Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:54
तु अशी जवळी राहा
नको जाऊस रानावनात
वाघ, लांडगे. हरीणांना
हर्षते का मन बघतांना
बघीतलेस, कधी माशांना
पाण्याशीवाय तडफडतांना
ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना
आठवणीत तुझ्या रमतांना
का लाऊ लगाम विचारांना
नकोस रागाऊ, क्षमा करना
रानावनात जाशील जर पुन्हा
करतो सदैव तुज याचना
ठेव लक्षात या ओळीनां..
तु अशी जवळी राहा.......
गुलमोहर:
शेअर करा
काही कळलच नाही ..कोणाला जवळ
काही कळलच नाही ..कोणाला जवळ राहायला सांगताय तुम्ही ?????
तुमच्या प्रतिक्रियेबद्धल
तुमच्या प्रतिक्रियेबद्धल आभारी आहे,
नाव लिहु शकत नाही, माफी असावी,, हवे तर मैत्रीन समजु या का?
धन्यवाद, ..
अनु मला पण कळाली नव्हती पण
अनु मला पण कळाली नव्हती
पण माबोवरच्या बर्याच कविता मला कळत नाहीत आणी खुप जणांना आवडतात
मला वाटलं ही त्यातलीच एक
म्हणून मी प्रतिक्रिया दिली नाही
कविता वाचायला सुंदरच आहे पण
कविता वाचायला सुंदरच आहे पण आशय कळणे कठीण वाटले. सोपी कविता लिहावी अशी आग्रहाची विनंती आहे.
ह्या कवितेतील स्त्री,
ह्या कवितेतील स्त्री, प्रियकराला सोबत न घेताच, एकटिच अभयारण्य बघायला जाते.
का.का.क. मध्ये शिफ्ट कराल का
का.का.क. मध्ये शिफ्ट कराल का प्लीज...............
ह्या कवीच्या कल्पना लाजवतात
ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना
आठवणीत तुझ्या रमतांना
का लाऊ लगाम विचारांना>>
छान खयाल