मी मानसी
पोस्ट...
"मोहाचे घर"
"मोहाचे घर"
मनाच्या हळुवार तारा.......
आज छेडील्या कोणी जरा।
तशी बावरले मी मोहरले मी
........सूर नवे जागले।।१।।
झुळुक सुरांची आली.........
गोड सुखाची बरसात झाली।
अंकुरली प्रीत ओलेत्या मातीत
........मलाही ना कळले।।२।।
हुंकारलीे ती मनात..............
जीव आसावला आत आत।
वेगळी जाणीव नुरली उणीव
.......स्वप्नच आकारले।।३।।
स्वप्नाची भूल धुसर.....
दिसे प्रेमाचे गांव सुंदर।
मागे मागे जशी चालले मी अशी
.............लगबगी पोचले।।४।।
मोहाचे घर चौफेर.....
तिथे बांधलेले मनोहर।
"अर्थ"
"अर्थ"
चांदण्याही विझलेल्या
चंद्रही जणू निजलेला
सावळले नभ सारे
गाती वाहते वारे
------------------तू कुठे?!!१
थेंब थेंब शिडकावा
कुठूनसा हळु व्हावा
वाऱ्याच्या कुणी पाठी
झाडे का झिंगताती
---------------------तू कुठे?!!२
कसली ही झाली नशा
धुंद जशा दाही दिशा
पंखाविन तरल तनु
अवकाशी झेपे जणु
---------------------तू कुठे?!!३
जिवनाचा अर्थ नवा
चराचरा उमगावा
या हळव्या क्षणी जरा
स्पर्श हवा प्रेमभरा
--------------------तू कुठे?!!४
. ..... मी मानसी