नमस्कार मायबोलीकर मंडळी!
२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता. यंदाचं हे सलग आठवं वर्षं.
यंदाचा मभा दिवस एका दृष्टिक्षेपातः
१. विज्ञानभाषा मराठी ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
२. साहित्य वाचन, मोरपिसारा: ह्या उपक्रमांना ठीक ठीक प्रतिसाद मिळाला. जास्त लोकांनी सहभाग नोंदवला असता तर खूप मजा आली असती
३. सुलेखन करण्याची कल्पना लोकांना आवडली, पण अर्थातच जास्त संख्येने सुलेखनं पाहायला आवडली असती.
४. खेळांना निवडक प्रतिसाद मिळाला
५. गोजिरे बोल ह्या उपक्रमाला माबोकरांचा जास्त सहभाग असेल असे वाटले होते, पण त्याला प्रतिसाद अजिबातच मिळाला नाही. काय कारण असावे बरे! असो.
ह्या वर्षीच्या मराठी भाषा दिवस उपक्रम आणि खेळांमधे सहभागी झालेल्या आणि ते यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार.
तसेच खास आभार मानायचे आहेत ते
१. गोजिरे बोल करता आपल्या कविता अजिबात आढेवेढे न घेता देऊ करणारे मायबोलीकर कवी शशांक पुरंदरे, दत्तात्रय साळुंके आणि शिवाजी उमाजी ह्यांचे,
२. संयोजकांच्या विनंतीस मान देऊन म भा दि करता विशेष लेख लिहून देणारे अमितव, शाली, दत्तात्रय साळुंके, आणि
३. नेहमीप्रमाणेच सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल तसेच संयोजन मंडळात काम करायची संधी दिल्याबद्दल अॅड्मीन आणि वेबमास्तरांचेही आभार
सहसा म भा दिवस संपल्यानंतर त्या वर्षीचे उपक्रम बंद होतात पण संयोजक मंडळाला असे वाटते आहे की ह्या वर्षी जाहीर केलेल्या उपक्रमातील विज्ञानभाषा मराठी हा उपक्रम या पुढेही चालू रहावा जेणेकरून या विषयावरचे मराठी भाषेतले लिखाण चालूच राहील आणि मराठी भाषेचे ज्ञानभाषा बनण्याकडे उचलले गेलेले पाऊल अजून पुढे पडेल,पडतच राहील.
मंडळात काम करताना आणि हा अर्ध सप्ताह मायबोलीवर साजरा करताना आम्हाला पुरेपूर मजा आली.
म भा दिवस उपक्रम अधिक चांगला होण्यासाठी काही विधायक सूचना असल्यास येथे लिहा जेणेकरून पुढच्या संयोजन मंडळांना त्याचा उपयोग होईल.
एवढे बोलून आपली रजा घेतो! भेटत राहू इथेच!!
- म भा दिवस २०१९ संयोजन मंडळ
हर्पेन (हर्षद), वावे (विशाखा), किल्ली (पल्लवी), प्राचीन (प्राची), सिम्बा (अतुल)
छान झाला मराठी भाषा दिन.
छान झाला मराठी भाषा दिन.
उपक्रमही छानच होते. सर्व संयोजक मंडळींचे कौतूक.
उपक्रम छान होते
उपक्रम छान होते
वेळे अभावी जास्त भाग घेता आला नाही.
उपक्रमही छानच होते. सर्व
उपक्रमही छानच होते. सर्व संयोजक मंडळींचे कौतूक. +१
उपक्रम छान होते.
उपक्रम छान होते.
सर्व संयोजक मंडळींचे खूप आभार...
माझे नाव दत्तात्रय साळुंके आहे.
एरवी कथांना भरभरुन प्रतिसाद देणा-या मायबोलीकरांचे वाचनाचे श्रम खूप सुरेख कथा अभिवाचनाने वाचवले . कथाही सुंदर होत्या तरी प्रतिसादासाठी आखडलेले हात पाहून वाईट वाटले.
बदल केला आहे, दत्तात्रय सर..
बदल केला आहे, दत्तात्रय सर..
किल्लीजी धन्यवाद ... खरं तर
किल्लीजी धन्यवाद ... खरं तर आधी वाटले राहू द्यावे पण परत चूक होऊ नये म्हणून कळवले.
दत्तात्रय साळुंके, नमस्कार
दत्तात्रय साळुंके, नमस्कार आणि संयोजक मंडळातर्फे दिलगिरी व्यक्त करतो.
दत्तात्रय साळुंके, नमस्कार
प्रतिसाद संख्या नंतरही वाढते, वाढेल
हे काय केल्यास होऊ शकते ह्याबाबत काही सूचना असल्यास जरूर कळवा.
मराठी भाषा दिन 2019 बहुतेक
मराठी भाषा दिन 2019 बहुतेक सदस्यांना नीट दिसला नसावा.
गुलमोहर कथेत म. भा. दिन 2019 कथा असा उप मेनू असता तर ...
गुलमोहर लेखात शास्त्रीय लेख व विशेष लेख उप मेनू...
असे काहीसे केले असते
उपक्रम खूपच मस्त होते.
उपक्रम खूपच मस्त होते.
अभिवाचन आवडले. सुलेखन एकसे एक सुरेख होते.
कोडे काय.... खेळात मी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरीही मजा आली कोडी आणि उत्तरं वाचताना. बाकीचे लेख वेळ मिळेल तसे वाचते आहे. तिथे प्रतिक्रिया देईनच.
संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन
यावर्षीचे उपक्रम नावीन्यपूर्ण
यावर्षीचे उपक्रम नावीन्यपूर्ण होते. सुलेखन, विज्ञानभाषा, श्राव्य साहित्य, पुस्तकांची मुखपृष्ठे, यमकांचा खेळ. सगळेच.
काही लेख वाचलेत. उरलेले होईल तसे वाचतोय.
संयोजकांचं , लिहिणार्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन.
संयोजकांचे आणि सहभागी
संयोजकांचे आणि सहभागी सगळ्यांचे कौतुक आहे.
ग्रुप विजिबिलिटीचे डिफॉल्ट सेटिंग पब्लिक ठेवले नव्हते का? का?
उत्तम होते आयोजन. विज्ञानभाषा
उत्तम होते आयोजन. विज्ञानभाषा मराठी हा उपक्रम तर सुंदरच होता.
Visibility वाढण्याच्या
Visibility वाढण्याच्या दृष्टीने हा एक उपाय यापुढे करण्यासारखा आहे. ( ही पश्चातबुद्धी आहे
मी संयोजक मंडळात असूनही मला हे आधी सुचलं नाही )
कुठल्याही उपक्रमात नवीन लेख/ धागा आला की लेख लिहिणाऱ्या आयडीने मभादि घोषणेच्या धाग्यात प्रतिसाद देऊन लेखाची लिंक द्यायची. मभादि घोषणा सर्वांना दिसते, त्यामुळे नवा प्रतिसाद आला की लक्ष वेधले जाईल.
किंवा, संयोजकांना सांगून नवा लेख आला की घोषणेचं हेडर अपडेट करून घेऊन नवीन लेखाची लिंक हेडरमधेच द्यायची.
मराठी भाषा दिवस २०१९ चा दुवा
मराठी भाषा दिवस २०१९ चा दुवा मुख्य पानावर ( मायबोलीच्या मुखपृष्ठावर) आणि सर्व पानांच्या वर मेनूमध्ये दिलेला आहे. त्या दुव्यावर क्लिक केल्यावर मभादि २०१९ च्या सर्व धाग्यांचे दुवे मिळतील.
सर्व संयोजक, सहभागी व
सर्व संयोजक, सहभागी व प्रतिसादकांचे आभार !
मस्त उपक्रम होते सगळेच , मजा
मस्त उपक्रम होते सगळेच , मजा आली !
संयोजकांचं कौतुक आणि आभार. नाविन्यपूर्ण उपक्रम होते !
वेगळा ग्रुप होता का? मला नाही
वेगळा ग्रुप होता का? मला नाही दिसले.