एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल.. पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात.
माहिती द्यायची म्हटली तर ह्या व्हॅलीचे वास्तव्य लोणावळा-खंडाळा घाटात उल्हास नदीच्या सान्निध्यात वसलेले आहे.. ज्याची लांबी म्हणाल तर लोणावळ्यापासुन कर्जत डोंगररांगेपर्यंत विस्तारीत आहे.. ह्यालाच टायगर व्हॅली असेही संबोधतात (का ते माहीत नाही).. एकमेकांना समांतर अशा दोन पहाडांच्या भिंतीमध्ये खोल नि अरुंद असणारी नि नागमोडी वळणाचा आकार घेत डोंगररांगातुन जाणारी दरी म्हणुनच हिला कॅनियॉन व्हॅली असे म्हणतात.. या व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेले दोन धबधबे.. तसे पाण्याचे छोटेखानी झरे नि धबधबे वाटेत बरेच लागतात पण हेच दोन धबधबे प्रमुख आहेत.. त्यातील एका धबधबा केवळ वरुन(दरीच्या टोकावरुन) न्याहाळता येतो.. तिथे जाणे अशक्य.. तर दुसरा धबधबा आमच्यासारख्या हौशी मंडळींसाठी खुला आहे..
मागेच आपला मायबोकर सुन्या इथे जाउन आला होता नि नेमके त्यावेळी मला काहि कारणास्तव जाता आले नव्हते.. मला कसेही करुन जायचे होतेच पण त्याचवेळी सुचले जाउ तर मायबोलीकर मिळुनच जाउया.. सुन्याशी बोललो नि तोही अपेक्षेप्रमाणे तयार झाला.. नि आमचा प्लॅन शिजला.. ४ एप्रिलला जायचं.. झाल्लं.. लगेच उत्साही मायबोलीकरांना विचारण्यात आले.. काहींनी उत्साहाने नकार दिला तर काहि माबोकरांना इच्छा असुनही शक्य नव्हते (योगायोग, योगेश२४, आनंदयात्री) तर काही माबोकरांना पेलवणारे नव्हते.. वाटले होते आठ दहा जण जमतील पण शेवटी हाय नाय करत सात मायबोलीवीर तयार झाले.. पुण्यावरुन सुन्या, झक्या (झकासराव), समीर रानडे (सम्या), राज्या तर मुंबईवरुन विन्या (विनय भीडे), विकु (विशाल कुलकर्णी) नि यो (यो रॉक्स)
व्हॅलीत माबोकर दौडले सात !
हा ट्रेक म्हणावा तसा सोप्पा ! पण सवय नसेल तर अवघडच ! नि उकाड्यात चढ्-उतार पार करायचे म्हणजे कसरतच ! इथे जाण्याचा मार्ग नेहमीच्या ट्रेकच्या अगदी उलटे ! कारण दरी म्हटले तर पहिले उतरावे लागणार होते नि ट्रेकचा शेवट चढण पार करुन होणार होता.. एका पहाडावरुन उतरायचे नि दुसर्या पहाडावरुन चढायचे.. वाट अर्थातच खडकाळ ! त्यामुळे उड्या मारत मार्गाक्रमण करणे भाग होते..
ठरल्याप्रमाणे लोणावळ्याला सकाळी आठ वाजता भेटण्याचे ठरले.. मी, विन्या नि विकु लाल डब्यातुन लोणावळ्याला प्रयाण केले नि पोहोचता पोहोचता साडेआठ वाजुन गेले ! वेळेवर पोहोचलेल्या पुणेकरांनी तोवर नाश्ता करुन घेतला होता.. स्टॅंडवर आम्ही भेटाभेट झाली नि जास्ती वेळ न दवडता आम्ही कुच केले.. ! आमचा नाश्ता आम्ही चालता चालताच उरकुन घेतला इथे जायचे तर लोण्यावळ्यावरुन पुन्हा मागे खंडाळ्याच्या दिशेने मुख्य रस्त्यावरुन जावे लागते.. नि वीस मिनीटांच्या अंतराने वाट उजवीकडे वळते.. मुख्य रस्त्यावरुन एक रस्ता खालच्या बाजुस उतरतो.. हीच वाट पुढे एका प्रायवेट प्रॉपर्टीच्या सिमेटब्लॉकने बनवलेल्या वाटेला जाउन मिळते.. त्याच वाटेने थोडा चढ पार केल्यावर उजवीकडे एक ठळक पाउलवाट दिसते.. त्या पाउलवाटेने आम्ही एका मोकळ्या मैदानावर आलो नि तिथुनच पुढे गेले असता आम्हाला दरीचे दर्शन झाले.. नि कड्यावरतुन खाली पाहिले तर दोन धबधबे सफेद रेघ मारल्याप्रमाणे वाटत होते.. एकावर एक अशी रचना होती..
आम्हाला खालच्या धबधब्यापर्यंत पोहोचायचे होते.. एन उन्हाळ्यात धबधब्याचे दर्शन घेण्याची बहुधा सर्वांची पहिलीच वेळ होती.. आम्ही दरीच्या एका बाजुस उभे होतो.. इथुनच दरीची दुसरी बाजु नि त्यावरील खंडाळ्यातील एक्स्प्रेस हायवे दिसत होता.. नि वरतुनच ड्युक्स नोज आपले नाक दाखवत होते..
आम्ही जिथे उभे होतो तिथेच काही अंतरावर सुरुची झाडे नजरेस पडली.. क्षणभर विश्रांतीसाठी अतिश्य सुंदर जागा होती.. ह्या १०-१५ झाडांच्या छायेतच आम्ही पहिला ब्रेक घेतला.. कधीपासुन ब्रेक घेण्याची वाट बघणार्या सम्याला लगेच हायसे वाटले.. आमच्या या उनाड माबोकरांच्या ग्रुपमधील काहींनी विश्रांतीसाठी या झाडाची निवड केली..
इथुनच आम्हाला ज्या धबधब्याखाली जायचे होते तो भाग संपुर्ण नजरेत आला..
(थोडा झुम करुन घेतलेला फोटो)
वॉव !!! वरील दृश्य बघताच दिल खुष हो गया ! म्हटले चला लवकर.. नाहितर खाली पोहोचेपर्यंत पाणी निघुन जायचे एकदोन मिनिटातच आम्ही दरीला हात घातला.. नि तोच राज्याच्या बॉसने त्याची आठवण काढली.. झाले आम्ही आपले हसत-खिदाळत धमाल करत खाली उतरत होतो नि हा राज्या आपला 'सर.. सर' करत होता
आमची सुरवातच मस्त झाली होती कारण उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता नि जिथुन उतरत होतो ती मुळातच एक धबधब्याची वाट होती.. नि नाही म्हटले तरी थोडेफार पाणी मंजुळ आवाज करत वाहत होते ! इथे सुन्याने अर्थातच लिडरची भुमिका स्विकारली होती तर मी मागुन लक्ष ठेवुन होतो.. तसा म्हणायला हा सोप्पा ट्रेक पण वाटच खडकाळ असल्याने टणाटण उड्या मारणे सक्तीचे होते.. थोडे इकडेतिकडे झाले तर आपटलाच समजा.. त्यामुळे तेवढीच काय ती काळजी घेणे जरूरीचे होते.. नि जो तो एकमेकांना जपताना स्वतःला सांभाळत होता
मला इतरांची जेवढी काळजी नव्हती तेवढी झकासरावांची होती.. सुन्याने त्याला आपल्या भाषेत हा ट्रेक सोप्पा असल्याचे सांगितले होते पण त्याच्यासाठी हे कडवे आव्हान होते..
उतरतानाचे काही क्षण..
(प्रयत्न झक्याचे.. )
----------------
(किती ही सरळ वाट )
------------------------------
(सोबत झर्याची )
-------------------------------
(दगडांतुन वाट काढताना..)
----------------------------
खडकाळ वाट पार करत असतानाच काही अंतराने एक अंदाजे १० फुटाचा पॅच लागला.. तो पाहिला नि झक्या दचकला नाही तर नवलच ! त्याच्यासोबत सम्यालाही प्रश्न्न पडला 'इकडुन एकवेळ उतरु पण चढणार कसे ?' पण आपली परतीची वाट वेगळी असल्याचे सुन्याने सांगितले नि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. पण परतीची वाट काय आहे ते सुन्या नि मलाच ठाउक होते !:) इकडुनच मग एकेक करुन खाली उतरला..
(विन्या नि विकु.. जपुन उतरताना..)
---------------------
(वरतुन खाली.. यो, सम्या, राज्या, सुन्या, झक्या नि विन्या )
----------------------
हा पॅच करता करता झक्या तर पुरता घामाघुम झाला होता.. ह्या ट्रेकमध्ये ह्याचे वजन नक्कीच घटणार होते.. ! तिथुनच पुढे काही अंतराने आम्ही अगदी दरीच्या कडेला आलो.. जिथुन आतापर्यंत आमची सोबत देणारे वाहते पाणी खाली कोसळत होते..
(उंचीवरुन खोली मोजताना.. :P)
___________________
आपल्याला इकडुनच खाली उतरायचेय असे सुन्याने गंमतीत म्हटले तोच राज्या, सम्या नि झक्याचा 'आता बस्स्स झाला ट्रेक !!' चा सुर निघाला.. तिथेच बाजुला आम्ही एका झाडाखाली ब्रेक घेतला.. ब्रेक म्हटला की सर्वप्रथम सम्या खुष व्हायचा
आमचा ब्रेक संपला तरी ह्याचे आपले टाईमप्लिज सुरु व्हायचे.. त्या दरीच्या कडेला उजवीकडे ठेवुन आम्ही जंगलातुन जाणारी वाट पकडली.. करवंदीझाडीचे काटेरी जाळ्याचा अडथळा पार करत आम्ही पुढे सरकत होतो.. वाट उतरत होती पण काही संपत नव्हती.. तसे सुन्याने उतरण पार करेस्तोवर दोन तास लागतील सांगितलेच होते.. पण सम्या, झक्याची दमछाक झाल्याने ह्यांचे घड्याळ जरा जास्तीच वेगाने धावत होते.. अजुन किती खाली म्हणत म्हणत उतरत होते मात्र..
________________________
पण काही म्हटले तरी बहुतांशी वाट ही झाडीझुडपातुन जात असल्याने उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता.. आता वाहत्या पाण्याची साथ नसल्याने शांतता जंगलातील शांतता अनुभवता आली.. छोटे छोटे ब्रेक घेत आम्ही जवळपास खाली पोहोचलो नि पुन्हा पाण्याचा खळखळाट ऐकु आला.. नि पुन्हा आमची उत्सुकता वाढली गेली.. उतार पार करताच आम्ही पुर्णतः दरीत खाली पोहोचलो नि समोर एकसे बढकर एक असे पाण्याचे झरे दिसु लागले.. जणु काही नुकताच पाउस पडुन गेल्यागत.. त्यातलाच एक..
__________________
पाणी बघुन सर्वांच्या चेहर्यावर प्रसन्नतेची मोहोर उमटली.. तोंडावर पाण्याचा फवारा मारुन आम्ही तिथुन पुढे निघालो.. वाटेत अजुन एक छोटेखानी धबधबा दिसला.. पण इथे नंतर येउ असे सांगुन सुन्याने पुढे नेले.. जिथे आम्ही पोहोचण्यासाठी आतुर झाले होतो.. दहा पंधरा मिनीटांनी कानावर धबधब्याचा आवाज पडला नि पावले झपाझप पुढे पडु लागली.. नि एकदाचे आम्हाला धबधब्याचे दर्शन झाले..
(पुर्ण भरात असलेला धबधबा पाहुन कट्ट्याच्या मालकांचादेखिल आनंद ओसांडुन वाहु लागला.. )
__________________
आता कधी एकदा त्या धबधब्याखाली जातोय नि चिंबचिंब होतोय असे झाले होते.. अर्थातच पहिला नंबर सुन्याने लावला.. या पांढर्या शुभ्र धबधब्याचे वर्णन शब्दांकन करणे कठीणच.. जवळपास १०० फुटाहुन अधिक उंचीवरुन पडणारे पाणी अक्षरक्षः अंगावर मारा करत होते.. त्यातच पाणीही बर्फासारखे थंड.. त्यामुळे जणु काही गारांचा वर्षाव होत आहे असे भासत होते.. अशा या पाण्याच्या तडाख्याखाली पाच मिनिटे बसणेसुद्धा अवघडच.. उभे राहणे म्हणजे शेवाळावरती कसरत होती.. खालील फोटोंवरुन अंदाज येईलच..
---------------------------
कॅनियॉन व्हॅलीमे रहुंगा मै
---------------------------------
विश्वास बसत नव्हता एन उकाड्यात आम्ही धबधब्याखाली बसलोय.. छे, बसलो कुठे.. त्या थंड पाण्याने अंगात लगेच शिरशिरी आणली.. या दरीमध्ये केवळ या सात उनाड माबोकरांचा जल्लोष सुरु होता.. पाच पाच मिनीटांनी आम्ही धबधब्याखाली आत बाहेर करत होतो.. शेवटी कुडकुडा भरला नि सगळे बाहेर उन्हात आले.. काय दिवस होता आमच्यासाठी.... अफलातून !! अंग गार पडले नि आम्हाला भुक लागली.. मग लागलिच तशाच ओल्या कपड्यांमध्ये आम्ही उन्हातच एका मोठ्या खडकावर खायला बसलो ! आम्ही सगळे भुक्कड मायबोलीकर्स खाण्यात मग्न झालो..
खाता-खाता मायबोलीवरील विषयांवर देखील गप्पा रंगल्या.. हास्यकल्लोळात आमचे खादाडणे सुरु होते.. जशी पेटपुजा संपत आली तेव्हा उन्हाचे चटके बसु लागले.. नि समजुन आले की उन्हाळा सुरु आहे.. बाहेर कडक उन आहे ते.. मग काय पुन्हा एकदा आमची स्वारी धबधब्याकडे वळाली.. पुन्हा एकदा यथेच्छ भिजुन घेतले.. तर याच धबधब्याखाली तयार झालेल्या तळ्यात राज्या, झक्या, विकु नि सुन्या यांनी पोहण्याचा आनंद मनमुराद लुटला.. सुन्याने तर जलक्रिडा सुरु केली होती..
(झकासराव)
===============
(सुन्या दि ग्रेट)
एकंदरीत जवळपास दिडेक तास भिजण्याचा कार्यक्रम सुरु होता.. लवकरच आम्ही आटोपते घेतले.. पण सुन्याने तशाच ओल्या कपड्यांमध्ये चलण्याचे सांगितले.. मघाशी वाटेत दिसलेल्या छोटेखानी धबधब्याकडे जायचे होते.. ते पाणी पिण्यासही स्वच्छ नि अंघोळीसाठीदेखील मस्त ! आम्ही तशाच अवतारात बॅगा उचलुन चालु पडलो.. पंधरा मिनीटांची वाट होती पण तिथपर्यंत जाईस्तोवर आमचे ओले कपडे सुकुन गेले होते !! पुन्हा छोटेखानी धबधबा समोर आला नि आमची पाण्यातली मस्ती पुन्हा सुरु झाली.. माझी ट्रेकवरची आजवरची पहिलीच अंघोळ होती ! बरं या छोटेखानी धबधब्याखाली खुप धमाल फोटोसेशन देखील झाले.. मग ते किंगफिशर कॅलेंडरच्या धर्तीवर मायबोली कॅलेंडर काय.. मायबोली श्री काय.. नि ऑल इज वेल चा तोहफा काय..
ते फोटो इकडे न टाकणे तेच बरे..
( हे फोटो केवळ आग्रहाखातर मेल द्वारे पाठवले जातील..
).. आमच्यातले बहुतेक सगळे एकमेकांना पहिल्यांदा वा दुसर्यांदाच प्रत्यक्षात भेटत होते.. पण त्याचा आमच्या धमालमस्तीवर काहीच परिणाम झाला नव्हता..
एव्हाना तीन वाजत आले होते.. नि सगळ्यांनी बॅगा आवरायला सुरवात केली.. सम्याने आणलेल्या पुरणपोळ्या (घरगुती नव्हे :P) खाण्यात आल्या.. पण खाण्यासाठी तो करत असलेला आग्रह बघुन ह्याच्या घरातुनच आणल्या आहेत असे वाटत होते.. सगळे तयार झाले नि मग एक ग्रुप फोटो काढण्याची तयारी सुरु झाली..
(मायबोलीकर्स रॉक्स !!)
---------------------------
तयारी झाली नि १..... २..... ३......
ग्रुप फोटोसेशन झाले नि आम्ही परतीची वाट धरली.. आता आमचा ट्रेकचा शेवटचा टप्पा जो म्हणजे चढुन संपणार होता.. उतरताना आम्ही लोणावळ्या घाटातुन उतरलो होतो तर चढताना खंडाळाच्या घाटातुन वरती येणार होतो.. ही वाट थोडीफार खडतर आहे हे मी ऐकुन होतो.. तर सुन्याने पाहिले होते... त्यामुळे आम्हाला आवश्यक ती काळजी घ्यायची होती.. सुरवातीला आम्हाला नदीच्याच पात्रातुन जायचे होते..
वरील दाखवलेल्या फोटोप्रमाणे तिथुनच आम्हाला कडेकडेने पुढे सरकायचे होते.. पण त्यासाठी आधी खाली उतरायचे होते.. तसा १० फुटी पॅच असेल पण पकडीसाठी फार कमी जागा असल्याने जरा धांदल उडणार होती..
सुन्या देत असलेल्या सुचनांप्रमाणे पहिला विन्या नि मग सम्या नि विकु उतरले..
-----
इथे विन्या नि सम्याला मागे केलेल्या ढाकबहिरी ट्रेकच्या अनुभवाचा फायदाच झाला..
हे लोक्स पुढे गेले पण खरी कसोटी झक्याची होती.. त्याला सुखरुप खाली उतरवण्याची माझी नि सुन्याची जबाबदारी होती.. पण झक्याच्या सोबतीला राज्यादेखील उतरताना गोंधळला नि मग काय विचारु नका..
-------
------------------
सुन्या त्यांना नीट खाली उतरेस्तोवर मी इतरांना पुढे घेउन गेलो.. कारण तितका वेळ वाचवायचा होता.. त्यात ही वाट थोडी निमुळती होती.. दगडाला चिपकुन चिपकुन पुढे सरकायचे होते.. शेवटी सगळ्यांनी काळजीपुर्वक ती वाट पार केली नि आमची नदीच्या पात्रातुन जाणारी वाट डावीकडच्या पहाडात शिरली.. आता आम्ही नदीचे पात्र सोडुन सुक्या धबधब्याच्या वाटेने सरळ वर चढत जाणार होतो.. तरी नशिब सुर्यदेव आमच्यावर मेहरबान झाले होते नि दरीच्या एका पहाडामागे लपले होते.. त्यामुळे जरी गरम होत असले तरी उनाचा त्रास नव्हता..
