सुधिर

मैत्री चा जोश

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 06:01

परस्पर विरोधी स्वभावाच्या मीत्रांची
मैत्री जमली होती
एक सागर अथांग, तर..
ती खळखळती नदि होती

शुक्राच्या चांदण्यात त्यांची
वाटचाल सुरु होती.....
शेकोटीच्या शेजारी बसुन
ती, हलकेच त्याचा जोश वाढवीत होती ..!!

गुलमोहर: 

तुझा सहवास

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:58

भावना व्यक्त करन्याचा
धोका पत्करायचा असतो

वाईटात वाईट काय घडेल
याचा विचार करायाचा नसतो

चालतं... बोलतं .... स्वप्न (dream) पाहिले
तो दिवस विसरायचा नसतो

तुझ्या सहवासामुळे मी
माझे आयुष्य घडवु शकतो !!

गुलमोहर: 

मद्याचा प्याला

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:56

हा मद्याचा प्याला
उबडा का ठेवला
अर्क शीशीतला,
माणुस मीशीतला, ओठातच हसला

एक मद्याचा प्याला
अर्काने भरला
हलकेच झलकला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

घोट नरडिचे घेत,
अर्क सोडिला पोटात
लागला डोलायला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

कोम्बडी केली फस्त
ढेकरही दिली मस्त
समतोल सावरावयाला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

पाहुनी उबडा प्याला
तो दु:खाने हसला
का! चाखले जहालाला ?
म्हणुन माणुस मीशीतला, ओठातच हसला

गुलमोहर: 

तु अशी जवळी राहा

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:54

तु अशी जवळी राहा
नको जाऊस रानावनात

वाघ, लांडगे. हरीणांना
हर्षते का मन बघतांना
बघीतलेस, कधी माशांना
पाण्याशीवाय तडफडतांना

ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना
आठवणीत तुझ्या रमतांना
का लाऊ लगाम विचारांना

नकोस रागाऊ, क्षमा करना
रानावनात जाशील जर पुन्हा
करतो सदैव तुज याचना
ठेव लक्षात या ओळीनां..

तु अशी जवळी राहा.......

गुलमोहर: 

जीवनसरीता

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:47

प्रत्येकाच्या जिवनाची
वेगळी वाट होती
जसा दिवस आंनदाचा
विरहाची हुरहुर होती

जुळलेले स्नेहसंबध
तुटले जाणार होते

विरहाचा विषाद होता
मुखावर संमीश्र भाव होते

वियोगाच्या विषादाने
ह्रदय भरुन होते

मानवी जिवनाची तर्हा
विचीत्रच म्हणावी लागते
मैत्रीची "जीवनसरीता"
अखंड वाहत राहते

गुलमोहर: 

वाळुचे घरटे

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:45

समुद्र किनार्‍यावर, वाळुच्या ढिगात....
वाळुचा कील्ला, बांधुया......

ढिगार्‍यावर बसुन, सगळच विसरुन..
स्वप्नाचे महाल बांधुया....

मी एकटाच, वाळुच्या ढिगात
वाळुचा कील्ला, उभा केला झोकात

कितीतरी वेळ, ढिगर्‍यावर बसुन
वाट बघत, एकटाच रुसुन......

एकाएकी पाऊस, आला बरसुन
वाळुचा कील्ला, गेला वाहून...

वाळुचा कील्ले, थरथरत्या मनात
बनतात क्षणात, मीटतात ही क्षणात

गुलमोहर: 

जाणुन घ्या मला..

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:38

जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या
दिला नाहीत मोठेपणा
तरी चालेल मला
पण मोठेपणा माझ्यातला, खोटा आहे
असे म्हणु नका – 1 –

जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या
झाला नाहीत सहमत
तरी चालेल मला पण सहमतीसाठी, मी खोटा आहे
असे म्हणु नका – 2 –

गुलमोहर: 

मृगजळच

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:34

बंद ही दारे अशी
मोकळी मी करीत आहे
या ऊजाड माळराणावर
वाट तुझी बघत आहे

कढत् आहे, सलत आहे
ऊरात हे रुतत आहे
सागराला पुर आला
आसवेही वाहात आहे

जागलो मी, पेटलो मी
विझलो कधी नव्हतोच मी
ऊत्कटता दबुन होती
ह्रुदयास ग, या आस होती

फोडेन मी तोडेन मी
बन्धने ही कारागृहाची
फडफड ही काळजाची
सहवास का! दुर्मीळ आहे

अंत आहे, ही खंत आहे
महंत मी मुळीच नाही
बेवफा तुला कसे म्हणु
तो.. दुसरा पण संत नाही

आभास हा, भास आहे
तुझाच ग सहवास आहे
ऊघडताच नयन हे..
मृगजळच नशिबात आहे

गुलमोहर: 

माझे मलाच कळत नाही....

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:30

मी कोण आहे !! कुणी मला सांगेल का ?
माझे मलाच कळत नाही....

सुर्यकिरणे सगळीकडेच पसरतात
माझ्यावरच ते का पडत नाही.....
माझे मलाच कळत नाही....

प्रत्येकाचे मन ज्याच्या त्याच्या काबुत आहे
माझेच तेवढे का नाही..
माझे मलाच कळत नाही....

चहुकडे आनन्दी आनन्द आहे
मीच का ऊदासीन आहे..
माझे मलाच कळत नाही....

या संसारात सगळॆ सगळॆ सुखी आहेत
मीच का दुखी आहे..
माझे मलाच कळत नाही....

आपाआपल्या यशात सगळी कसे मग्न आहेत
मीच का अपयशी आहे..
माझे मलाच कळत नाही....

गुलमोहर: 

करा विचार क्षणभर....

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:22

करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ...
सोपे नाही देणे उत्तर.....

विरुन जातो टाळ्यांचा गजर
पदके अनं चषक पडलीत धुळ खात
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 1

वाटे मनाला दररोज
जाईल आयुष्य मजेत
झाल्यावर लग्न, डुंबीन सुखात
गाडी, बंगला, येतील दिवस बेहत्तर
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 2

वाढत्या वयात मुलांच्या
भवितव्यांच्या, गोड स्वप्नांच्या,
चारचाकी अनं मनाजोगी सुट्टी
बहरले मन, सुख अपरंपार

करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 3

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - सुधिर