संकीर्ण
वैतरणा नदी, तांदुळवाडी, पालघर
बाणगंगा
नाटककार विजय तेंडुलकर ह्यांच्यावरची एक मराठी डॉक्युमेंटरी
नाटककार विजय तेंडुलकरांवरचा हा एक माहितीपट मला फार आवडला.
इथे पहा:
http://www.youtube.com/watch?v=Jv475KO5jfw
धन्यवाद
पुलंच आत्मकथन भाग - १ ते ११
मी इथे दोन चित्रफिती देत आहे फिल्म डिविजननी तयार केलेल्या आहेत. त्या अवश्य पहा:
पु लं आत्मकथन भाग - १: https://www.youtube.com/watch?v=kEwnm5f2lkY&feature=related
पु लं आत्मकथन भाग - २: https://www.youtube.com/watch?v=Ddmzhmy05ro&feature=related
पुढचे ९ भाग तुम्हाला तेथेच सहज दिसतील.
धन्यवाद
डुक्कर!
तांबडा घोडा
एके दिवशी त्याच्या गावात आली विजय सर्कस.
करकचून बांधलेल्या बोचक्यांवर टांग टाकून बसलेल्या मालकांचा आणि भरतकाम केलेल्या रंगीबेरंगी पण कळकट-मळकट कपड्यांतील मालकीणींचा भार सांभाळत कसेबसे पाऊल टाकू शकतील अशी तीस-पस्तीस तांबडी घोडी.
आपल्या मालकांची वीस-पंचवीस नागडी-उघडी बारकी बारकी पोरं वाहणारी दहा-बारा गाढवं.
त्यांच्या आसपास चालणार्या काही पाऊलजोड्या.
गावात पारालगत मधोमध मोठ्ठं पटांगण आणि त्या पटांगणाला लागून उपटसूंभासारखं एक मोठ्ठं पडीक वावर.
हा भरगच्च तांडा गावात शिरला आणि वावरात जमा झाला.
दीपावली रांगोळी - आबा आणि मी..
आकाशकंदील - बांबूच्या चोयट्यांपासून
बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.