उपक्रम
मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा
मराठी भाषा दिन घोषणा
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.
चला तर मग मंडळी, सज्ज होऊयात कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होणाऱ्या या आपल्या मायमराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आणि अभिमानाने म्हणण्यास,
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य,ऐकतो मराठी !!
"अंत: अस्ति प्रारंभ: - २ - छप्पर फाडके- छंदीफंदी
ती बस स्टॉपजवळ येत होती तेव्हा लांबूनच तिने त्याला ओळखल, कॉलेज मधे पॉप्युलर, विशेष करून तिच्या वर्गातल्या मुलींमध्ये.. तशी झपाट्याने पावलं टाकत ती तिथे पोहोचली.
“एकटाच दिसतोय.. वा काय संधी मिळलीये.” स्वतः च्या नशिबावर ती भारीच खूष झाली
आता ह्याला कसं हाय म्हणून बोलायचं असा विचार करत असतानाच.. अचानक पाऊस सुरू झाला. .तेही पावसाळ्याचे दिवस नसताना.
अर्थात त्याच्याकडे छत्री नव्हती. पण नेहेमी सगळ्या परिस्थितीसाठी सुसज्ज असणाऱ्या तिने सुहास्य वदनाने बॅगेतून लाल छत्री काढली..
“ जभी देता.. देता छप्पर फाडके.. “ मनात गुणगुणतच..
"अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - शब्द - छंदीफंदी”
हे नेहमीचच होत त्यांचं…
हा पेटीवर बसणार, एक धून वाजवणार .. “ओळख..”
मग ती पक्की असुर/ बेसूर.. आठवून आठवून एखादा guess करणार.. बहुदा ते चुकलेल असणार.
दोन तीन वेळा प्रयत्न फसला की दुसरी धून…
परत “आता हे ओळख..”
परत तिचे तर्क- वितर्क..तिचं चुकीचं उत्तर..
असा अर्धा एक तास तरी चाले.
त्या रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरू झाला.
“ओळख..”
या वेळेला पहिलाच टुका बरोबर लागलेला..
हर्षभरित ती त्या पेटीच्या सुरांवर मात करून गाऊ लागली.. आणि काही क्षणातच तो चित्कारला…
अंत: अस्ति प्रारंभ: - १ - घोरपड - छंदीफंदी
इकडे ते अंधारात दबा धरून बसलेले. घोरपड बुरुजावर पोहोचली, तसा एकेक जण दोरखंडाला धरुन वर पोहोचला.
खालच्या अंगाला मेजवानी आणि नाच गाण्यात मश्गूल असणाऱ्या गानिमाकडे तुच्छ कटाक्ष टाकत त्यांनी आपापल्या मशाली पेटवल्या आणि हातात नंग्या तलवारी घेऊन ते सज्ज झाले.
सरदाराने ध्वज फडकवला…
नाचणाऱ्या गानिमातील एकाचे सहज वर लक्ष गेले.
डोंगरावरील ते दृश्,
शेकडो मशालीच्या त्या धगधगत्या प्रकाशात तळपत्या तलवारी आणि शत्रूचा ध्वज फडकताना, बघून त्याची चांगलीच तंतरली..
भागो भागो म्हणत त्याने खाली रस्त्याकडे धाव घेतली.
चित्रकला उपक्रम : माझे आवडते कार्टून, लहान गट : सामी (इरा देसाई )
नाव : इरा दिग्विजय देसाई
वय वर्ष : ७ वर्ष
माशा अँड दि बेअर हे आवडते कार्टून आहे. माशा आम्हाला सगळ्यांनाच आवडते.
बेअर काढायचा पण विचार होता पण जरा खाडाखोड झाली मग एवढेच चित्र राहू दिले
अंत: अस्ति प्रारंभ: - १ - गावजेवण - अमितव
गडावर आज धामधूम होती. पण नव्या राजाने ना नवा मुलुख जिंकला होता, ना कुणाची जयंती होती की मयंती. मग गावजेवण ठेवण्याचं कारण काय? नव्या राजाचं हल्लीच लग्न झालं होतं आणि हे त्यानंतरचं पहिलंच गावजेवण! म्हणजे आजचा स्वयंपाक रांधायची जबाबदारी नव्या सुनबाईंची हे मात्र चाणाक्ष गावकर्यांनी ओळखलं. 'नव्या सूनबाई काश्मिरच्या आहेत' राधाक्का म्हणाली. 'काश्मिरच्या नव्हे, स्पेनच्या आहेत' राधेचं बोलणं मध्येच तोडत बगूनाना म्हणाले. 'स्पेनला शिकायला होत्या, आणि काश्मिरला फिरायला टूर बरोबर गेलेल्या. आहेत आपल्या फुरसुंगी बुद्रुकच्याच, त्यांचं इन्स्टाहँडल फॉलो करणारा परश्या म्हणाला.
अंत: अस्ति प्रारंभ: - २ - शिकवण - अni
निर्जन जंगल .. पाणवठ्यावरची थोडी दलदल आणि सांजवेळ. पाणकोंबडी पकडायला अजून काय हवे. बस फक्त थोडी सबुरी. ती तर म्हादूकडे बक्कळ होतीच आणि पिढीजात अनुभवसुद्धा. आज पाटलाच्या वाड्यावरच्या जंगी पार्टीचे मुख्य आकर्षण शमवणे म्हादूच्याच हातात होतं. खास भूयारासारख्या केलेल्या ठिकाणापासून सावजाचा शोध सुरू झाला...
पावसाची रिपरिप चालूच होती.
दबक्या पावलांनी थोडं पुढे गेल्यावर चिमुरडी मंदा दिसल्याने तो जागेवरच थिजला. विचारांनी आणि पावसानं अचानक जोर धरला. पाटलाने पुन्हा डाव साधला होता. आजच्या पार्टीचे कारण कळल्यावर तिथं आता दोन कलेवर होती.
अंत: अस्ति प्रारंभ: ३: {ट्रॅप } - { सामी}
जेरी ने खूप वेळा सांगून पाहिले पण मेरी कसली ऐकतेय .
टॉम पासून सतत सावध रहावं लागतं आणि तिला हि सांभाळावं लागत .
तिच्या गावात सवय नाहीना ट्रॅप ची कितीवेळा सांगितले कि अग
चीज दिसलं कि लगेच खायला जाऊ नकोस , अनु मावशी चीज बाहेर चुकून कधीच विसरणार नाही .
रात्र झाली मेरी आणि जेरी अनु मावशी झोपल्यावर हळूच बाहेर निघाले. किचन मध्ये पडलेले बिस्किट्सचे तुकडे आनंदाने खाऊन टेरेसवर जाणार इतक्यात मेरीने ट्रॅप मध्ये लावलेला चीज चा तुकडा बघितला .
जेरीने थांबवायच्या आधीच पळत जाऊन ट्रॅप मध्ये शिरली आणि अडकली.
माझी कलाकारी - काव्यगायन - पशुपत
कविता :
माझ्या उरात दडले, होते सवाल काही…
काटे मनात आणि, ओठी गुलाब काही!
विझले जरी निखारे, राखेत प्राक्तनाच्या…
जाती फुलून ठिणग्या, माझ्या दिलात काही!
पाण्यात वेढलेला, परी राहीलो तृषार्त…
प्राशून आसवांना, सरली तहान काही!
संगीत आणि कंठस्वर : पशुपत
काव्य : सुधीर फाटक