नमस्कार मन्डळी,
मी ह्युस्टन मधे रुम शोधतीये..येत्या सोमवार पासुन.
If you have any pointers for the same (sites, person's having accomodation) please share with me at supriya.karagave@gmail.com
Thanks.
P.S. :- Marathi made type karana awaghad jatay.. pahilyanda maayboli use karat asalyamule.
एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल..
पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात.
या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे...
जानेवरी महिन्यात जेव्हा अलंग-मदन करुन पायथ्याशी पोहोचलो तेव्हा कुलंग रुसलेला दिसत होता ! त्याच्या अंगावर खेळायचे राहुन गेले होते.. म्हटले इथे पुन्हा यायचे झाले तर फक्त कुलंगलाच भेटुन जायचे ! उंची सुमारे ४८०० फुटच्या आसपास.. अलंग्-मदन जोडीला खेटुनच उभा.. या त्रिकुटांमध्ये कुलंगवरुनच भोवतालचा परिसर जास्त चांगला दिसतो.. नि कळसुबाईच्या खालोखाल याची उंची ! वाटले होते पुढच्या वर्षी योग येइल.. पण लवकरच ह्या दुर्गांचे त्रिकुट पुर्ण करण्याची संधी माझ्या नेहमीच्या ''ट्रेकमेटस" या ग्रुपच्या कृपेने चालुन आली..
(आज सहजच मागच्या काही भटकंतीचे फोटो बघत होतो... तर गेल्या पावसाळ्यातल्या एका भटकंतीचा अनुभव खूप खूप आठवला... हा अनुभव तेव्हा मी इतर काही ठीकाणी सांगीतला होता, पण मायबोलीवर प्रथमच सांगत आहे...)
------------------------------------------------------------------------------------------
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.
मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.
एकदा सिंगापुरातील ग्रंथालयात पायाच्या टाचा वर करुन कपाटातून पुस्तके काढत असताना एक पुस्तकं माझ्या पायापाशी पडले. मी नमस्कार करुन ते पुस्तक सरळ करुन वाचले तर त्यात मला काही फोटो आढळले. ते कृष्णधवल फोटो पाहुण माझे मन आतल्या आत कुठल्या तरी हळव्या स्पर्शानी विरघळले. त्यात काही पत्राचा भाग होता जो कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिला होता. मग मी मुखपृष्ठावर नजर टाकली तर नाव दिसले 'The Diary of a Young Girl - Anne Frank'. मी ते पुस्तक तिथल्या तिथेच उभ्यानी वाचायला सुरवात केली आणि पुस्तकाशी समरस होऊन गेलो. जेवढी पाने तिथल्या तिथे वाचली ती वाचून मला अगदी तरल भावनिक आनंद मिळाला. मी ते पुस्तक घरी आणले.
मागच्या वर्षी (इ.स. २००९) मे महिन्यात बऱ्याच सुट्या जोडून आल्या होत्या. महिन्याच्या सुरवातीच्या सुट्या जोडून आम्ही ऑस्ट्रियाला गेलो. महिन्याच्या शेवटीपण चार दिवस सलग सुट्टी मिळत होती. आत्ताच मोठ्या प्रवासावरून आलो असल्याने पुन्हा कुठे जायचं का नाही हे ठरत नव्हतं. मायबोलीवर हॉलंडच्या ट्युलिपच्या बागेचे फोटो पाहिले आणि आमची हॉलंड प्रवासाची तयारी सुरु झाली... ही सिलसिला फेम बाग वर्षातले दोन महिनेच चालू असते. या वर्षी २१ मेला बंद होणार होती.