फ्रान्सचे दिवस... आणि फ्रान्सच्या रात्री
Submitted by हर्ट on 12 February, 2010 - 02:41
एकदा सिंगापुरातील ग्रंथालयात पायाच्या टाचा वर करुन कपाटातून पुस्तके काढत असताना एक पुस्तकं माझ्या पायापाशी पडले. मी नमस्कार करुन ते पुस्तक सरळ करुन वाचले तर त्यात मला काही फोटो आढळले. ते कृष्णधवल फोटो पाहुण माझे मन आतल्या आत कुठल्या तरी हळव्या स्पर्शानी विरघळले. त्यात काही पत्राचा भाग होता जो कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिला होता. मग मी मुखपृष्ठावर नजर टाकली तर नाव दिसले 'The Diary of a Young Girl - Anne Frank'. मी ते पुस्तक तिथल्या तिथेच उभ्यानी वाचायला सुरवात केली आणि पुस्तकाशी समरस होऊन गेलो. जेवढी पाने तिथल्या तिथे वाचली ती वाचून मला अगदी तरल भावनिक आनंद मिळाला. मी ते पुस्तक घरी आणले.
विषय:
शब्दखुणा: