प्रवास
ऑस्ट्रियाची सफर.. भाग दुसरा-शेवटचा (साल्झबर्ग आणि इन्सब्रुक)
पहिल्या भागात व्हिएन्ना आणि बुडापेस्ट फिरुन आलो. आता पुढचा टप्पा होता साल्झबर्ग आणि इन्सब्रुक. सगळा प्रवास ऑस्टियन रेल्वेने, स्वस्त आणि मस्त! व्हिएन्नाला आल्यावरच पुर्ण प्रवासाचे आरक्षण केले होते. रेल्वे स्थानकांजवळची हॉटेल महिनाभर आधीच आरक्षित केले होते.
मडिकेरी-कुर्ग
एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.
पैसा आला धावुण.......!
आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!
अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!
वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.
ऑस्ट्रियाची सफर.. भाग एक (व्हिएन्ना आणि बुडापेस्ट)
आता जाउन देखिल बरेच महिने झाले... मागच्या वर्षी मे मधे आठवडाभर सुट्टी काढुन ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं... दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली. कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्स ची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाच!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! [१] पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडुन दिली... ते निघण्याच्या आठवडाभर आधिपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!
कोहोजगड.. अधुर्या ट्रेकची कहाणी !!
सध्या एकामागुन एक ट्रेक्स झाले.. त्यामुळे ठरवले होते लांब कुठे जायचे नाही.. रविवार् नि सोमवारी रमझान ईदची सुट्टी लागुन आली होती तरीही कुठे जावेसे वाटत नव्हते..! त्यात हा ऑक्टोबर हिट सालाबादाप्रमाणे सप्टेंबरमध्येच सुरु झाला.. पण झाले काय.. अख्खा रविवार कंटाळा करण्यात गेला नि अजुन सोमवार बाकी होता नि सांजवेळेस पुन्हा ट्रेक्सचे विचार मनात येउ लागले.. मित्रालाही समस पाठवला तर रात्री कळवतो म्हणुन आशादायी प्रतिसाद आला.. पण जायचे कुठे हा प्रश्न्न होता.. आता पुन्हा कर्जतला तरी जावेसे वाटत नव्हते.. कुठेतरी जवळपास वेगळ्या ठिकाणी जायचे ठरवले.. नि नेट ऑन केला.. क्षणात विरार्-पालघर आठवले..
छोटुसा,साधासा पण सुंदर असा पेठचा किल्ला !
दुर्गदुर्गेश्वर रायगड
'हवाई' बद्दल माहिती
आम्ही डिसेंबर च्या शेवटी ८ दिवस हवाई ला जायचा विचार करत आहोत. कृपया तुम्हाला हवाई बद्दल जी माहिती असेल ती लिहावी. पहिल्यांदा जाणार्यांना खुप उपयोगी पडेल.
कोणत्या बेटाला जावे? कोणत्या बेटावर कायकाय पहाण्यासारखे आहे?
एका बेटाहुन दुसर्या बेटाला जायचे कसे?
जाण्यास चांगले हवामान कधी असते?
तिथे काय काय गोष्टी करु शकतो? करण्यासारखे, पहाण्यासारखे काय आहे इत्यादी.
मी गुगल वर पहायला सुरु केले आहे पण फार गोंधळायला होते बुवा.
माझी मैत्रीण म्हणाली ती सर्वात मोठ्या बेटावर १ आठवडा राहीली पण ते सुद्धा कमी पडले.
धन्यवाद.
रिवसबे गुरुद्वारा अन सिडनी
एका पंजाबी कुटुंबाच्या आग्रहाने रविवारी एका गुरुद्वारा ला गेलो होतो! तिथुन मग पुढे सिडनी चा प्रसिद्ध ऑपेरा हाउस अन मॅनली बीच ला ही गेलो. अन ह्या प्रवसात सिडनी चे एकमेव (माझ्या प्रोफेसर च्या मते) पर्यटन स्थळ सिडनी हार्बर वरील फेरी बोट मधुन प्रवास ही अनुभवला.......
गुरुद्वारा ची भेट छान च होती. भारतात एकदा मी अन चंपी दिल्ली च्या बंगला साहिब गुरुद्वारा ला गेलो होतो, त्याची आठवण झाली. सकाळी प्रार्थना अन दुपारी लंगर मधील सुग्रास जेवण घेउण आम्ही पुढे बीच वर सैर केली!
Pages
