पोस्ट...

Submitted by mi manasi on 17 May, 2020 - 07:55

पोस्ट...
काल मातृदिन झाला
पोस्टचा पाऊस पडला
बहुतेक फाँरवर्ड केलेल्या
काही कविता नव्याने लिहीलेल्या
काही जुन्याच नव्याने डकवलेल्या
पोस्टखाली इमोजीही तेच ते
अंगठे, नमस्कार, गुलदस्ते...

आज त्याने मोबाईल उघडला
तर पोस्ट आईचीच होती पण...
चार दिवस चालत
शहरातून गावात
थकून घरी आलेल्या
आपल्या एकुलत्याच मुलाला
कोरोनाच्या भयाने
घरात न घेणाऱ्या आईची...
पोस्टखाली थोडे इमोजी होते
काही आश्चर्याचे
काही दुःखाचे
बहुधा त्यांचे
काल आईची थोरवी सांगणाऱ्यांचे
त्याला आश्चर्य नव्हते
त्याने वाचली होती
गोष्ट बिरबलाची लहानपणीच
पाणी गळ्याशी येताच
पिलाला पायाखाली
घेणाऱ्या माकडीणीची

आणि त्याला ती पटलीही होती
तेव्हाच!
✍मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users