अधुनमधुन दम खात आम्ही वर चढत होतो.. ही वाट सरळसोट वरती जात असल्याने वेळ कमी लागणार होता.. पण कष्ट अधिक होते.. कारण अधुनमधुन लागणारे एक दोन छोटे रॉक पॅचेस.. पण सगळ्यांनी दाखवलेली चिकाटी नि जिद्द त्यामुळे कुठलाच अडथळा आला नाही.. वाटेत मध्यावर विचित्र प्रकारच्या माश्यांनी (गांधील माश्या की मधमाश्या की अजुन दुसरे काही ) आमचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला पण तोही अडथळा पार केलाच.. यात शेवटचा पॅच सर्वात भारी होता कारण पकडण्यासाठी एक दोन ठिकाणीच खाच्या होत्या.. इथे खासकरुन झक्या नि सम्याचे कौतुक.. थोडीफार मदत जरी घेतली तरी स्वतःची शक्ती पणाला लावुन त्यांनी हा पॅच सर केला.. शेवटी निव्वळ इतरांच्या मदतीने, दुसर्यांच्या भरवश्यावर ट्रेक करणे म्हणजे काहीच मजा नसते ! स्वबळाने ट्रेक करण्याला खरा अर्थ असतो ! त्यासाठी आत्मविश्वास नि चिकाटी नि आवड असणे जरुरी असते
पुन्हा एकवार विश्रांती घेण्यात आली..
(घामाघुम झालेले सम्या नि झक्या )
--------------------------
आता आम्ही बरीच उंची गाठली होती.. जसे वरती चढत गेलो तसे कॅनियॉन व्हॅली (उल्हास नदीचे पात्र) नीट दिसु लागले..
नि इथुनच वरती आल्याचा अभिमान सगळ्यांना वाटत होता..
(सम्या नि झक्या.. च्यामारी इकडुन आलो )
----------------------
तर वरती चिअरअप सुरु होते..
मिशन वेळेत कम्प्लिट केल्यावर उडी मारुन आनंद साजरा केलाच पाहिजे..
(विन्या.. अधांतरी..)
--------------
(आज राज्या उपर.. यो रॉक्या निचे )
शेवटचे फोटोसेशन संपवुन आम्ही तिथुनच पुढे पाउलवाटेन पाच दहा मिनीटात एक्स्प्रेस हायवेवर आलो.. तिथुनच मग पुणेकर रिक्षाने लोणावळा रेल्वे स्थानकात तर मुंबईकर एस्टी स्टँडला निघाले.. शेवटच्या घाईगर्दीत नीटसा निरोप घेता आला नाही पण ह्या ट्रेकच्या आठवणी कायमच्या स्मरणात राहतील.. नि विसरायचे म्हटले तरी कॅमेर्यात कैद झालेल्या आठवणी आहेतच !
या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या विन्या, सम्या, झक्या, राज्या नि विकु या सर्वांचे आभार मानतो.. सगळ्यांच्या सहभागामुळेच इतकी मजा अनुभवता आली.. नि फक्त मायबोलीकरच असल्याने ही मजा काही औरच.. हल्लीच मागे जाउन येउनही आमच्यासोबत परत येण्याची माझी विनंती एका फटक्यात स्विकारल्याबद्दल सुन्याचे खास आभार.. एकंदरीत उनाड माबोकरांचा उन्हाळी वर्षाविहार धुमधडाक्यात झाला होता.. आता पावसाळी वविची वाट बघायची
समाप्त
(वर पोस्ट केलेले सर्व फोटो ह्याच्या नि त्याच्या कॅमेर्यातले असुन ह्याने नि त्याने काढलेले आहेत.. )
अधिक धमाल नि सविस्तर फोटोंसाठी खाली लिंक्स देत आहेत
विशाल कुलकर्णीची फोटो लिंक..
http://picasaweb.google.co.in/vishalkulkarni35/CaniyonValley?feat=email#
यो रॉक्सची फोटो लिंक
http://picasaweb.google.com/yo.rockks/20100404#
सम्याची फोटो लिंक
http://picasaweb.google.com/sameer.ranede/UlhasVally?feat=email#54566565...
विन्याची फोटो लिंक
http://picasaweb.google.com/yo.rockks/VinyasCam#
झक्याची लिंक
http://picasaweb.google.com/zakasrao/CanyonValleyTigerValleyWaterFall
लै भारी जागा आहे रे.. सहीच...
लै भारी जागा आहे रे.. सहीच...
सहि.. खुप मज्जा केलेली
सहि.. खुप मज्जा केलेली दिसतेय..

धबधब्याचा फोटो खासच..
कसली धमाल केलीय तुम्ही
कसली धमाल केलीय तुम्ही लोकांनी !
सगळ्यांच्या जिद्दीचे कौतुक. कुठेच साधी वाट दिसत नाहिये. सगळे मोठाले दगडच दिसताहेत.
खूप छान अगदी गार वाटल
खूप छान अगदी गार वाटल पाण्यातले फोटो पाहून
यो जबरदस्त फोटो आलेत.. अतिशय
यो जबरदस्त फोटो आलेत.. अतिशय सुरेख... आणि सिग्निफिकंट...
सहीच. फोटोंसकट बहारदार वर्णन.
सहीच. फोटोंसकट बहारदार वर्णन. समीर व झकासरावांचे खास अभिनंदन.
मस्त, मस्त म्हणजे काय एकदमच
मस्त, मस्त म्हणजे काय एकदमच सुपर्ब


फोटो छानच क्रमवार लावले आहेत वरती मजकुराबरोबर, त्यामुळे अगदी स्वत:च तिथे असल्याचा भास होतोय
(अर्थात प्रत्यक्षात जाऊ न शकल्याचे दु:खही! पण असो. )
मनात एक शन्का आली, की उन्हाळ्यात हे ठिकाण ठिक आहे जायला यायला, पावसाळ्ञात (किन्वा नन्तर नोव्हेम्बर्-डिसेम्बरमधे) कुणी जाऊ शकेल काय? अवघड दिसते!
आमच्या झक्याला धुतला ना नीट खरवडून खरवडून?
राज्या पण गेलेला म्हणजे आश्चर्यच आहे, त्याच्या मोबाईलमधे सोय अस्ती तर त्याने लगेच त्या व्हॅलीचा फोटु/क्लिप काढून बॉसला एसेमेस करायला हवी होती, मी तरि नक्कीच केली अस्ती!
लेका मी आत्ता आहे कुठे अन तू विचारतोहेस काय मला? हे देखिल ऐकवले अस्ते वर.
"राकट देशा, कणखर देशा, दगडान्च्या देशा" ही ओळ अगदी सर्वान्गाने अनुभवलीत
अन येच देशीचे असल्याचे सिद्धही केलेत, त्याबद्दल सगळ्यान्चे अभिनन्दन 
अरे वा.. सर्वानी एकदम मज्जा
अरे वा.. सर्वानी एकदम मज्जा केलेली दिसतेय. व्हॅलीची अवस्था काय आहे म्हणे तुमच्या ट्रेकनंतर???
अरे वा सहीच की... फोटो
अरे वा सहीच की... फोटो मस्तच...
जळ्ळ मेल लक्षण ह्या
जळ्ळ मेल लक्षण ह्या योग्याच.
लेकाचा मुंबईत पाणी कपात आहे म्हणुन आंघोळीला डायरेक्ट धब्धब्याखाली.
पण एक मानल पाहिजे. लोणावळ्ञापासुन तीन तास दरीत उतरणे (घसरत, पडत,) आणि तिथुन दोन तासात (कुथुन कुथुन का होइना) खंडाळा घाटाच्या जवळ पोचणे हे व्यर्थ नव्हत तर खाली जी काही मजा केली त्यासाठी वर्थ होत.

(कोण रे ते झक्याने काल पाय दुखतात म्हणुन सुट्टी घेतली म्हणतोय?? :रागः
योग्या हात आखडता घेतलास लिहिताना. ह्या ट्रेकला आम्ही बर्याच जणांची आठवण काढली होती. ते लिहिल नाहिस रे
सुन्या, योग्या, सम्या, विन्या, विशल्या आणि राज्या ह्यांच्या मदतीशिवाय हा ट्रेक मला शक्य झालाच नसता.
त्यानी चीअर अप केलच, जिथे अनुभवी नसल्याने माझी गोची व्हायची तिथे मला खुप मोलाच्या सुचना दिल्या आणि काहीवेळा चक्क वर घेतल.
त्यांचे आभार मानन फारच औपचारीकपणा होइल (जो त्या धबधब्याखाली वाहुन गेलाय)
क्लासिक आणि ग्रेट ट्रेक
लिन्क दे इकडे. तुला मेल केली आहे.
योग्या ते फोटो सगळ्याना नको बे पाठवु. समजुन घे. एकतर नव्या मायबोलीत पांढरी शाइ नाहिये.
सहीच यो!! मस्त धमाल केलीत.
सहीच यो!! मस्त धमाल केलीत.
काश मैं आ पाती
(बरं झालं ही आली नाही असं मनात म्हणशीलच तू
)
मला पाठवा रे ते फोटो
मला पाठवा रे ते फोटो
झकास वर्णन! ट्रेक तितका सोपा
झकास वर्णन!
ट्रेक तितका सोपा वाटत नाहीये. धबधबे ऑसम!
ट्रेक ची इतरांनाही माहीती कशी
ट्रेक ची इतरांनाही माहीती कशी मिळेल ?
मस्त रे य्यो.... लय बैजवार
मस्त रे य्यो.... लय बैजवार लिवान फोटु बी टाकले. तेच्यामुळा प्रत्यक्ष थंयच असल्या सारका वाटता. पावसाळ्यात हयली काय परिस्थिती असतली हेची कल्पनाच करता येणा नाय रे...
जबर्याच फोटो आलेत! मस्तच!
जबर्याच फोटो आलेत! मस्तच!
आता वाचतो
आयच्यान सांगतु लै मज्जा
आयच्यान सांगतु लै मज्जा आली.
पुढे काही सुरू करण्याआधी नंदिनीच्या प्रश्नाचे उत्तर...
<<<अरे वा.. सर्वानी एकदम मज्जा केलेली दिसतेय. व्हॅलीची अवस्था काय आहे म्हणे तुमच्या ट्रेकनंतर???>>>
खाणे झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या पुन्हा तिथल्या शुद्ध पाण्याने भरून घेतल्या होत्याच. कारण येताना घाट चढायचा होता. पाणे लागणारच होते. पण खाद्यान्न आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, वर्तमानपत्राचे कागद आणि इतर सर्व कचरा (आम्ही केलेला) आम्ही आपापल्या थैल्यांतून भरून घेतला. जो प्रत्येकाने शहरात पोचल्यावर योग्य ठिकाणी कचराकुंड्या बघून खाली केला असेलच.
असो...
आधी सम्याची मेल आणि मग विन्याचा समस... त्यात विन्याने सांगितलेले.."अरे तिथे मोठ्ठा धबधबा आहे म्हणे" मला मोहात पाडायला पुरेसे होते. आणि लग्नानंतर कुठे फ़ारसा ट्रेकला गेलोच नव्हतो. त्यामुळे ही संधी उचलली नसती तरच नवल होते. पण मनात एक धाकधूक होती...कारण सम्याची मेल आणि विन्याचा फ़ोन दोन्ही ज्या दिवशी आले होते तो दिवस होता "१ एप्रिल".. त्यामुळे तीन-तीनदा फ़ोन करुन कन्फ़र्म करून घेतले. आणि रविवारी सकाळी विन्या आणि यो ला जॊईन झालो.... आम्ही पोहोचेपर्यंत पुणेकरांने नाष्टापाणी आटपून घेतले होते. त्यामुळे लगेच डेस्टिनेशनकडे कुच केले......
माथ्यावरून जेव्हा या दोन्ही धबधब्यांचे रुप पाहीले तेव्हाच फ़िदा झालो.
मध्येच यो आणि सुन्या दोघांनी मिळून आपली शक्ती आजमावून दाखवण्याचे खेळ करून दाखवले.
सम्या आणि राज्या दर पंधरा-वीस मिनीटांनी सुन्याला विचारत होते अजुन किती वेळ.. आणि प्रत्येक वेळी सुन्या इमानदारीत सांगत होता... फ़क्त दोन तास
सम्याच्या वेगाने चालत चालत शेवटी साधारण तीन-साडे तीन तासांनी आम्ही खाली पोहोचलो. वाट फ़ारशी कठीण नव्हती पण खडकाळ असल्याने कष्ट पडत होतेच. पण सोबतीने झुळझूळ वाहणारे झरे आणि पाण्याचे ओहोळ वाट सोपी करत होते. मध्येच कुठेतरी एखादं एकटं-दुकटं रानफ़ुल हसून स्वागत करत होतं.
मध्यावर पोहोचल्यावर जिथे यो ने उंचावरून खोली मोजण्याचा प्रयत्न केला तिथे मी आपला उगाचच अनुभवी ट्रेकरच्या अविर्भावात फोटो काढून घेतला.
(जणुकाही एवढी मोठी चढण चढूनच आलोय
मुळ धबधब्यापाशी पोचल्यावर मात्र खरोखरच भान हरपले... देखणेपणाची परिसीमाच होती ती !
अतिषय स्वच्छ आणि शुद्ध पाणी..... आणि आजुबाजुला पसरलेली सुरेल शांतता....
आमचीही बोलती बंद झाली होती ते सौंदर्य पाहून. इतरवेळी डेस्टिनेशनला पोहोचले की मुखातून आनंदाच्या आरोळ्या फ़ुटतात. पण इथे ते रुद्र सौंदर्य पाहून सगळेच भारावून गेलो होतो...! तोंडातून शब्दही फुटत नव्हता.
सुन्याला तेवढं एकदा ओरडून धन्यवाद म्हणलं असेल इथे आणल्याबद्दल तेवढेच..... मग सुरुवात झाली ती आनंदोत्सवाची.....! त्याचे वर्णन अतिषय योग्य शब्दात यो ने केलेच आहे. फ़क्त त्याचं आभार मानणं खटकलं... ते खरे तर आम्ही मानायला हवेत सुन्या आणि यो दोघांचेही. कारण ते दोघेही अनुभवी ट्रेकर्स सोबत असल्यानेच हा ट्रेक यशस्वीरित्या आम्ही पुर्ण करू शकलो.
शेवटी पुन्हा एकदा वर खंडाळ्यात पोचल्यावर कॅमेरा सरसावण्याचा मोह मला आवरला नाहीच..
आता वाट पुढच्या ट्रेकची.......
एक फ़ोटो टाकायचा
एक फ़ोटो टाकायचा राहीलाच..खादाडी चालू असताना सहज मालकांच्या डोळ्यावरच्या गॊगलकडे लक्ष गेले आणि जवळच असलेला झक्याचा कॅमेरा सरसावण्याचा मोह मी टाळला नाही.
मालकांच्या नजरेतून माबोकरांचा उन्हाळी वर्षाविहार.....
सही रे एकदम
सही रे एकदम
यो मस्त
यो मस्त वृतांत...नेहमीप्रमाणेच

तरे बर यात तु " मायबोली श्री " आणि "मायबोली कॅलेंडर " चे फोटो टाकले नाहिस ते...
