तू कितीही नाही म्हणालीस तरी...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे

बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे

साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे

बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...

प्रकार: 

Rofl काळजाला भिडली रे
एखाद वेळी साहेबांचा रोष स्वीकार पण तिच्याशी प्रतारणा करु नकोस कारण एक साहेब गेला तर छपन्न साहेब मिळतील पण ती सोडून गेली तर... Proud

गजा Lol

गजाभाऊ...
मधी-मधी तुमची जाणवण्या ईतपत अनुपस्थीती कशासाठी असता, तेचा खरां कारण सांगितलात... होय मां?... :हाहा:...
एकदम मस्त...

Lol

Pages