अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम

अंत: अस्ति प्रारंभ: ३: {ट्रॅप } - { सामी}

Submitted by सामी on 17 September, 2024 - 06:03

जेरी ने खूप वेळा सांगून पाहिले पण मेरी कसली ऐकतेय .
टॉम पासून सतत सावध रहावं लागतं आणि तिला हि सांभाळावं लागत .
तिच्या गावात सवय नाहीना ट्रॅप ची कितीवेळा सांगितले कि अग
चीज दिसलं कि लगेच खायला जाऊ नकोस , अनु मावशी चीज बाहेर चुकून कधीच विसरणार नाही .
रात्र झाली मेरी आणि जेरी अनु मावशी झोपल्यावर हळूच बाहेर निघाले. किचन मध्ये पडलेले बिस्किट्सचे तुकडे आनंदाने खाऊन टेरेसवर जाणार इतक्यात मेरीने ट्रॅप मध्ये लावलेला चीज चा तुकडा बघितला .
जेरीने थांबवायच्या आधीच पळत जाऊन ट्रॅप मध्ये शिरली आणि अडकली.

Subscribe to RSS - अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम