Submitted by पाषाणभेद on 11 January, 2011 - 23:44
चल बाळा आपण पतंग घेवू
चल बाळा आपण पतंग घेवू
बघ कितीतरी पतंग आहेत येथे
कितीतरी आकाराचे
पांढरे, निळे, पिवळे, हिरवे
काही दुरंगी आहेत तर काही तिरंगी पट्याचे
बरेचसे कागदी अन काही प्लास्टीकचे
काही पतंगांवर सचिन तेंडूलकर आहे तर काहींवर दबंग सलमान
काहींवर हिरॉयनी आहेत
तू कोणताही पतंग निवड बाळा
घोबी घे, कन्नी घे, डायमंड घे
अन मांजाही घे, बरेली आहे, साधा आहे, नायलॉनही आहे.
चल लवकर आटप. घे चांगले दोन डझन पतंग घे.
भरपूर पेच लावू आपण.
किंमतीची काळजी करू नकोस
किंमत महत्वाची नाही तूझा आनंद महत्वाचा आहे.
अरे गेल्या वर्षीच्या अपघातामुळे तूझे दोन्ही हात जायबंदी झालेत
म्हणून काय तू पतंग उडवायचा नाही?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०१/२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
किती विदारक सत्य सांगितलेत,
किती विदारक सत्य सांगितलेत, पण .......
लक्षात कोण घेतो ?
किती जणांचे जीव जातात,
किती पक्षी मरतात पण....
लक्षात कोण घेतो ?