मॉडर्न लायब्ररी इंग्रजी पुस्तकांची नोंद ठेवते. तेथे वाचक आपल्या पसंती नोंदवू शकतात, क्रिटिक्स टॉप व रिडर्स टॉप असे कौल घेतले जातात. मराठीत "रसिक" व 'अंतर्नाद' ने तसा प्रयोग केला. पण तो २००६ साली झाला.
"'तें' दिवस" या श्री. विजय तेंडुलकरांच्या अखेरच्या पुस्तकाचं प्रकाशन १९ मे रोजी डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते पुण्यात झालं. 'मायस्थेनिया ग्रेव्हीस' या आजारानं जर्जर झालेले तेंडुलकर त्यांच्या अखेरच्या दिवसांत डॉ.
'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं.
श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच.
डॉ. श्रीराम लागू हे तेंडुलकरांचे मित्र व त्यांच्या नाटकांतील अभिनेते. डॉ. लागूंनी नाटकात पदार्पण केलं ते तेंडुलकरांच्या नाटकातूनच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, सेन्सॉरशिप या मुद्द्यांवरून जेव्हा शासनाशी भांडण्याची वेळ आली, तेव्हा डॉ. लागू, तेंडुलकर, दुर्गाबाई, कमलाकर सारंग अग्रस्थानी होते. तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नाटकांबद्दल बोलत आहेत डॉ. श्रीराम लागू..
प्रत्येक माणसात असंख्य माणसं कोंबलेली असतात. वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळ्या प्रवृत्ती घेऊन आलेली ही माणसं शोधणं फार कठीण असतं. तेंडुलकरांना मात्र ते सहज जमलं होतं.