मराठी भाषा दिवस २०२० - समारोप
नमस्कार मायबोलीकर!
मराठी भाषा दिवस २०२०च्या समारोपाची वेळ येऊन ठेपली आहे. गेले दहाबारा दिवस चालू असलेले विविध उपक्रम आणि तीन दिवस सुरु असलेले शब्दखेळ यांमुळे मराठी भाषेचा हा उत्सव खरंच खूप रंगतदार झाला.
आनंदछंद ऐसा या उपक्रमाला मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, विविध कलाकौशल्यांमध्ये निपुण असलेल्या मायबोलीकरांना आपल्या छंदांबद्दल लिहायला आवडेल याची आम्हाला खात्री होतीच आणि ती खात्री सार्थ ठरवल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!