मायबोली गणेशोत्सव २०२१ : श्री गणेश प्रतिष्ठापना
मायबोली गणेशोत्सव २०२१
वर्ष २२ वे
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
मायबोली गणेशोत्सव २०२१
वर्ष २२ वे
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
मायबोली गणेशोत्सव २०२१. भाग घेण्यासाठी ग्रूपचे सभासद व्हा !
श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली १० वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
नमस्कार मायबोलीकर!
मराठी भाषा दिवस २०२०च्या समारोपाची वेळ येऊन ठेपली आहे. गेले दहाबारा दिवस चालू असलेले विविध उपक्रम आणि तीन दिवस सुरु असलेले शब्दखेळ यांमुळे मराठी भाषेचा हा उत्सव खरंच खूप रंगतदार झाला.
आनंदछंद ऐसा या उपक्रमाला मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, विविध कलाकौशल्यांमध्ये निपुण असलेल्या मायबोलीकरांना आपल्या छंदांबद्दल लिहायला आवडेल याची आम्हाला खात्री होतीच आणि ती खात्री सार्थ ठरवल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
शतकानुशतकांची समृद्ध वाटचाल पाठीशी राखत, वर्तमानातील विस्तारलेल्या क्षितिजांचे भान बाळगून, भविष्यातल्या नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवत आपली मायबोली मराठी एकविसाव्या शतकाच्या नवीन दशकात पाऊल ठेवत आहे.
सहर्ष सादर करत आहोत, मायबोली.कॉमचा नवीन दशकातला पहिला मराठी भाषा दिवस!
काय काय आहे बरं यावर्षीच्या उत्सवात? नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, चित्रं आणि कोडीसुद्धा!
मराठी भाषा दिवस २०२० उपक्रम
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता. यंदाचं हे सलग आठवं वर्षं.