"ओळखीचा पाऊस"
अशाच एका संध्याकाळी
पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी
शोधत होती एक आधार
तोच म्हणे पाऊस अचानक
अनोळखी मज म्हणशी का गं
माझीच सखे अनेक रूपे
तुझाच जणू अविभाज्य भाग
मी ही राणी पोटामध्ये
लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने
ढगामधुनी गडगडतो
तू ही अशीच ठेवतेस ना ग
हृदयामध्ये दाबून कळ
हास्य घेउनी ओठांवरती
मनामधले झाकतेस वळ
मीही बघ न जमिनीला
भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता
तिला प्रफुल्लीत करून जातो
तुझीही ओंजळ संपून जाते
तुझ्याच सार्या लोकांसाठी
तुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा
तुझ्या मनाची होते माती
वेदनेचे रूप माझे
ध्वनी रिमझिम रिपरिप गडगड
तुझ्या मनातले भाव लपवीते,
तुझीच सखये अखंड बडबड
माझ्या सार्या दु:खाचे
सुंदर इंद्रधनू बनते
तुझ्याही सार्या अश्रुंचेही
एक एक कडवे बनत जाते
रंग रूप ही एक आपले
आपण दोघे श्याम सावळे
सांग सखे मग कसे म्हणावे
रूप तुझे माझे वेगळे?
पटले मजला त्याचे म्हणणे
मी हि केला जरा विचार
अनोळखी हा कसा ग मजला?
हाच आहे खरा आधार
तसा आणखी पाऊस हा
नजरेच्या ही परिचयाचा
आकाशातून कोसळताना
कधी पापण्या ओलावायचा
जेंव्हा जेंव्हा येतो पाऊस
तेंव्हा आता हुरूप येतो
दर्पणाची मग नसते गरज
मलाच माझे रूप दावतो
मी ही आता न चुकता
पावसाची वाट पाहते
आनंदाने मनापासुनी
त्याला माझी साथ देते
पावसाला नवी सखी अन
मला नवासा मित्र मिळाला
आता आम्हा दोघांचा ही
एकटेपणा दूर पळाला
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
____________________/\_______
____________________/\____________________ गुड वन
धन्यु भुंगा
धन्यु भुंगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
मस्त. . . आवडली कविता
मस्त. . . आवडली कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वाह!!! फ्लो खास!
व्वाह!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फ्लो खास!
यात संग च्या ऐवजी सांग करणार
यात संग च्या ऐवजी सांग करणार का?>> हो चिमु
धन्यु
धन्यु नन्ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभार नचिकेत
आभार नचिकेत
____________________/\_______
____________________/\____________________ >>>
भुंग्याबरोबरच माझाही प्रणाम स्वीकार करावा !!!
पाऊस आनि "मी" ची तुलना आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभार निम्बु
आभार निम्बु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तरीही खोट्या
तरीही खोट्या आनंदाने
ढगामाधुनी गडगडतो >>> ढगामधुनी हवंय का ते?? घाई घाईत टाईप केली होती का?
हो निम्बु धन्यु..बदल केला
हो निम्बु
धन्यु..बदल केला
रियु, आता मग एवधे केलेस बदल
रियु, आता मग एवधे केलेस बदल तर अजून एक : "सख्ये" ते सखये की सखे असं हवय का???
व्वा .... पाऊसप्रेमींना
व्वा .... पाऊसप्रेमींना अत्तापासूनच पावसाचे वेध लागलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली जमलेय कविता.
----------------------------------------------------------------------------------------
एक प्रांजळ, वैयक्तिक मत : कवितेतील इतर शब्दांचा विचार करू पाहता
’मज’, ’मजला’, ’मनीची’ ’मुखीची’ अशा शब्दांऐवजी सहज साधे शब्द;
एकूण बाजाला अधिक समर्पक वाटले असते असं वाटतं.
-----------------------------------------------------------------------------------------
सख्ये योग्य नाही.
भुंग्याने म्हटल्याप्रमाणे 'सखे', सखये' ही सखीसाठी असलेली संबोधने योग्य आहेत.
यातील 'सखे' हा शब्द इथे जास्त योग्य असेल असे वाटते.
रियु, आता मग एवधे केलेस बदल
रियु, आता मग एवधे केलेस बदल तर अजून एक : "सख्ये" ते सखये की सखे असं हवय का???
>>>
मी स्वतःच क्न्फ्युज आहे
सख्ये कि सखये कि सखे???
नक्कि काय हवय??
सखे असावे बहुदा
कवितेतील इतर शब्दांचा विचार
कवितेतील इतर शब्दांचा विचार करू पाहता
’मज’, ’मजला’, ’मनीची’ ’मुखीची’ अशा शब्दांऐवजी सहज साधे शब्द;
एकूण बाजाला अधिक समर्पक वाटले असते असं वाटतं.
>>>>
मला दुसरे बसणारे शब्द सापडलेच नाहित![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
क्रुपया सुचवावेत
एकदम मस्त
एकदम मस्त
आभार अनिलजी
आभार अनिलजी
मस्त खुप आवडली
मस्त खुप आवडली
धन्यु किश्या
धन्यु किश्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम आवडेश
एकदम आवडेश
अफलातुन्...........मस्त मस्त
अफलातुन्...........मस्त मस्त मस्त आहे..........खूप आवडली....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदारदा, योग्स धन्स
केदारदा, योग्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स
मस्त मस्त! खुप आवडली गो
मस्त मस्त! खुप आवडली गो
बाहेर 'मान-सून' आणि आत 'मन-सून्न'![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आवडली
आवडली
केतन , म्हमैकर : धन्स केतन
केतन , म्हमैकर : धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केतन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान!!! "माझ्या सार्या
खूप छान!!!
"माझ्या सार्या दु:खाचे
सुंदर इंद्रधनू बनते
तुझ्याही सार्या अश्रुंचेही
एक एक कडवे बनत जाते " क्या बात है!!!
मस्त... फक्त मिलिंदाने
मस्त...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त मिलिंदाने सांगितल्याप्रमाणे ते 'सख्ये'चं सखे करुन घे . सखये पण चाललं असतं, पण इथे त्यामुळे लय तुटतेय
गणेश : आभार विशालदादा : बदल
गणेश : आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशालदादा : बदल केला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्स