मी आईला फोन करून सांगितलं की आताच कुशालनगरहून निघते आहे. तिला कळलं की एक दीड तासात मी घरी पोहोचेन. तासाभराने मी राजाज् सीटला वळसा घालून जनरल थिमय्या रोडला लागले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजले होते. पोरं रस्त्यावर पतंग उडवत होती. रोडच्या शेवटाला आमचे घर. आई गेट उघडण्याच्या तयारीत वरांड्यातच थांबली होती. मी गाडीतून उतरून तिच्याकडे धावत गेले.
या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे...