पहिलं नमन..
पहिल्या पानावर कुणाचा मान?
रंगीबेरंगीच्या पहिल्या पानानिमित्त मीनू की कुणीतरी यावर लिहिलेलं आठवतं. नव्या पुस्तकाचे वास, अन नव्या वहीच्या पहिल्या पानावरचं लिखाण, चित्रे, नक्षी इ. नी मनात खास जागा व्यापलेली. या पहिल्या पानाबाबत व्यक्ती तितल्या प्रकृती या न्यायाने अनंत प्रकार बघायला मिळायचे.
'श्री' ला तर हक्काची जागा. हा 'श्री' म्हणजे नावाच्या आधी येणारा, की देवाचं 'टोपणनाव' दर्शविणारा- याबाबत बरेच दिवस माहिती नव्हते. ते तसेच असते- हा न्याय! पुढे 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' हे तिसरी चौथीत असताना केव्हातरी ऐकले तेव्हा हा 'श्री' म्हणजे गणपती किंवा कोणता तरी देव असे आहे, हे कळले. तर, या 'श्री'भोवती पेन-पेन्सिलने लिंवा ऑईल पेस्टल्सने केलेली नक्षीही आठवते. मुलींच्या वह्यांतल्या 'श्री' भोवती पानाफुलांची किंवा चक्क मेंदीची वाटेल, अशी नक्षी असायची.
'श्रीगणेशा' शब्दाची ओळख इथून झाली, अन या शब्दाचे जे अप्रूप वाटत रहिले, ते आजतागायत. (कितीही शुर वगैरे वाटत असला, तरी हा थोडा फसवा शब्द आहे असेही पुढे कळले. थाटामाटात सुरूवात करून तिथेच सोडून दिलेल्या बर्याच गोष्टी याला साक्षीदार आहेत.. पण तो भाग वेगळा.)
गणपतीला पहिला नमस्कार करून प्रत्येक गोष्ट सुरू करावी, म्हणजे ती शेवटास जाते, यशस्वीरीत्या पार पाडते- या विचारातून हा शब्द तयार झाला असावा. घरात अन शाळेत केव्हातरी हे बिंबवले गेल्यामूळे पहिल्या पानावर 'श्री' सोबत गणपतीचे जमेल तसे छोटे चित्र, किंवा कलात्मकरित्या काढलेली गणपतीची सोंडही येऊ लागली. एकदा माझ्या वहीवरची सोंड उजवी की यावर एका मित्राने वाद घातला. गणपतीची उजवी की आपली उजवी- हे शेवटपर्यंत काही कळले नाही. मग खाडाखोड होऊन पहिलं पान विद्रूप झालं. मग ते फाडलं, अन ते घरी लक्षात आल्यामूळे मार खाल्ला- असंही आठवतं.
हे 'श्री', गणपती, सोंड, नक्षी वगैरे झालं, की आपापल्या परीने 'सुवाच्च्य' अक्षरात आपले नाव. पुढे इयत्ता, शाळा, तुकडी इ. यामध्ये अर्धे पान संपले की उरलेल्या पानात सुविचार. हे बहूधा जीवन, आयूष्य, कर्तव्य याबाबत असत. बर्याच वेळी त्याचा अर्थही कळत नसे, म्हणून ते अतिशय उच्च वाटत. काहीवेळा गांधीजीं पासून ते सॉक्रेटिस पर्यंत कुणाचीही 'कोट्स' असत. हे सॉक्रेटिस सारखे शब्द लिहायलाही थोर वाटे. असं काहीतरी 'भारी' लिहून पहिल्या पानाचं वजन वाढविलं, की शाबासकी मिळून स्वतःचंही वजन वाढल्यागत वाटे. मग अशा भारीभारी वचनांचा, सुविचारांचा शोध पुन्हा सुरू!
***
पहिलं पानच कशाला.. हे असं सारंच 'पहिलं-पहिलं' छान वाटते नाही? हे बरेच 'पहिले' तेव्हापासुन असे जे मनात ठाण मांडून बसलेत, की ज्याचं नाव ते!
घर सोडल्यानंतरच्या पहिल्या दिवशी दादांनी होस्टेलला सोडलं, अन पाठ फिरवून चालता चालता दिसेनासे झाले. रस्त्याला वळण होतं, की डोळ्यांत पाणी आलं होतं, देव जाणे. पण मित्राने हात हलवून 'ठोंब्या, रडतोस काय? लहान आहेस का तु आता?' असं विचारलं, तेव्हा त्या रस्त्यालाच नाही तर आपल्यालाही हे वेगळं वळण आता लागलं आहे- हे जाणवून गेलं. त्या मित्राच्या वडिलांनी त्याला 'असं' सोडलं, तेव्हा त्याला नाही का रडू आलं- ते राहूनच गेलं विचारायचं.
