Submitted by mi manasi on 23 November, 2019 - 14:14
"मोहाचे घर"
मनाच्या हळुवार तारा.......
आज छेडील्या कोणी जरा।
तशी बावरले मी मोहरले मी
........सूर नवे जागले।।१।।
झुळुक सुरांची आली.........
गोड सुखाची बरसात झाली।
अंकुरली प्रीत ओलेत्या मातीत
........मलाही ना कळले।।२।।
हुंकारलीे ती मनात..............
जीव आसावला आत आत।
वेगळी जाणीव नुरली उणीव
.......स्वप्नच आकारले।।३।।
स्वप्नाची भूल धुसर.....
दिसे प्रेमाचे गांव सुंदर।
मागे मागे जशी चालले मी अशी
.............लगबगी पोचले।।४।।
मोहाचे घर चौफेर.....
तिथे बांधलेले मनोहर।
दंगले बघून आपली आपण
.........गुंतुनची पडले।।५।।
प्रेमाची वसती झाली........
तशी जीवना रंगत आली।
नवे नवे ऋतु हवा हवासा तु
...माझी न मी राहिले।।६।।
......मी मानसी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमलेली कविता. यात नुसताच मोह
जमलेली कविता. यात नुसताच मोह नाही, समर्पणही आहे.
आवडली.
आवडली.
छान.
छान.
कांचनगंगा धन्यवाद....हो,
कांचनगंगा धन्यवाद....हो, प्रेमात समर्पण असतंच !
सामो , वेडोबा....धन्यवाद !