रियांना तू
दिलीस देणगी मातृत्वाची
प्रेमाने मी सांभाळीन तिज
आधाराची नको काळजी".
म्हणणे पटले विधात्याला
सृष्टी वसली पृथ्वीवरती
एकमुखाने मान्य केली
या विश्वाने स्त्रीची महती !
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
सुंदर कल्पना व शब्दरचनाही.
सुंदर कल्पना व शब्दरचनाही. आवडली.
(बाय द वे, "शुक्र" नाही यात? इंग्रजीत व्हीनस ही सुद्धा स्त्री आहे बहुधा
)
मस्त आहे कवीता.. आवडली
मस्त आहे कवीता.. आवडली
पृथ्वी ....
पृथ्वी .... स्त्री.....ममता..... तिच्याकडे सृष्टी सोपविणे ही कल्पना आवडली.
रीया , खुप च मस्त च.....
रीया , खुप च मस्त च.....
छान कल्पना आणि रचनाही! आवडली
छान कल्पना आणि रचनाही!
आवडली
कल्पनेला सलाम बयो! सुंदर
कल्पनेला सलाम बयो!
सुंदर मांडलीस!
सगळ्यांना धन्यु (बाय द वे,
सगळ्यांना धन्यु

(बाय द वे, "शुक्र" नाही यात? इंग्रजीत व्हीनस ही सुद्धा स्त्री आहे बहुधा )

>>>>
कविता मराठी आहे ना त्यामुळे मराठीतले सगळे ग्रह आहेत
आणि शुक्र तारा आहे ना????
म्हणुन त्याला नाही घेतल
सहीये
सहीये
आभार मंदार दादा
आभार मंदार दादा
खरंच छान आहे कल्पना! आवडली.
खरंच छान आहे कल्पना! आवडली.
धन्यवाद प्रसाद दादा
धन्यवाद प्रसाद दादा
छान रचना , आवडली
छान रचना , आवडली
धन्यु अनिल
धन्यु अनिल
अतिशय सुंदर कल्पना व छान
अतिशय सुंदर कल्पना व छान कविता
मस्तच ग रीया...
मस्तच ग रीया...
कल्पना आवडली. आणि माझे नाव
कल्पना आवडली.
आणि माझे नाव पण सृष्टी........
कल्पना सुरेख आहे!
कल्पना सुरेख आहे!
सुंदर कल्पना... आणि ते कवितेत
सुंदर कल्पना... आणि ते कवितेत छान मांडली पण आहे
सुरूवातीची काही कडवी वाचून
सुरूवातीची काही कडवी वाचून मला शनिमहात्म्य आठवलं..
कल्पना छान.
यात्री प्रियांका, वाचून
यात्री
प्रियांका, वाचून सांगतो
@ ऑल : धन्स सुरूवातीची काही
@ ऑल : धन्स
सुरूवातीची काही कडवी वाचून मला शनिमहात्म्य आठवलं..
>>>

वाचून सांगतो
>>>
लौकर वाच.
सृष्टीला पृथ्वीकडे सोपवण्याची
सृष्टीला पृथ्वीकडे सोपवण्याची कल्पना खूप छान!
धन्स निंबु
धन्स निंबु