त्यानंतर कॉलेजात अनेकांचे होतात तसे बरेच 'पहिले' झाले. दारू-सिगरेटचे 'पहिले' हे तर प्रत्येकाचेच 'लिहुन' ठेवण्याजोगे असतात. प्रत्येक गोष्ट एकदा तरी करूनच बघायचीच- या हट्टापोटी काय काय केले, याला गणती नाही. सिगरेट वगैरे ठीक आहे. पण एकदा विडी ओढून बघायला काय हरकत आहे- असं मनात आलं त्याच्या दुसर्या दिवशी एम१, एम२ असा काहीतरी पेपर होता. (आपलं गणित आवडतं आहे, पक्कं आहे. शिवाय गणिताच्या शिक्षकाचा पोर असल्यामूळे हे आपला गणिताचा पाया पक्का ही समजूत निर्दयपणे मोडीत काढणारे हेच ते पेपर.) सुरूवातीला गोडकडू अशा काहीतरी विचित्र लागणार्या त्या धुराने आपला इंगा नंतर दाखविला. नंतर अर्धा तासभर आडवा झालो. मग हे प्रकरण सिगरेटपेक्षा फारसे चांगले नाही, हे कळले. पण एकदाची ओढून बघितली, हे समाधान!
***
पहिली नोकरी, पहिला पगार, पहिली गाडी, पहिला लाँग ड्राईव्ह, व्यवसाय सुरू केल्यावर मिळालेला पहिला क्लायंट, पहिलं ऑफिस अन घर हे असेच स्वतंत्र ललिताचे विषय होतील.
पण आपण बर्याच रोज करत असलेल्या गोष्टी पहिल्यांदा कधी केल्या, हेही पडद्याआड जातं अनेक वेळा. पहिली कथा, कविता अशीच कुठेतरी गेली, हरवली. ते आज वाचायला मिळालं, तर हसू येईल नक्की. शाळेतलं पहिलं भाषण असंच. एखाद्या थोराच्या जयंती-पुण्यतिथीला शाळेत शिक्षकांनी मारून मुटकून उभं केल्यावर केलं असेल बहूतेक. नंतर त्यात काही बक्षिसे वगैरे मिळाल्याचेही आठवते. पण त्याचा 'श्रीगणेशा' वाहून गेला तो गेलाच. मायबोलीवरल्या पहिल्या पोस्टबाबतही असंच काहीतरी झालं. असं अनेक पहिल्या गोष्टींचं होत असावं..
बर्याच वेळा त्या गोष्टींची 'अखेर' झाल्यावर मनात येतं- 'हे सुरू कसं अन कधी झालं होतं बुवा? काही केल्या आठवत नाही, अन फुकाचा त्रासही होतो. थोडक्यात एखादी गोष्ट 'सुरू' झाल्याचं आपल्या गावीही नसतं कधीकधी. नंतर तो क्षण हातातनं निसटून गेल्याची चुटपूट लागून राहते..
तर, यामूळे हे पहिलं पान. म्हटले- तर उगाच खरडले, म्हटले- तर ते पहिले पानच मुळी लक्षात राहावं यासाठीचा खटाटोप..! याव्यतिरिक्त त्याचे काही महत्व? माहीत नाही. 'खाण्याचं पान' जमून आलं, तर त्याची चव रेंगाळत राहते तसं काही जमलं तर बघावं, हाही हेतू असेल कदाचित. यापैकी काहीच नसेल, तर 'पहिलं नमन' एकदाचं उरकून घ्यावं, म्हणजे पुढे सुरळित होईल- या केव्हातरी मनावर उमटून गेलेल्या ठशामूळेही असेल एखादे वेळेस..!!
***
पहिलं प्रेम, पहिलं प्रेमपत्र, पहिलं चुंबन याबाबत म्या पामराने काय बोलावे?
त्याला अनेक पाने लागतील बहूतेक. ते सारे पहिल्या पानात कसे मावणार??!!!
***
***
पह्यलं नमन
पह्यलं नमन मार्गी लागलं
रंगीबेरंगीवरील पानाबद्दल अभिनंदन.
साजिर्या,
साजिर्या,
पहिल्या पानाबद्दल अभिनंदन रे
मस्त लिहिलं आहेस..
चांगली
चांगली केलीयेस सुरुवात , हाभिनंदन रे
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
साजिरा...
साजिरा... अभिनंदन!
--------------
नंदिनी
--------------
.. सही
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
साजिरा,
साजिरा, खूप मस्त लिहिलंयस.. एकदम विषयाला चिकटून.. तुझं लिखाण नेहमीच भावतं.. आतून पटत जातं.. आता तुझ्या रंगीबेरंगीवर आम्हाला ते वरचेवर वाचायला मिळणार याबद्दल आमचं आणि तुझंही अभिनंदन!
छान
छान लिहीलय.:) अभिनंदन.. लिहीत र्हावा काहीबाही असच..
मस्त
मस्त रे...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
अभिनंदन!
अभिनंदन! आता सातत्याने लिहा.
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
सुंदर
सुंदर लिहीले आहे साजिरा! आवडले एकदम
उरलेल्या पानात सुविचार. हे बहूधा जीवन, आयूष्य, कर्तव्य याबाबत असत.
