जे जे तुला बोलायचे राहून गेले होते
ते ते कागदावर आपसूक मांडले गेले
एक एक शब्द अश्रूंनी भिजला होता
विरहाच्या अग्नीत कागद ही जळाला
राख होऊन कागदाची विभूती झाली
अनेकांच्या भाळी श्रद्धापूर्वक सजली
भक्तगणांची आता ना भासते उणीव
तरी मनात उरते तुझी अक्षय जाणीव
- अक्षय समेळ
जाणिवांचा मृत्यू अन्
पुरता गांजला देह
काल होती तशी नाही
ही मावळणारी सांज
झोळी साऱ्या ह्या ऋतूंची
वाटते आज निकामी
रंग रंग वितळले
काळोखाच्या गर्द दोही
विझते ज्योत क्षणात
वाऱ्याच्या मंद स्पर्शाने
केले असता प्रयत्न
पेटेल पुन्हा नव्याने
जिद्द असेल अंतरी
झुकेल ते आकाशही
दुःखाला मरण नाही
खंत जर बाळगली
- अक्षय समेळ.
अवसेच्या अंधारातही
समोरच्या प्रवाहाचं अस्तित्व,
अस्पष्टसं जाणवतय...
कुणा अंधार-पक्ष्याची
असहाय फडफड,
गूढता अधिकच वाढवतेय...
गावाबाहेरच्या देवळातलं
किर्तन संपवून सारीजणं,
परतली आहेत घरोघरी,
केव्हाचीच....
नदीपल्याड घाटावर
मसणातल्या चिता
विझू विझू आल्या आहेत...
कुणा अनाम शक्तीचा वावर
भोवताली
होत असल्यागत वाटतय...
अस्तित्वाच्या वेशी वरला
तेव्हाचा अस्फूट कल्लोळ
वाढू पहातोय आता
धीरे धीरे....
दिवसाच्या लक्तरांना
गुरफटून घेत,
दूर कुठेशी
क्षीण लुकलुकणा-या
एकाकी दिव्याला आणि