Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:22
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ...
सोपे नाही देणे उत्तर.....
विरुन जातो टाळ्यांचा गजर
पदके अनं चषक पडलीत धुळ खात
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 1
वाटे मनाला दररोज
जाईल आयुष्य मजेत
झाल्यावर लग्न, डुंबीन सुखात
गाडी, बंगला, येतील दिवस बेहत्तर
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 2
वाढत्या वयात मुलांच्या
भवितव्यांच्या, गोड स्वप्नांच्या,
चारचाकी अनं मनाजोगी सुट्टी
बहरले मन, सुख अपरंपार
करा विचार क्षणभर....
आयुष्य अगदिच छोटं आहे ... 3
का लागला उशीर ?
करण्या परिभाषा ह्या सुखावर
गुलमोहर:
शेअर करा
नविन
नविन