मी आईला फोन करून सांगितलं की आताच कुशालनगरहून निघते आहे. तिला कळलं की एक दीड तासात मी घरी पोहोचेन. तासाभराने मी राजाज् सीटला वळसा घालून जनरल थिमय्या रोडला लागले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजले होते. पोरं रस्त्यावर पतंग उडवत होती. रोडच्या शेवटाला आमचे घर. आई गेट उघडण्याच्या तयारीत वरांड्यातच थांबली होती. मी गाडीतून उतरून तिच्याकडे धावत गेले.
मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. भारतातील जवळजवळ सर्वच भागात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इंडो - आर्यन (हिंदी) भाषेनुसार यांस 'मकर संक्रांथी' असे म्हंटले जाते. दक्षिणेकडील काही भागात आजही हेच नाव प्रचलित आहे. हा सण विशेषत: सुर्य देवतेशी संबंधित आहे. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण यांस 'संक्रांती' असे म्हणतात तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून 'मकर संक्रांती' असे नाव प्रचलित झाले, यानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश, वसंत ऋतूचे भारतातील आगमन अशा अनेक परंपरागत समजुती आणि प्रतीके हा सण साजरा करण्यामागे आहेत.
आज पहाटे पहाटे शामिकाने काढलेले क्रेओन..
संक्रांत जवळ आल्याची चाहूल लागली आहे...
चल बाळा आपण पतंग घेवू
चल बाळा आपण पतंग घेवू
बघ कितीतरी पतंग आहेत येथे
कितीतरी आकाराचे
पांढरे, निळे, पिवळे, हिरवे
काही दुरंगी आहेत तर काही तिरंगी पट्याचे
बरेचसे कागदी अन काही प्लास्टीकचे
काही पतंगांवर सचिन तेंडूलकर आहे तर काहींवर दबंग सलमान
काहींवर हिरॉयनी आहेत
तू कोणताही पतंग निवड बाळा
घोबी घे, कन्नी घे, डायमंड घे
अन मांजाही घे, बरेली आहे, साधा आहे, नायलॉनही आहे.
चल लवकर आटप. घे चांगले दोन डझन पतंग घे.
भरपूर पेच लावू आपण.
किंमतीची काळजी करू नकोस