सुन्या: " काय मग कसं वाटतय ?"
सम्या (समीर रानडे) : "बस्स झाला ट्रेक.. इथेच थांबेन म्हणतो "
विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
योगी (योगायोग) : "आयला, मस्तच रे.. मजा येणार"
यो (यो रॉक्स) : "अरे ये तो शुरवात है !"
वरील उद्गार आहेत मायबोलीकरांचे.. शुरवीरांचे.. शुर मायबोलीकर्स ! ज्यास खालील घळीचे दृश्य कारणीभुत होते..

मित्र आणि मैत्रिणिंनो,
मी प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये "अतुल्य भारत" हि एक मालिका सुरु करत आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़लि ती येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. माझा उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचा विचार आहे. आशा आहे आपल्याला हि प्रकाशचित्रे आवडतील.
आपले विचार, अभिप्राय व सूचना जरूर कळवा.
कळावे, लोभ असावा,
चंदन.
--------------------------------------------------------------------------------
थोडक्यात माहिती -
सिझन - मे १५ ते सप्टेंबर १५. (ऑगस्ट महीना अतिशय योग्य)
"पंधराव्या मिन्टाला ठाण्यात पोहोचतोय" गेल्या तासाभरात पाचव्यांदा आलेल्या फोनला मी उत्तर दिलं आणि गाडी हाकायला लागलो. पुण्यावरुन निघतानाच मला किरुचा फोन आला होता आणि तेव्हापासून मी हेच उत्तर देत होतो. आमच्यात दिलेला शब्द बदलत नाहीत. गेला आठवडाभर मी सतत ड्रायव्हिंग करत होतो, वर्षानुवर्ष वेताळाचा पिच्छा पुरवणार्या, गोष्टीतल्या विक्रमासारखा. त्यात विक्रमाच्या पाठीवर वेताळ असतो, इकडे माझ्या पोटाशी एक पिल्लू होतं एव्हढाच फरक.
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्या या गावाला पर्याय नाही.
नमस्कार ! http://www.maayboli.com/node/13330 या लिंकवर पहिला भाग आहे.. तिथुनच पुढे..
एवढा मोठा रॉक पॅच बघितल्यावर सगळेच उत्सुक होते.. त्यातच वरती गुहेपर्यंत पहिली चढाई कोण करणार याची विचारणा झाली नि अपेक्षेप्रमाणे सगळेच तयार होते जायला
नेहमीप्रमाणे लिडरनेच दोरीच्या सहाय्याने पहिली चढाई केली..

(गाईड दोरीला घेउन चढताना)
शैलजा ज्या वेळेस कोकणांत होती त्यावेळेस योगायोगाने मीही माझ्या कुटुंबियासमवेत कोकणातच होतो. म्हणून हा कोकणसय भाग २. 
नाळीच्या वाटेतुन हरिश्चंद्रगड सर केला तेव्हा वाटले काय खत्री ट्रेक झाला ! पण मला वेध लागले होते "अलंग-मदन" वर जाण्याचे ! सह्याद्री रांगेतला अत्यंत कठीण ट्रेक पैंकी असा हा ट्रेक ! पुन्हा 'ट्रेक मेटस' (केवळ तीन ट्रेकच्या अनुभवाने हा ग्रुप अगदीच आपलासा झालाय !!) ह्या ऑर्कुट ग्रुप बरोबर जाण्याची संधी ! म्हणुन आधीच सुट्टी राखुन ठेवली ! (अशा 'खास' ट्रेकसाठी ऑफिसमधुन 'खास' सुट्टी घेउन ट्रेक करनेका मजा कुछ 'खास' होता है ! अर्थातच कारण ठोकावे लागते ! ) सुन्या(मायबोलीकर्)ला देखील त्वरीत कळवुन वेळ राखुन ठेवण्यास सांगितले.. तोदेखील त्याच्या अजुन एका सहकार्याला घेउन लगेच तयार झाला !
माझ्या मैत्रीणीची मुलगी अवनी हिच्या ट्रेक चे हे वर्णन तिच्या आईने सांगितलेले.
हीच ती चिमुकली हिरकणी अवनी आपटे.
Exiting and popular trek ,fort Alang, Madan and Kulang.(Around 5000 ft.--level of kalsubai)
Location--Bhandardara Dam, Egatpuri Region, Near mountain Kalsubai, Sayadri Range, Maharashtra..India
Event Organiser--Serac Club,Pune
Duration-- 3days 4 nights
Age Limit--Above 15 years..
Child Name--Avani Apte (mother --Varsha apte)
Date of Birth-6th nov. 2004
इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं