Submitted by अमितव on 17 September, 2024 - 11:57
गडावर आज धामधूम होती. पण नव्या राजाने ना नवा मुलुख जिंकला होता, ना कुणाची जयंती होती की मयंती. मग गावजेवण ठेवण्याचं कारण काय? नव्या राजाचं हल्लीच लग्न झालं होतं आणि हे त्यानंतरचं पहिलंच गावजेवण! म्हणजे आजचा स्वयंपाक रांधायची जबाबदारी नव्या सुनबाईंची हे मात्र चाणाक्ष गावकर्यांनी ओळखलं. 'नव्या सूनबाई काश्मिरच्या आहेत' राधाक्का म्हणाली. 'काश्मिरच्या नव्हे, स्पेनच्या आहेत' राधेचं बोलणं मध्येच तोडत बगूनाना म्हणाले. 'स्पेनला शिकायला होत्या, आणि काश्मिरला फिरायला टूर बरोबर गेलेल्या. आहेत आपल्या फुरसुंगी बुद्रुकच्याच, त्यांचं इन्स्टाहँडल फॉलो करणारा परश्या म्हणाला.
इतक्यात कुकरची पंचक्रोशी दणाणून सोडणारी शिट्टी झाली. युनोहु आणि फ्लॅनप्रेमी माबोकरांनी उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून रस्त्याकडे धाव घेतली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमितव भारीच
अमितव भारीच
कुकरमध्ये काश्मिरी राजमा असावा बहुतेक...
त्याशिवाय कुकरची पंचक्रोशी दणाणून सोडणारी शिट्टी झाली नसणार..
सुनबाईंनी राजमा शिजवताना
सुनबाईंचा राजमा शिजेना म्हणून कुकरने "आम्ही नाही ज्जा!' म्हणत हाय जंप मारली काय?
बाबो
बाबो
कळली नाही पण मजेशीर वाटली.
अमितव पुन्हा आपल्या लौकिकाला
अमितव पुन्हा आपल्या लौकिकाला जागले..
काही कळायला मार्ग नाही
शशक वरून मीम बनत आहेत की मीम वरून शशक..
आधी कोंबडी की आधी अंडे चे मायबोली वर्जन आधी शशक की आधी मीम झाले आहे
नव्या राज्यांनी ना नवा मुलुख
नव्या राज्यांनी ना नवा मुलुख जिंकला होता..
ते राजांनी हवे..., सगळीकडे!
काही कळली नाही!
मी शशक चॅलेंज्ड आहे परत
मी शशक चॅलेंज्ड आहे परत कितव्यांदा तरी कळले.
तरी कट्रीना, विकी कौशल नी केशर असं कायतरी तरळतंय डोळ्यासमोर…
आधी वाटलं राजमा संदर्भ आहे,
आधी वाटलं राजमा संदर्भ आहे, पण मग स्पॅनिश फ्लॅन अर्थातच कॅरमल पुडिंग पण आठवलं.
यावर्षी गणेशोत्सव शशक आणि मीम्स नी गाजवला आहे खरा.
राजमा ( युनोहू) आणि पुडींग
राजमा ( युनोहू) आणि पुडींग दोन्ही संदर्भ आहेत
हो आणि कुकर दोन्हीमध्ये हवे.
हो आणि कुकर दोन्हीमध्ये हवे.
ही मलाही टोटल बाउन्सर पाकृ
ही मलाही टोटल बाउन्सर
पाकृ बाफचा संदर्भ असावा.
काही कळायला मार्ग नाही
काही कळायला मार्ग नाही
कळली
कळली