खंत

खंत

Submitted by अक्षय समेळ on 11 November, 2021 - 02:40

जाणिवांचा मृत्यू अन्
पुरता गांजला देह
काल होती तशी नाही
ही मावळणारी सांज

झोळी साऱ्या ह्या ऋतूंची
वाटते आज निकामी
रंग रंग वितळले
काळोखाच्या गर्द दोही

विझते ज्योत क्षणात
वाऱ्याच्या मंद स्पर्शाने
केले असता प्रयत्न
पेटेल पुन्हा नव्याने

जिद्द असेल अंतरी
झुकेल ते आकाशही
दुःखाला मरण नाही
खंत जर बाळगली

- अक्षय समेळ.

खंत वेड्या मनाची

Submitted by शार्दुल हातोळकर on 25 October, 2016 - 07:23

ही गझल मायबोलीवरुन मी स्वत: वैयक्तिक कारणामुळे काढुन टाकत आहे.

खंत

Submitted by मनोमयी on 26 July, 2012 - 08:17

त्याच्या दूर जाणाऱ्या पाठ्मोऱ्या आकृतीवर तिची नजर कितीतरी वेळ खिळली होती.त्याची आकृती दिसेनाशी होताच तिची नजर शुन्यात हरवली. गतकाळाने तिच्या डोळ्यांपुढे अगदी थैमान घातला.कितीतरी स्मृतींची वलये तीच्या मन:पटलावर फेर धरु लागली.
त्याने एकदा मागे वळून पाहावे, आपल्यासाठी थांबावे अशी फोल आशा तिला का वाटावी? ज्या व्यक्तिचा तिने सदैव तिरस्कार केला, तो आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची स्वप्ने पाहिली त्याने आज तिच्यासाठी का म्हणून थांबावे?

शब्दखुणा: 

जखमांनां त्या जिव्हा असत्या....

Submitted by आठवणीतला मी.... on 27 February, 2012 - 06:51

जखमांनां त्या जिव्हा असत्या
वेदना त्यांनी बोलल्या असत्या
घबरुन बसतो मणुस जसा
तश्या गप्प त्या रहील्या नसत्या.

जखमांनां त्या जिव्हा नहीत
आहेत ते फक्त अश्रु
क्रोधाला घाबरट मणसाच्या
कोणीही शकते सहज आवरु.

इतरांनी करायचे अत्याचार
आपण का रहायचे फक्त लाचार
सोडा सहन करने आता
ह्रदयात घेऊनी नवे अंगार.

मांडले थोरांनी विचार
नका बनू तुम्ही लाचार
प्रश्न येईल जेव्हा अस्तित्चाचा
ऊचला गड्यांहो तुम्हीही हत्यार.

लढत लढत मरणं
़कधीही आहे खुप सोप्प
सोडा षंढ बनने आता
मनातील सोडुन सगळी खंत.

भावनानां जर ह्रदय असतं
वाईट त्यानां वाटलं असतं
भीत भीत जगण्यापरीस

गुलमोहर: 
Subscribe to RSS - खंत