भारुड हवं आहे
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
5
कुणाला
कुणाला एखाद्या लावणीचे इंग्रजी भाषांतर येत असेल तर ते ही द्यावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रत्येक नया दिन नयी नाव ले आता है
लेकिन समुद्र है वही,सिंधु का तीर वहीं
प्रत्येक नया दिन नया घाव दे जाता है
लेकिन पीडा है वही ,नयन का नीर भी वहीं
'सत्वर पाव
'सत्वर पाव गं मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
सासरा माझा गावी गेला,
तिकडंच खपवी त्याला,
'सत्वर पाव गं मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
सासू माझी फार गांजिते ...
'सत्वर पाव गं मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
नणंदेचं कारटं किरकिर करतं,
खरूज होई दे त्य़ाला ।
मला एव्हढच आठवत आहे.

मन्या२८०४ ला मेल कर रे पिके त्याला पाठ आहे त्याने म्हण्ट्ल होतं मुळशीच्या जिटी़जी ला
सत्वर पाव
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते
लौकर निर्दाळी तिला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
जाउ माझी फडफड बोलति
बोडकी कर गं तिला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
नणंदेच पोर किर्किर करिते
खरूज होऊ दे त्याला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
दादला मारून आहुति देईन
मोकळी कर गं मला
सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकलीच राहू दे मला
-(संत एकनाथ महाराज ?)
अरे वा
दिलिपकुमा
दिलिपकुमार
खुपच सुन्दर