मराठी भाषा दिन २०१९ - समारोप

Submitted by मभा दिन संयोजक on 4 March, 2019 - 04:58

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता. यंदाचं हे सलग आठवं वर्षं.

samarop.jpg

यंदाचा मभा दिवस एका दृष्टिक्षेपातः
१. विज्ञानभाषा मराठी ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
२. साहित्य वाचन, मोरपिसारा: ह्या उपक्रमांना ठीक ठीक प्रतिसाद मिळाला. जास्त लोकांनी सहभाग नोंदवला असता तर खूप मजा आली असती
३. सुलेखन करण्याची कल्पना लोकांना आवडली, पण अर्थातच जास्त संख्येने सुलेखनं पाहायला आवडली असती.
४. खेळांना निवडक प्रतिसाद मिळाला
५. गोजिरे बोल ह्या उपक्रमाला माबोकरांचा जास्त सहभाग असेल असे वाटले होते, पण त्याला प्रतिसाद अजिबातच मिळाला नाही. काय कारण असावे बरे! असो.

ह्या वर्षीच्या मराठी भाषा दिवस उपक्रम आणि खेळांमधे सहभागी झालेल्या आणि ते यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार.

तसेच खास आभार मानायचे आहेत ते
१. गोजिरे बोल करता आपल्या कविता अजिबात आढेवेढे न घेता देऊ करणारे मायबोलीकर कवी शशांक पुरंदरे, दत्तात्रय साळुंके आणि शिवाजी उमाजी ह्यांचे,
२. संयोजकांच्या विनंतीस मान देऊन म भा दि करता विशेष लेख लिहून देणारे अमितव, शाली, दत्तात्रय साळुंके, आणि
३. नेहमीप्रमाणेच सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल तसेच संयोजन मंडळात काम करायची संधी दिल्याबद्दल अ‍ॅड्मीन आणि वेबमास्तरांचेही आभार

सहसा म भा दिवस संपल्यानंतर त्या वर्षीचे उपक्रम बंद होतात पण संयोजक मंडळाला असे वाटते आहे की ह्या वर्षी जाहीर केलेल्या उपक्रमातील विज्ञानभाषा मराठी हा उपक्रम या पुढेही चालू रहावा जेणेकरून या विषयावरचे मराठी भाषेतले लिखाण चालूच राहील आणि मराठी भाषेचे ज्ञानभाषा बनण्याकडे उचलले गेलेले पाऊल अजून पुढे पडेल,पडतच राहील.

मंडळात काम करताना आणि हा अर्ध सप्ताह मायबोलीवर साजरा करताना आम्हाला पुरेपूर मजा आली.

म भा दिवस उपक्रम अधिक चांगला होण्यासाठी काही विधायक सूचना असल्यास येथे लिहा जेणेकरून पुढच्या संयोजन मंडळांना त्याचा उपयोग होईल.
एवढे बोलून आपली रजा घेतो! भेटत राहू इथेच!!

- म भा दिवस २०१९ संयोजन मंडळ
हर्पेन (हर्षद), वावे (विशाखा), किल्ली (पल्लवी), प्राचीन (प्राची), सिम्बा (अतुल)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रम छान होते Happy
वेळे अभावी जास्त भाग घेता आला नाही.

उपक्रम छान होते.
सर्व संयोजक मंडळींचे खूप आभार...
माझे नाव दत्तात्रय साळुंके आहे.
एरवी कथांना भरभरुन प्रतिसाद देणा-या मायबोलीकरांचे वाचनाचे श्रम खूप सुरेख कथा अभिवाचनाने वाचवले . कथाही सुंदर होत्या तरी प्रतिसादासाठी आखडलेले हात पाहून वाईट वाटले.

मराठी भाषा दिन 2019 बहुतेक सदस्यांना नीट दिसला नसावा.
गुलमोहर कथेत म. भा. दिन 2019 कथा असा उप मेनू असता तर ...
गुलमोहर लेखात शास्त्रीय लेख व विशेष लेख उप मेनू...
असे काहीसे केले असते

उपक्रम खूपच मस्त होते.
अभिवाचन आवडले. सुलेखन एकसे एक सुरेख होते.
कोडे काय.... खेळात मी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरीही मजा आली कोडी आणि उत्तरं वाचताना. बाकीचे लेख वेळ मिळेल तसे वाचते आहे. तिथे प्रतिक्रिया देईनच.
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन Happy

यावर्षीचे उपक्रम नावीन्यपूर्ण होते. सुलेखन, विज्ञानभाषा, श्राव्य साहित्य, पुस्तकांची मुखपृष्ठे, यमकांचा खेळ. सगळेच.
काही लेख वाचलेत. उरलेले होईल तसे वाचतोय.

संयोजकांचं , लिहिणार्‍या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन.

संयोजकांचे आणि सहभागी सगळ्यांचे कौतुक आहे.

ग्रुप विजिबिलिटीचे डिफॉल्ट सेटिंग पब्लिक ठेवले नव्हते का? का?

Visibility वाढण्याच्या दृष्टीने हा एक उपाय यापुढे करण्यासारखा आहे. ( ही पश्चातबुद्धी आहे Happy मी संयोजक मंडळात असूनही मला हे आधी सुचलं नाही )

कुठल्याही उपक्रमात नवीन लेख/ धागा आला की लेख लिहिणाऱ्या आयडीने मभादि घोषणेच्या धाग्यात प्रतिसाद देऊन लेखाची लिंक द्यायची. मभादि घोषणा सर्वांना दिसते, त्यामुळे नवा प्रतिसाद आला की लक्ष वेधले जाईल.
किंवा, संयोजकांना सांगून नवा लेख आला की घोषणेचं हेडर अपडेट करून घेऊन नवीन लेखाची लिंक हेडरमधेच द्यायची.

मराठी भाषा दिवस २०१९ चा दुवा मुख्य पानावर ( मायबोलीच्या मुखपृष्ठावर) आणि सर्व पानांच्या वर मेनूमध्ये दिलेला आहे. त्या दुव्यावर क्लिक केल्यावर मभादि २०१९ च्या सर्व धाग्यांचे दुवे मिळतील.