यो, सुन्या... वृत्तांत आणी
यो, सुन्या...
वृत्तांत आणी फोटो उत्तमच... तुमचां दोघांचाय आमंत्रण/ निमंत्रण मिळालेलां व्हतां...
एक तर आदल्या दिवशी मी 'नि शा च र' होतय, आणि तेतूर परत संपूर्ण रात्र 'नेटवर्क' बरोबर माझी एकट्याचीच लढाई सुरु व्हती. तब्बल ४० तास काम करुन घराकडे गेलेलय. म्हणान तुमका दोघांका साधो रीप्लाय देखील देवक नाय...
खरी गोष्ट सांगतयः- तब्बल अडीच वर्षां मी त्या परिसरात र्हवाक होतंय. पावसाळ्यात असणारां 'ढगां'चां सम्राज्य, तेच्या नंतर थंडीची मजा आणी नंतरचो ऊन्हाळो मी प्रत्यक्ष अनुभवलेलो आसंय. अर्थात मी ट्रेक करुच्या वाटेक जावक नाय... पण जेव्हां-जेव्हां एकटो असंय तेव्हां, किंवा खूपच डीस्टर्ब असय तेव्हां मी थंयसरच 'टेबल-टॉप'वर जावन बसंय (एकटोच), आणी पूर्ण शांत झालय काय मगे घराकडे परतान येय... माझ्या सारख्या 'एकट्या' र्हवाक शकणार्याक 'ह्यो परीसर' खरोखर उत्तम आसा...
मी सगळ्या माबोकरांच्या वतीने
मी सगळ्या माबोकरांच्या वतीने यो अणि सुन्याला साकड घातल आहे,
की माबो मार्फत ट्रेक चालू करा..याही अजून एका निमित्ताने बरेच मायबोलीकर एकत्र येतील...
झक्याच विशेष अभिनंदन्,कारण
झक्याच विशेष अभिनंदन्,कारण शरीराची तितकी साथ नसताना ज्या जबरदस्त इच्चाशक्तिने त्याने ट्रेक पूर्ण केला.....आपला मुजरा झक्याच्या चरणी...
झक्या कुणाकुणाची आठवण काढलिस?
झक्या कुणाकुणाची आठवण काढलिस?
व्वा, चष्म्यातला फोटु भारीच!
व्वा, चष्म्यातला फोटु भारीच!
>>>> कारण शरीराची तितकी साथ नसताना <<< आयला, तो काय म्हातारा झालाय काय आमच्यासारखा? कस्ली साथ अन कस्ल काय! चान्गला आडदाण्ड गब्दुल्ल्या हे तो कोल्हापुरी पैलवान, त्याला काय धाड भरतीये?

हां, आता कामामुळे दिसदिसभर खुर्चीला चिकटललेला अस्तो मुन्गळ्यावाणि अन काय..... पण मग जरा अजुन फिरवुन पिन्गवुन आणा त्याला
पण काही म्हणा, लय भारि ट्रेक हा!
शरीराची साथ नसताना म्हणजे
शरीराची साथ नसताना म्हणजे काय?
यो वृतांत सहि रे एकदम. कोलाज
यो वृतांत सहि रे एकदम. कोलाज इफेक्ट पण एकदम सहि..

झक्या तुला खरच सलाम.
यो आणि सुन्या मालकान्नी जे साकडं घातलय त्याला कौल द्या आम्हि बरोबर आहोतच.
आणि यो, सुन्या, विशाल, विन्या, राज्या, झकास हया अवर्णनिय प्रवासासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार.
लवकरच भेटु परत..
सह्ही आहेत फोटो आणि वर्णन तर
शरीराची साथ नसताना म्हणजे
शरीराची साथ नसताना म्हणजे काय?>>>
शब्द कदाचित चुकले असतील.माफ करा.
चान्गला आडदाण्ड गब्दुल्ल्या >>> त्याकरताच म्हणत होतो मी...
वजन जास्त असल्याने त्याला स्वत: पुल ( इग्रजी शब्द ) करण जमत नव्हत.
>>>> वजन जास्त असल्याने
>>>> वजन जास्त असल्याने त्याला स्वत: पुल ( इग्रजी शब्द ) करण जमत नव्हत.

वजन जास्त आहे, हे तुला कुणी सान्गितल? तू करुन बघितलस त्याच वजन? की उचलुन बघितलस त्याला?
त्याचा तो गैरसमज आहे की त्याच वजन जास्त आहे!
नाही, तस मित्रमन्डळीन्मधे, नातेवाईकात, ऑफिसमधे त्याच वजन जास्त असेल तर असुद्यात!
पण वजनकाट्यावरचे वजन जास्त आहे यावर माझा विश्वास नाही, तो त्याचा मानसिक गैरसमज आहे.
किन्वा काम करणे टळावे म्हणूनची वजन जास्त ही सबबही असेल!
Pages