सही
सही लिहीलंय!! अजुन येऊदे !!
www.bhagyashree.co.cc
आता नमन
आता नमन वगैरे सोपस्कार झालेच आहेत तर लवकर लवकर येवू द्या पुढचे भाग.
छान
छान लिहिलय!
पहिलं पानच
पहिलं पानच कशाला.. हे असं सारंच 'पहिलं-पहिलं' छान वाटते नाही?>>
अगदी... सगळ्याच पहिल्या गोष्टी मनात बसलेल्या असतात.
अभिनंदन
अभिनंदन साजिरा...
बायदिवे... तु पाहिलेला पहिला शिनुमा आठवतो का रे तुला???
अभिनंदन,
अभिनंदन, अभिनंदन......
आता गाडी वेगात सुटू दे..
अभिनंदन!!
अभिनंदन!! मस्त सुरुवात..!! पानाची पण आणि माझ्या आजच्या दिवसाची पण!!
आवडलं
आवडलं
बर्याच वेळा त्या गोष्टींची 'अखेर' झाल्यावर मनात येतं- 'हे सुरू कसं अन कधी झालं होतं बुवा? काही केल्या आठवत नाही, अन फुकाचा त्रासही होतो. थोडक्यात एखादी गोष्ट 'सुरू' झाल्याचं आपल्या गावीही नसतं कधीकधी. नंतर तो क्षण हातातनं निसटून गेल्याची चुटपूट लागून राहते.. >>>
अगदी अगदी. तुझी पहिली कविता वाचायला आवडेल इथे.
***
May contain traces of nuts.
बर्याच
बर्याच वेळा त्या गोष्टींची 'अखेर' झाल्यावर मनात येतं- 'हे सुरू कसं अन कधी झालं होतं बुवा? काही केल्या आठवत नाही, अन फुकाचा त्रासही होतो. थोडक्यात एखादी गोष्ट 'सुरू' झाल्याचं आपल्या गावीही नसतं कधीकधी. नंतर तो क्षण हातातनं निसटून गेल्याची चुटपूट लागून राहते..
>>> अगदी! (नेहेमीप्रमाणे) मनापासून लिहिलंय साजिरा.. सुंदर स्वगत
लिहित रहा, शुभेच्छा!
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
धन्यवाद
धन्यवाद मित्रांनो.
पाहिलेला पहिला शिनुमा >>> बहूतेक 'प्रपंच' किंवा 'जय संतोषी माँ'. शाळेत कोणत्या तरी अभियानाच्या अंतर्गत काही सिनेम्यांची रीळं आली होती, त्यातले हे असावेत. (थिएटरला सिनेमा बघायची परवानगी नव्हती.) पण हे अभियानवाले महान असावेत. कारण त्यात 'भिंगरी', 'सुशीला', 'पिंजरा' वगैरेही आलेले आठवतात.
पहिली कविता>>> बालकविताच असेल. बालभुमी, बालजगत, बालरंग, बालकुंज यापैकी एखाद्यात प्रसिद्ध झाली होती. मग नंतर रतीबच घातला होता. ते बिचारेही इमाने इतबारे छापून वीस-तीस रुपयांचे मानधनही पाठवत होते.
गेले ते दिन, गेले!
साजिरा, शुभ
साजिरा,
शुभेच्छा, तुझ्या पहिल्या पानावरच्या पहिल्या लेखासाठी
!
छान!!! ~~~~~~~~~~~~~~~~
छान!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
अरे व्वा,
अरे व्वा, चान्गल लिहितोस की रे साजिर्या!
आवडल!

(अन बीडीला नावे ठेवतोस???? राग राग राग)
असो,
आता आयुष्यात (नेटवर) भेटलेला "पहिला शहाणा" आठवू लागलास, अन माझी आयडिच तुला आठवली, तरी, त्यावेगळे सार्थक नाही! नाही का?
छान लिहीले
छान लिहीले आहे. आवडले.
पयलं नमन
पयलं नमन एकदम झकास....
आता दुसर्या पानाची वाट पाहातोय
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
छान
छान लिहिलंय
खरंच छान
खरंच छान लिहिलंयस रे साजिर्या... आवडलं...
पहिली नोकरी, पहिला पगार, पहिली गाडी, पहिला लाँग ड्राईव्ह, व्यवसाय सुरू केल्यावर मिळालेला पहिला क्लायंट, पहिलं ऑफिस अन घर हे असेच स्वतंत्र ललिताचे विषय होतील.
>>
घे आता लिहायला हे सगळं...
छान रे! मजा
छान रे! मजा आली वाचताना अनेक पहिले आठवले
वा रे वा
वा रे वा साजिर्या !!
छानच जमलंय की
येऊंद्या अजुन !
साजिर्या,
साजिर्या, मस्त लिहीले आहेस. आवडलं. परत एकदा अभिनंदन.
अरे हो. नुसतेच आरंभशूर न बनता लिहीत रहा.
________________
बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते
ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाएं कैसे
-----------------------------