संकीर्ण
इनीस पेक्षन
बॅक टु बेसिक्स
तू कितीही नाही म्हणालीस तरी...
तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे
बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे
साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे
बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...
कोकण
मागच्या आठवड्यात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, असगोली हेदवी, वेळणेश्वर आणि महाबळेश्वर अशी मस्त भटकंति झाली. थोडी पेंटीग्ज आणि भरपुर आराम केला. हे नंतर घरी कॅन्व्हास वर केलेले अॅक्रेलीक . अॅक्रेलिक वॉटरकलर सारखे ट्रान्स्परन्ट किंवा ऑईल सार्खे ओपेक वापरता येत मात्र ते रंग येव्हढे पटकन सुकतात त्यामुळे पेंटींग करणे मला बरेचसे कंटाळवाणे वाटते त्यामुळे शक्य्तो मी हे माध्यम टाळत आलोय.
Koi फिश
Mee Amour..
गार काळ्या कातळाखालून
तप्तशुभ्र झरा उसळी मारुन वर येताना
मी लाल बनारसी रेशिम असते
आणि त्यावर जरतारी बुंदके असतात.
माझ्यावरची नक्षी मला आवडते.
मी खेळत रहाते
तुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी
चमकत असतो तो.
माझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात
तेव्हा तुझ्यासाठी
भांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली
तुला आवडतात म्हणून
मला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं
तेव्हा
आणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही
मला आवडलेलं असतं.
मला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात
आणि बोरकरही
जेव्हा तुझ्या वीजेचं चांदपाखरु माझ्या कवेत असतं.
धन्यवाद!!
अनिलभाई, परदेसाई, वैद्यबुवा, स्वाती_आंबोळे, असामी, सागर (माणूस्), सिंड्रेला, अंजली भस्मे, आश्विनी साटव, रुनि पॉटर, केदार, एबाबा, वृंदा, प्राचि, सायली कुळकर्णी, पराग सह्स्त्रबुद्धे, व माझे भारतातील मित्र श्री गुरुदास बनावलीकर आणि श्री रवी उपाध्ये,
या सर्वांना स. न. वि. वि.
आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हार्दिक आभार. बर्याच जणांनी दोन दोनदा शुभेच्छा देऊन आमची दिवाळी दुप्पट आनंदाची केली याबद्दल धन्यवाद.
शुभेच्छा
फोटो कंपोझिशन चे नियम
चंदन च्या फोटोग्राफी च्या पोस्ट वर प्रतिक्रिया लिहल्यानंतर फोटो कंपोझिशन वर काही तरी लिहावं हे डोक्यात आलं म्हणुन हे पोस्ट.. तसे नेट वर सर्च केले तर या विषयी खुप काही वाचयला मीळेल , पण हे माहित असलेले नियम आणि त्यांचे अपवाद येकत्रित मांडण्याचा छोटा प्रयत्न.
कोणतेही चित्र/प्रकाश चित्र बनते ते खालिल घटकानी.
१.रेषा- उभ्या , आडव्या, तीरक्या, नागमोडी... येखादा लांबलचक रस्ता , किंवा येखाद्या आकाराची कडा, किंवा क्षितीज या फोटोचा विचार करता रेषाच तर खांब , तारा हे लिनीअर ओब्जेक्ट्स या ही रेषाच
आकाशात उड्णारे बगळ्यांचा समुह हा सुद्धा फोटोच्या दृष्टीने रांगच
Pages
